Chhava

By Shivaji Sawant

Share

शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांचे मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत यांना ‘मृत्युंजयकार’ सावंत म्हणून ओळखले जाते. शिवाजी सावंत यांना ‘छावा’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ पुरस्कार दिले आहे. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे.     छावा ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली कादंबरी आहे.

Share

शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांचे मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत यांना ‘मृत्युंजयकार’ सावंत म्हणून ओळखले जाते. शिवाजी सावंत यांना ‘छावा’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ पुरस्कार दिले आहे. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे.     छावा ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली कादंबरी आहे.

Original Title

Chhava

Publish Date

1980-01-01

Published Year

1980

Publisher, Place

Format

paperback

Language

Marathi

Average Ratings

Readers Feedback

CHHAVA

Soham Dhodapkar (STUDENT) B.Y.K.College of Commerce NASHIK. “छावा” ही प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक काल्पनिक कादंबरी आहे. हे पुस्तक मराठा साम्राज्याचे...Read More

Soham Dhodapkar

Soham Dhodapkar

×
CHHAVA
Share

Soham Dhodapkar (STUDENT)
B.Y.K.College of Commerce NASHIK.
“छावा” ही प्रसिद्ध मराठी लेखक शिवाजी सावंत यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक काल्पनिक
कादंबरी आहे. हे पुस्तक मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची
कहाणी सांगते. सावंत यांची उत्कृष्ट कृती त्यांच्या बारकाईने केलेल्या संशोधनाचा आणि स्पष्ट
कथाकथनाचा पुरावा आहे.

कादंबरीची सुरुवात शिवाजीच्या बालपणापासून होते, ज्यामध्ये त्यांची आई जिजाबाई आणि वडील
शहाजी भोसले यांच्याशी असलेले त्यांचे नातेसंबंध उलगडतात. कथा उलगडत असताना, आपण
शिवाजीचे तरुण राजपुत्रापासून एका दूरदर्शी नेत्यामध्ये रूपांतर पाहतो. सावंत ऐतिहासिक तथ्ये
काल्पनिक कथांशी कुशलतेने विणतात, एक आकर्षक आणि माहितीपूर्ण कथा तयार करतात.

“छावा” चा एक उल्लेखनीय पैलू म्हणजे त्यातील सुविकसित पात्रे. शिवाजी महाराजांचे धाडस,
बुद्धिमत्ता आणि करुणा यांचे सुंदर चित्रण केले आहे, ज्यामुळे ते एक संबंधित आणि प्रशंसनीय
नायक बनले आहेत. जिजाबाई, शहाजी आणि अफझल खान यासारख्या सहाय्यक पात्रांची
रचनाही तितकीच उत्तम प्रकारे केली आहे, ज्यामुळे कथेत खोली आणि गुंतागुंत वाढली आहे.

सावंत यांची लेखनशैली गीतात्मक आणि भावनिक आहे, वाचकांना १७ व्या शतकातील भारतात
घेऊन जाते. मराठा साम्राज्यातील लढाया, दरबारातील राजकारण आणि दैनंदिन जीवनाचे त्यांनी
केलेले स्पष्ट वर्णन मंत्रमुग्ध करणारे आहे. लेखकाने भाषेचा वापर उत्कृष्ट केला आहे, जो
पात्रांच्या भावना आणि संघर्षांना उल्लेखनीय अचूकतेने व्यक्त करतो.

“छावा” ही केवळ एक ऐतिहासिक कादंबरी नाही तर नेतृत्व, निष्ठा आणि बलिदानाचा विचार
करायला लावणारा शोध आहे. एकात्मिक आणि न्याय्य भारतासाठी शिवाजी महाराजांचे स्वप्न
प्रेरणादायी आहे आणि मुघल साम्राज्य आणि इतर शत्रूंविरुद्धचे त्यांचे संघर्ष त्यांच्या लोकांप्रती
असलेल्या त्यांच्या अढळ वचनबद्धतेचा पुरावा म्हणून काम करतात.

