Availability
available
Original Title
The Old Man and the Sea
Subject & College
Series
Publish Date
2012-01-09
Published Year
2012
Publisher, Place
ISBN
978-93-80005-33-1
Format
Paperback
Country
India
Language
English
Average Ratings
Readers Feedback
The Old Man and the Sea
Review By Dr. Shelake Shivaji Dattoba, Assistant Professor in English, Baburaoji Gholap College, Pune २० व्या शतकातील एक उत्कृष्ट कादंबरी: द ओल्ड मॅन अँड द...Read More
Dr. Shelake Shivaji Dattoba
The Old Man and the Sea
Review By Dr. Shelake Shivaji Dattoba, Assistant Professor in English, Baburaoji Gholap College, Pune
२० व्या शतकातील एक उत्कृष्ट कादंबरी: द ओल्ड मॅन अँड द सी
(The Old Man and the Sea)
अर्नेस्ट मिलर हेमिंग्वे यांचा कालखंड १८९९ ते १९६१ असा असून त्यांनी १९२० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९५० च्या मध्यापर्यंत त्याच्या एकूण साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्यांना१९५४ मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्यांनी सात कादंबऱ्या, सहा लघुकथा संग्रह आणि दोन ललित गद्य लेखन (नॉनफिक्शन) साहित्य प्रकाशित केले आहे.
१९५२ मध्ये ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही हेमिंग्वे यांनी उत्कृष्ट कलाकृती प्रशिद्ध केली. ती विलक्षण गाजली आणि लोकप्रियही झाली. याच कादंबरीवर बेतलेली ‘एका कोळियाने’ ही मराठी कादंबरी पु. ल. देशपांडे यांनी लिहिली. ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ह्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळाले व अर्नेस्ट हेमिंग्वे यांना १९५४ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.
क्यूबा या देशचा एक म्हतारा, थकलेला कोळी, सँटिअॅगो आणि एक प्रचंड १८ फूट लांबीचा मर्लिन मासा ह्यांच्या लढाईचे वर्णन ह्या कादंबरीत लेखकाने केले आहे. अशा या एकाकी म्हाताऱ्याला त्याच्या शेजारी राहणाऱ्या मॅनोलिन या एका लहान मुलाशिवाय त्याची काळजी घेणारं असं कोणीही नाही. ८४ दिवसांच्या अथक प्रयत्नांमध्ये एकही चांगला मासा त्याच्या गळाला लागला नाही तरी जिद्द न हारता, दुसऱ्या दिवशी मोठ्या आत्मविश्वासाने व दृढ निश्चयाने सँटिअॅगो हा म्हातारा समुद्रात मच्छिमारीसाठी आपली बोट घेऊन समुद्राच्या प्रचंड लाटांवर स्वार होतो. दिड दिवसाच्या प्रतिक्षेनंतर किनाऱ्यापासून खूप दूरपर्यंत गेल्यावर त्याच्या गळाला विशाल असा मार्लिन मासा लागतो. कादंबरीचा नायक, सँटिअॅगो मार्लिनशी प्रचंड संघर्ष करतो. या संघर्षात तो मार्लिन माशाशी बोलतो. त्याच्या या चर्चेतून त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन डोकावतो. त्याला माशाबद्दल फार प्रेम वाटते पण प्रेमापाक्षा तो कर्तव्य महत्वाचे मानतो. तो म्हणतो, ‘’तो माझा भाऊ आहे. पण मी त्याला मारलेच पाहिजे आणि त्यासाठी मी स्वत:ला बलवान ठेवले पाहिजे.” (He is my brother. But I must kill him and keep strong to do it.) सलग दोन दिवस भर समुद्रात एकटा स्वतःशी, माश्याशी आणि निसर्गाशी बोलत-बोलत तो त्या मोठ्या माश्याशी झुंज देतो. आयुष्यभराच्या प्रगल्भ अनुभवाने आणि स्वत:च्या सामर्थ्याने, मोठ्या कष्टाने त्याने मार्लिनला आपल्या होडीला बांधले आणि त्याचा किनाऱ्याकडे परतीचा प्रवास सुरु झाला.
दोघांच्या संघर्षात सँटिअॅगोच्या हाताला आणि खांद्याला जखमा झाल्या त्याचबरोबर मार्लिनला अनेक घाव लागल्याने त्यालाही जखमा होतात आणि त्याचे रक्त पाण्यावर पसरल्याने त्या वासाने अनेक शार्क, मार्लींनचे लचके तोडण्यासाठी येतात. सँटिअॅगो आणि शार्क माशांच्या संघर्षाचा अध्याय सुरु होतो याचे रोमहर्षक वर्णन या कादंबरीत आहे. ते वाचकाला खिळवून ठेवते. एकामागून एक आलेले शार्क, मार्लिनला लचके तोडून-तोडून संपवतात आणि उरतो फक्त मार्लिनचा सांगाडा! मोठ्या दिव्यातून सँटिअॅगो परत किनाऱ्यावर आल्यानंतर त्याच्या बोटीला बांधलेला मार्लिन माशाचा सांगाडा पाहून लोक थक्क होतात. एवढ्या संघर्षानंतर सँटिअॅगोच्या पदरात फक्त सांगाडा आलेला आहे, तो निराश होतो पण हताश होत नाही. तो दुसर्याा दिवशी मॅनोलिन या त्याच्या लहानग्या दोस्ता सह पुन्हा नव्याने, मोठ्या आत्मविश्वासाने मच्छिमारीस निघतो.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे आणि या पारितोषिकामध्ये ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ या कादंबरीचा मोठा वाटा आहे हे नक्की. या कादंबरीचे कथानक खूप उत्कृष्ट असून ही एक रोमहर्षक कादंबरी आहे. ही कादंबरी कोणत्याही वाचकाला आपल्या प्रेमात पाडते. सहज-साधी आणि सरळ वाटणारी ही शौर्य कथा खूपच रोमांचक व वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. सँटिअॅगो या क्युबाच्या एका वयस्क कोळ्याच्या प्रवासाची, मार्लिन माशाबरोबरच्या आणि विशाल समुद्रावरच्या त्याच्या एकाकी झुंजीची त्याचबरोबर जिंकूनही हारण्याची ही एक अनोखी कथा आहे. या कादंबरीचे वर्णन ‘मानवी अर्थशुन्यतेची एक अर्थपूर्ण कादंबरी (A meaningful novel of human meaninglessness.)’ असे करता येईल. निसर्गाने मानवासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, दोहोंतील संघर्षाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एकमेवाद्वितीय आणि कालातीत असं आख्यान म्हणजे ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही कादंबरी होय. प्रत्येकाने ही कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे.
