“ ना वाकायचे , ना झुकायचे अन्यायावर उलटून वार करायचे , सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे..||
Read More
“ ना वाकायचे , ना झुकायचे
अन्यायावर उलटून वार करायचे ,
सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे..|| “
हिंदवी स्वराज्याच्या शिल्पकार म्हणून राजमाता जिजाऊ साहेब यांना संबोधले जाते राजमाता जिजाऊ साहेब यांना मोलाचे स्थान आपण देतो कारण त्यांनी आपल्याला अन्यायवृद्ध लढण्याचे बळ दिले जिजाबाईंचे कार्य मी खूप वाचले आहे परंतु मला असे वाटले की त्यांच्याबद्दल सर्व इतिहास जाणून घेतला पाहिजे म्हणून मी जिजाबाईंच्या पुस्तकाची निवड पुस्तक परीक्षणासाठी केली. पुस्तकाचे नाव हिंदवी स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजासाहेब हे आहे या पुस्तकाचे लेखक श्री. अशोकराव शिंदे सरकार हे आहेत. मी सर्व पुस्तक वाचले आहे. मला त्यांच्या कार्याची माहिती या पुस्तकातून मिळाली आहे शिवाजी महाराजांचे बालपण देखील या पुस्तकांमध्ये दर्शवले आहे. जिजाबाईंच्या बालपणापासून ते मृत्यु पर्यंत त्यांचा जीवन प्रवास या पुस्तकांमध्ये लेखकाने लिहिलेला आहे.
त्या पुस्तकातून मला जिजाबाईंच्या व्यक्तिरिक्त शिवाजीराजे, शहाजीराजे, देवगिरीचेयादव, लखुजीजाधव, मालोजीभोसले, जिजाबाईंचेबालपण, जिजाऊ साहेबांच्या पराक्रम, शिवाजी महाराजांचे बालपण इत्यादी गोष्टी या पुस्तकात सांगितलेल्या आहेत तसेच या पुस्तकांमध्ये काही चित्र सुद्धा आहेत. भवानीमाता, छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज, किल्लेदेवगिरी, संततुकाराम, राजगड, सिंदखेडराजाचाशिलालेख, अजिंठावेरूळ, रायगडवरीलबाजारपेठे, पावनखिंड, विजयदुर्गकिल्ला इ छायाचित्र या पुस्तकांमध्ये आहेत पुस्तकाची भाषा जास्त अवघड नाही.व जास्त सोपी पण नाही. रामसिंग व बजरंग घाट यांनी लिहिलेले आहेत जिजाबाईंच्या जन्माच्या वेळी बारशाच्या वेळी शहाजीराजे व जिजाबाईंच्या विवाहाच्या वेळी अशी कवणी त्यांनी ह्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहेत.
जिजाउंची थोडक्यात माहिती घेण्यासाठी चांगले पुस्तकं आहे.
Show Less