शेवटी, “छावा” हे एक व्यापक ऐतिहासिक महाकाव्य आहे जे वाचकांना त्याच्या समृद्ध
तपशीलवार जगाने, आकर्षक पात्रांनी आणि वैश्विक थीम्सने मोहित करेल. भारतीय इतिहास,
संस्कृती आणि साहित्यात रस असलेल्या प्रत्येकासाठी शिवाजी सावंत यांची उत्कृष्ट कृती
वाचायलाच हवी.

:- छावा

पुस्तकाचे नाव:- छावा लेखकाचे नाव:- शिवाजी सावंत. शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही...Read More

Dr. Varsha Junnare

Dr. Varsha Junnare

×
:- छावा
Share

पुस्तकाचे नाव:- छावा लेखकाचे नाव:- शिवाजी सावंत.
शिवाजी गोविंदराव सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते मराठी कादंबरीकार होते त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांचे मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत यांना ‘मृत्युंजयकार’ सावंत म्हणून ओळखले जाते. शिवाजी सावंत यांना ‘छावा’ या कादंबरीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ पुरस्कार दिले आहे. पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. छावा ही छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या जीवन पटावर लिहिलेली कादंबरी आहे. ‘संभाजी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव १४ मे इसवी सन १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मले. संभाजी राजे, शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी ‘सईबाई’ यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्यचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवन काल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितीत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितीशी सामना करत संभाजी राजे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनले. जन्मताच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई ‘धाराऊ’ थोरल्या महासाहेब ‘जिजाबाई’ व सावत्र आई ‘सोयराबाई’ यांच्यात आई शोधू लागले. राजकारणातील बारकावे त्यांनी लवकर आत्मसात केले. लहान वयातच अशा काही घटना घडल्या की, ज्यामुळे त्यांना मोगलांकडे राहावे लागले. वयाच्या अवघ्या नव्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला. इसवी सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तोपर्यंत संभाजी राजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. राज्याभिषेक नंतर अवघ्या बारा दिवसात झालेल्या जिजाबाईंच्या निधनानंतर संभाजी राजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत राज्यातील कामात गुंतलेले असतात. संभाजी राजांचे महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्याशी अनेकदा मतभेद होऊ लागले. मानकरी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले. ‘अण्णाजी दत्तो’ महाराजांचे अमात्य अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड ,भ्रष्टाचारी त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांसोबत दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच त्यांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळांनी नकार दिला. दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याची सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला. पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकर यांनी संभाजी राजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. शंभूराजांच्या ताईसाहेब ‘राणुबाई’ त्यांच्या सोबत सावली सारख्या होत्या. एप्रिल १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरील मायेचा शेवटचा हातही नियतीने काढून घेतला. या युग पुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाई कडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर मी स्तब्ध झाले. त्यानंतर संभाजी राजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. सर्व सुख-दुःखाच्या प्रसंगी संभाजीराजांच्या पत्नी ‘येसूबाईंनी’ दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या कादंबरीत केले आहे. संभाजी राजांच्या दुर्दैवाने सख्ये मेहुणे गणोजी शिर्के काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले. औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने केलेल्या संगमेश्वराच्य हल्ल्यात संभाजीराजे आपले प्रिय मित्र कवी कलश सोबत पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. या कादंबरीतील शेवटची वीस पान वाचताना मनात संताप आणि डोळ्यात अश्रू येतात. त्यांची निर्घृण हत्या मार्च ११ इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदी जवळच्या ‘तुळापूर’ येथे करण्यात आली. एवढा त्रास सहन करूनही ते औरंगजेबासमोर झुकले नाहीत आणि यातच औरंगजेबाचा पराभव सिद्ध झाला. ही कादंबरी खूपच छान आहे. हिची पृष्ठ संख्या ८५३ इतकी आहे. मुखपृष्ठावर छत्रपती संभाजी महाराजांचे मनमोहक चित्र आहे. त्यावरूनच ते कसे असतील हे समजते. मला ही कादंबरी खूप आवडली. भाषाशैली उत्कृष्ट आहे सर्वसामान्यांच्या मनावर प्रभाव पाडणारी कादंबरी आहे. या कादंबरीची किंमत १६५ असून सर्वसामान्यांना परवडणारी आहे. कादंबरी हाताळण्यास योग्य आहे.
कु. निकीता ज्ञानेश्वर भगत.
एफ.वाय.बी.ए.

Submit Your Review