
फकिरा ही अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला.
अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, अण्णा भाऊंना प्रतिभेचे देणे आहे. जीवनात आग ओकणाऱ्या हर तऱ्हेच्या गोष्टींचा अनुभव त्यांना आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे आणि शोषणाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचा तो पूजक आहे.या कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ साठे सांगतात ,”ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. प्रतिभेला सत्याचे – जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत, असा माझा अनुभव आहे. सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते, तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते आणि अनुभूतीला सहानुभूतीची जोड नसेल, तर आपण का लिहितो याचा पत्ताच लागणे शक्य नाही. हा ‘फकिरा’ही माझा होता. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा फकिरा निर्माण झाला आहे.”फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे.फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते.