सर्वप्रथम हे पुस्तक वाचत असताना मी सुरुवात ही प्रस्तावने पासून केली आणि प्रस्तावना वाचन असताना
Read More
सर्वप्रथम हे पुस्तक वाचत असताना मी सुरुवात ही प्रस्तावने पासून केली आणि प्रस्तावना वाचन असताना मला काहीच समजले नाही . मला वाटायला लागले की मी हे कोणते पुस्तक निवडले वाचायला. परंतु अनुक्रमनिकेनुसार , हळूहळू जेव्हा मी पुढील वाचनास सुरुवात केली, तेव्हा त्यातील माझा रस वाढूत गेला. यामध्ये एक म्हण आहे ना वाचाल तर वाचाल याप्रमाणेच पुढील वाचन चालू ठेवले. वाचता वाचता प्रल्हाद केशव अत्रे हे मी वक्ता कसा झालो याचे वाचन करता करता मला जाणवले की, जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टीचा आत्मविश्वासाने सामना करत नाही तोपर्यंत आपल्याला आपली यश गाठणे अशक्य आहे. या वाचनातून मलाही भरपूर काही शिकण्यासारखे होते. त्यातच त्यांची वक्ता होण्यापर्यंतचा प्रवास कसा गेला व ते कोणकोणत्या गोष्टींना सामोरे गेले हेहि वाचल्यानंतर मला असे समजले आपला प्रवास किवा आपला संवाद व राहणीमान आपण विचार करतो किवां राहतो. त्याएवढेच मर्यादित नाही, अजूनही आपल्याला भरपूर प्रवास करावयाचा आहे. व त्या प्रवासातून खूप काही आत्मसात करण्याची आवशकता आहे. हे पुस्तक वाचत कासताना मला अस वाटत होत की मीही भविष्यात एक वक्ताच व्हावे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेला प्रवास व त्यांचे अनुभव हे खूप लांबवर आहेत, ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप काही आहे. तसेच वक्ता होण्यासाठी लागणारे गुण, कौशल्य भाषेची जाणीव जाणीव, साहित्याची योग्य निवड, वाक्य व शब्दातील अंतर तसेच योग्य चिन्हांचा उच्चार हे सर्व काही त्यांच्या लहापनापासूनच्या जीवनापासून आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच त्यांचे जीवन चरित्र वाचत असताना मला अनेक व्याख्यात्यांची माहित झाली. व खऱ्या अर्थाने आपण आपाल्या जीवन व्याख्याने ऐकणे किती महत्वाचे आहे व त्यातून जे काही मिलेल ते आत्मसात करणे किव्हा समाजाला उपदेश देता देता आपणही त्या गोष्टी आचरणात आणणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असेच म्हणायला गेले तर त्यांचे आवडते वक्ते म्हणजे अच्युतराव कोल्टकर आणि दादासाहेब खापर्डे. या दोन्ही वक्त्यांकडून प्र. के. अत्रे यांनी स्वतःमधील सुधारणा अतिशय चोख पद्धतीने करून घेतले. व असा हा सर्व प्रवास व शब्दांचा प्रचंड साठा घेऊन ते उत्तम असे वक्ता ही बनले.
प्र. के.अत्रे हे म्हणतात की अच्युतराव असे म्हणतात की, वक्त्याचे मुख्य भांडवल म्हणजे त्याचा आवाज. प्रत्येक वक्त्यामध्ये वेगवेगळे कला व गुण असते व त्यांचा सादर करण्याचा पद्धती वेगवेगळ्या असतात. या सर्व गोष्टीचा विचार करता प्र.के.अत्रे यांनी सर्व बाजूंना स्वतः मधील सुधारण करून एक उत्तम असे वक्ता बनवते. व आपणा सर्वानाही खूप प्रेरणादायक असे विचार मांडून दिलेत. व यातूनच त्यांनी आपल्या श्रोत्यावार्गाकडून ‘हशा आणि तल्या’ या स्वरुपात एक प्रसिद्ध विनोदी व्याख्याते म्हणून प्रसिद्ध झाले.
खरे सांगायचे झाले तर त्यांच्याकडून आपणा सर्वाना खूप काही घेण्यासाठी आहे कारण मी जेव्हा वाचनास सुरुवात केली व वाचता वाचता मला संपूर्ण बाजूने खूप काही आत्मसाद करण्याची गरज आहे असे वाटते. म्हणूनच या पुस्तकाचे वाचन आवर्जून करावे. प्र. के.अत्रे यांनी संपूर्ण बाजूनी परिपूर्ण असे ज्ञान देण्याचे कर्त्यव्य पूर्ण केले आहे. यामध्ये त्यांनी भाषा, वान्द्ममय, विविध नाटककार , देशभक्त, संत, शाळेतील लहानपणीची व कॉलेज मधील आठवणी, विविध कीर्तनकार, कवी ,विविध ऋतू, साहित्य सम्राट, विविध विषय, राजकारण, समाज इ. सर्व गोष्टी बद्दलचा समावेश या पुस्तकामध्ये केला आहे. सांगायचे झाले तर यातून भरपूर काही घेण्यासारखे आहे
Show Less