
'स्व’ जगण्याची मूल्य आणि स्वाध्याय एकात्मता
पुस्तकाचे नाव: ‘स्व’ जगण्याची मूल्य आणि स्वाध्याय एकात्मता”
लेखक: रसाळ, पुंडलिक विठ्ठल
प्रकाशक: स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
नाव: उगले यश रावसाहेब
वर्ग: S.Y.B.C.S.
College: GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
प्राचार्य डॉ.पी. व्ही रसाळ यांनी ‘स्व’ जगण्याची मूल्ये आणि स्वाध्याय एकात्मता” हे पुस्तक लिहिले आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांनी स्वाध्याय याचा अभ्यास केला ‘धर्म’ हा एक पुरुषार्थ समाजाला सक्षम बनवू शकतो. असा विचार स्वाध्यायाचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी केला. धर्माच्या जिर्णोद्धारासाठी स्वाध्याय परिवार उभा केला सर्व जगभराच्या धर्माचा अभ्यास करून त्यांनी वैचारिक क्रांतीसाठी श्रीमद् भगवद्गीता हा ग्रंथ लिहिला. गीतेच्या माध्यमातून स्वाध्याय चळवळीच्या निमित्ताने जगाला नवीनच सृष्टी देणारा ठरला. त्यातून एका नव्या विचार पैलूंची निर्मिती झाली हे बघावयास मिळते. स्वाध्याय परिवार आणि मानव सृष्टी पूर्ण स्वाध्याय त्रिकाल संधीच्या माध्यमातून गावोगावी विचार देण्याचे काम केले आहे. त्रिकाल संध्या हे कर्मकांड नसून ईश्वराने आपल्याला दिलेला स्मृतिदान, शक्तिदान आणि शांतीदान यासाठी आपण ईश्वराचे तीन वेळेस स्मरण केले पाहिजे. हा विचार स्वाध्याय आणि मानसशास्त्रीय पातळीवर जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावीला. चांगली वृत्ती निर्माण केल्याशिवाय चांगली कृती घडणार नाही म्हणून परमपूज्य दादाजींनी परिवर्तनाची सूक्ष्म अध्यात्मिक परिणामकारक क्रिया त्रिकाल संध्येच्या माध्यमातून गतीशील केली आहे. समाजातील दृष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी पारिवारिक भावना जागवली. मातृभावाने माणसा-माणसातील भेद नष्ट केला. कोणतेही नाव दिले गेले तरीही ‘सृष्टी संचालक व ईश्वर एकच आहे’ असा मुख्य विचार भक्तीच्या माध्यमातून माणसा-माणसापर्यंत पोहोचविला. मी भगवंताचा मुलगा आहे, ही भक्ती माणसातील माणूसपण जागृत करते हाच विचार रुजवण्यासाठी दादाजींनी अनेक प्रयोग निर्माण केले त्या सर्व प्रयोगांचा लेखकाने बारकाईने अभ्यास करून तपशीलांसह या पुस्तकात मांडले आहे. ऋषी मुनिंचे विचार, श्रीराम, श्रीकृष्ण यांचे विचार माणसांच्या आचरणात यावे यासाठी स्वाध्याय चळवळ उभी राहिली. स्वाध्याय याचे प्रणेते परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्याची ओळख या पुस्तकातून होते.
परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींच्या तत्त्वज्ञान विद्यापीठातून स्वाध्याय परिवाराची एकनिष्ठा, एकत्मता आणि मूल्यभाव दाखवते. भारतीयांचे भक्ति-काव्य वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. एक अभिनव प्रयोग या पुस्तकातून दर्शवला आहे.