By DHANJAY KIR
Original Title
महात्मा ज्योतीराव फुले
Subject & College
Publish Date
2014-01-01
Published Year
2014
Publisher, Place
Total Pages
253
Country
INDIA
Language
Marathi
Readers Feedback
MAHATMA JYOTIRAO PHULE
महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक वाचून मला बऱ्याच गोष्टी समजल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे बालपण व शिक्षण यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यांतील...Read More
Ughade Uaha Bhausaheb
MAHATMA JYOTIRAO PHULE
महात्मा ज्योतिराव फुले
महात्मा ज्योतिराव फुले हे पुस्तक वाचून मला बऱ्याच गोष्टी समजल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांचे बालपण व शिक्षण यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यांतील “कटगुण “हे होते. त्याच गावी ज्योतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिराव यांच्या वडिलांचे नाव “गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई ” होते.
महात्मा ज्योतिराव फुले यांचे गुरु “संत ज्ञानेश्वर” होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक महान कार्य केलेले आहेत, त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्य व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना “शिक्षण” देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे.
“महात्मा फुले” या नावाने ते लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत, जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते असे म्हणता येईल. त्यांनी सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आहे. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. असे म्हणता येते.
महात्मा ज्योतिराव यांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि शोषित वर्गाच्या उत्थनासाठी कार्य करणाऱ्या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. त्यांनी जातीभेद कधीही केला नाही. त्यांनी सर्वांना समान मानले.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून महात्मा फुले यांची ओळख होते. त्यांना 1888 मध्ये .महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय “महात्मा” (संस्कृत: “महान आत्मा”) पदवी प्रदान केले होती. अशाप्रकारे त्यांचे नाव ठरले होते.
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभलेला असल्यामुळे या राज्यास “फुले – शाहू – आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले आहेत. त्यात त्यांचं “शेतकऱ्यांचे आसूड” हा ग्रंथ जास्त प्रसिद्ध ग्रंथ आहे.
त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व समाजात सुधारणा घेण्यासाठी त्यांनी आणि पुस्तके लिहिलेली आहे .त्यांनी गुलामगिरी ,शेतकऱ्यांचा आसूड ,ब्राह्मणांचे कसब, सत्सार, इशारा ,सार्वजनिक सत्यधर्म अशी अनेक पुस्तके महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रसिद्ध आहेत.
तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णी यांची मक्तेदारी याविरुद्ध प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली दिसते. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी आहेत.
सत्ताधीष्ठीत समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेलेआहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वसामान्य दिसून येते. 24 सप्टेंबर इसवी सन 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांपैकी एक अतिशय महत्त्वाचे नाव म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अहोरात्र अनेक प्रयत्न करून आपल्या पत्नीसोबत पहिली मुलींची शाळा पुणे येथे काढली. जातीभेद, स्पृश्य -अस्पृश्य ,वर्णभेद, स्त्री- शिक्षण अश्या अनेक क्षेत्रात त्यांचे मौल्यवान योगदान आहे.
आशा थोर महान नेत्या चा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये (वय 63) पुणे, महाराष्ट्र मध्ये झाला. या पुस्तकात लोकशाहीतील अडथळे दूर करण्याचे उपाय सांगितलेले आहेत. समाजात शांतता आणि एकात्मतेची भावना कशी ठेवावी हे समजले आणि सामाजिक सुधारणे संबंधी विशिष्ट दृष्टिकोन सांगितलेले आहेत. ते आपण आत्मसात केले पाहिजे. समाज प्रबोधनाचे कार्य व जनहिताचा सबंध कशा प्रकारे ठेवावा हे समजले.
