स्वामी

By रणजीत देसाई

Share

Availability

available

Original Title

स्वामी

Publish Date

1962-01-01

Published Year

1962

Publisher, Place

Total Pages

436

ISBN 10

8177666444

ISBN 13

978-8177666441

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Weight

0.5 g

Average Ratings

Readers Feedback

Swami

By Mrs. Rucha Samant, Assistant Professor MCA department, R H Sapat College of Engineering Management Studies & Research सर्वांगाने समृद्ध असलेल्या मराठी साहित्यामधील एकाच पुस्तकाची...Read More

Mrs. Rucha Samant

Mrs. Rucha Samant

×
Swami
Share

By Mrs. Rucha Samant, Assistant Professor MCA department, R H Sapat College of Engineering Management Studies & Research
सर्वांगाने समृद्ध असलेल्या मराठी साहित्यामधील एकाच पुस्तकाची निवड करणे हि अत्यंत अवघड बाब आहे. तरीपण माझ्या मनाला भावलेल्या सर्वोतोपरी सुंदर अश्या कादंबरीचा धुंडोळा घ्यायचा प्रयंत्न आज मी करत आहे.
“स्वामी” – सिद्धहस्त लेखक श्री रणजित देसाई ह्यांची हि मराठी सारस्वतांना दिलेली अमूल्य भेट. थोरले माधवराव पेशवे ह्यांचा जीवनकालखंड लेखकांनी आपल्या कसदार शैलीने ह्यात मांडलाआहे.१९६२ साली प्रसिद्ध झालेली हि कादंबरी तमाम मराठी वाचकांना अजूनही गारुड घालते. ह्या कादंबरीला अमाप यश तर मिळालेच पण तिच्या लेखकास अनेक मानसन्मान आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. हि कादंबरी अनेक समीक्षकांनी तर नावाजलीच पण आपल्या सारख्या सामान्य रसिकांमुळे ती गाजत राहिली.
हीच कादंबरी का? त्याबद्दल थोडेसे …जेव्हा माधवराव पेशवे गादीवर आले त्यावेळची परिथिती राज्य कारभार करण्यासाठी अत्यंत कसोटीची होती. जेमतेम १६ वर्षाचा कोवळा पेशवा , पानिपतच्या तिसऱ्या युद्धामुळे झालेली अतोनात आर्थिक आणि मनुष्यबळाची हानी, घरातूनच चुलत राघोबादादा ह्यांचा त्रास , स्वतःला पेशवेपद मिळावे म्हणून त्यांची कोणत्याही टोकाला जायची हिम्मत ….ह्या बाह्य आणि अंतर्गत विरोधाला ठामपणे सामोरे जाणारे एक देदीप्यमान व्यक्तीमत्व आपण इथे अनुभवतो.
हि कादंबरी माधवरावांच्या धीरोदात्त स्वभाव आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आपणास वेळोवेळी देते. माधवरावांनी पेशवाईची फक्त राजवस्त्रे परिधान नाही केली, तर त्यांनी लयाला गेलेल्या पेशवाईचा कारभार अत्यंत कुशलतेने चालवला आणि राज्याला पुन्हा तेजस्वी वाटेवर आणून सोडले.
हि कादंबरी आवडण्यासाठी अशी अनेक करणे तर आहेतच पण अगदी परीकथा वाटावी अशी रमामाधवाची प्रेमकथा मनाला भुरळ घालते. अगदी अल्लड वयात एकमेकांशी एकरूप झालेली मने आणि पतिपत्नी मधील सामंजस्य लेखकाने अगदी सुंदरतेने रेखाटले आहे. पोरसवदा , भाबडी रमा आणि प्रेमळ , विनोदी माधव ह्यांच्यातील संवाद निर्मळ प्रेमाचे अंतरंग उलगडून दाखवते. तीच रमा पुढे जाऊन पेशवाईंन अधिकाराने काही कठोर निर्णय घेते त्यातून कळीचे फुलात होणारे रूपांतर आपण अनुभवतो.
लेखकाचा सखोल व अभ्यासपूर्ण लेखनशैलीमुळे कादंबरीतील प्रत्येक पात्र अगदी गंगोबा तात्या ते पेशव्यापर्यंत आपल्या नजरे समोर जिवंत उभी राहतात . कथेतील व्यक्तीवर्णना इतकेच स्थळवर्णन सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. पुण्याच्या शनिवारवाडा, थेऊरचा चिंतामणी मंदिर अश्या अनेक स्थळांचे स्थापत्यहि लेखकाने बारकाव्यांसहित सुरेख रेखाटले आहे.
माधवराव गुणग्राहक होते, तसेच कर्तव्यकठोर हि होते. रामशात्री प्रभुणे सारख्या न्यायाधीशाने दिलेले न्यायनिवाडे निसंकोचपणे इथे अमलात आले, भले ते पेशव्याच्या आप्त-स्वकीयांच्या विरोधात होते. न्यायासाठी स्वतःच्या आईचाहि आयुष्यभरचा रोष ओढून घेणारा असा न्यायप्रविष्ट राजा पुन्हा होणे नाही.
माधवराव अत्यंत कुशल योद्धा होते. १७६१ साली राजवस्त्रे परिधान केल्यापासून ते १७६९ ह्या ८ वर्षाच्या कालखंडात त्यांनी १० -१२ मोठ्या लढाया केल्यात. राक्षसभुवन ची लढाई हि त्यांच्या युद्धकौशल्याची पावती देणारी ठरली. नेतृत्वगुण हे जन्माला येतानाच घेऊन यावे लागतात हे त्यांनी केलेल्या अनेक लढयातून उमजते.
इतका शूर योद्धा आपल्या परिवारावर निर्व्याज प्रेम करणारा होता. राघोबादादांना राजगादीवर बसवून स्वतः साधा लढवय्या होऊन जगण्यासाठीपण ह्या वीर एका पायावर तयार होता. पण स्वकीयांच्या क्रूर , सत्तापिपासू वागणुकीमुळे इतिहास एका महान राजास मुकला.

शेवटच्या काळात माधवरावांना झालेल्या राजक्षयाने मराठी मुलुख अनाथ झाला. थेऊरच्या चिंतामणीच्या सानिध्यात करुणोदत्त अशी रमामाधवाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. मात्र सहसा राजपरिवारात योध्याच्या घरात मिळू न शकणारे अनेक अनमोल क्षण ह्या जोडप्याने अनुभवले. ह्या परिकथेचा शेवट या दोघांच्या अंताने झाला. विरह, ताटातूट अश्या मर्त्य जीवांना भेडसावणारे दुःख ह्या जोडप्याने कधीच मागे टाकले होते. जरी हि कादंबरी एक शोकांतिका असली तरी रमामाधवानी तिला अमर्त्य रूप दिले आहे. सर्व जीवांना जरी शणभंगुरतेचा श्राप असतोच मात्र अशी हि प्रेमकथा शतकानुशतके शतकानुशतकांनी कालंजयी ठरते. ह्या सगळ्याचे श्रेया त्या महान लेखकाचे.

Submit Your Review