Bhoye Ramila Shantaram Final Year B. Pharm. GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research, Nashik-5- Library 'अनंत आमुची ध्येयशक्ती अन् अनंत आशा
Read More
Bhoye Ramila Shantaram
Final Year B. Pharm.
GES’s Sir Dr M S Gosavi College of Pharmaceutical Education and Research,
Nashik-5- Library
‘अनंत आमुची ध्येयशक्ती अन् अनंत
आशा किनारा तुला पामराला’
आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरक विचारांची गरज असते, आपल्याला प्रेरणा आवश्यक असते ती प्रेरणा देणारे पुस्तक म्हणजे ‘गरुडझेप’ या पुस्तकाचे लेखक आहेत. भरत आंधळे (IRS) जे स्वतः एक IRS अधिकारी आहेत. त्यांचा संघर्ष या पुस्तकात मांडलेला आहे. माणूस महत्वकांक्षी असला पाहिजे तरच त्याच्या अंगी संघर्ष करण्याची ताकद येते. मोठी स्वप्न बघण्यासाठी मोठ्या घरातून व्यक्ती पाहिजे असे प्रत्येकाला वाटते परंतू तसे अजिबात नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा इतक्या उंच गरुड झेप घेऊ शकतो हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवलेले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव हे त्यांचे गाव या छोट्याशा खेड्यातून आलेला एक मुलगा UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी कसा बनतो. त्यांची एक संघर्षगाथा या पुस्तकामध्ये सांगण्यात आलेली आहे.
देशातील अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षांपैकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत उज्वल यश मिळवून ते आज या पदाला पोहचले आहेत, मात्र त्यांचा हा मार्ग अत्यंत बिकट, संयम व चिकाटीची कसोटी पाहणारा स्वाभिमान व आत्मविश्वास यांची सत्वपरीक्षा पाहणारे होते. 2000 साली स्पर्धापरीक्षांच्या मार्गावर सुरू झालेले, भरत आंधळे यांचा प्रवास यशापयशाच्या हिंदोळ्यावरून होत. 2010 साली (IRS) मध्ये निवड होईपर्यंत चालत राहिले. मात्र या प्रवासातील आपले अनुभव जास्तीत जास्त मुला- पर्यंत पोहोचवण्याचा भरत आंधळे यांनी निर्धार केलेला यासाठी खेडेगावात, अर्धग्रामीण तसेच शहरी भागांतही त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली व अजूनही देतात.
त्यांच्यासारखे जर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात तर आपल्यापैकी प्रत्येक जण हे करू शकतो, हे त्यांचे वाक्य प्रत्येकाला विलक्षण प्रभावित करत आणि आत्मविश्वास देते. त्यांच्या अनेक भाषणांतुन ते मांडत आलेले त्यांचे जिवानुभव आता गरुड झेप एक ध्येयवेडा प्रवास या पुस्तकातून वाचकापर्यंत आले आहेत. एकूण पाच प्रकरणांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात त्यांनी बालपणाच्या अनुभवांपासून सुरुवात केली आहे. आजोबांनी शिक्षकांशी वाद घालून मिळवून दिलेला त्यांचा शाळाप्रवास मजेशिर वळणे घेत गेला वर्गात न येणारे शिक्षक, पोरांची चालणारी मस्ती, एकही अक्षर लिहीता वाचता न येऊनही पुढच्या इयत्तांमध्ये झालेला प्रवास त्यांनी विनोदी शैलित मांडला ओह.
बिकट आर्थिक परिस्थिती, जुगाराचे व्यसन असलेले वडील अशा पाश्वभुमीवर भरतच्या शिक्षणांसाठी व नंतरच्या प्रवासातही त्यांच्या मागे पहाडासारखी उभी राहीलेली त्यांची आजी व तिचे नातवावरचे प्रेम व विश्वास मनाला स्पर्शून जातात. शाळेत अभ्यास येत नाही म्हणून शिक्ष- कांनी भेटायला बोलवल्यावर घरातील पहिलाच शिकणारा मुलगा आहे. सांभाळून घ्या. अशी विनवणी करणारी व नंतरही तीन वर्ष स्वतःसाठी नवी चोळी न शिवता नातेवाईकांनी दिलेले पैसे स्वतःसाठी न वापरता त्यांना अभ्यासाठी पाठवणारी आजी निरक्षर अजूनही मोठी शिकवण देऊन जाते.
भरत आंधळे आजी विषयी कायम कृतज्ञता व्यक्त करतात. ‘माझा नातू लई मोठा साहेब होणार आहे’. असा आजीचा त्यांच्यावर अदम्य विश्वास होता.
गावात दहावी उत्तीर्ण होऊन आय. टी. आय. झालेला चकाचक कपड्यातला तरुण पाहिल्यावर आपणही दहावीनंतर आय. टी. आय. करायचे त्यांनी ठरवले. दहावी उत्तीर्ण होण्यासाठी अवघड वाटणाऱ्या गणित, इंग्रजी या विषयांसाठी अपार परिश्रम केले. दिवसभर रोजावर काम करायचं किंवा शेळ्यांना चरायला न्यायचं हा शाळेनंतरचा दिनक्रम असे शेजाऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर निभावायचे 54% मिळवून दहावी उत्तीर्ण झाल्यावर नाशिकला (ITI) मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण नाशिकलाही अत्यंत आयुष्य कष्टमय होते. दोन-अडीच तास पायपीट करून कॉलेजला जायचे खाण्याची आबाळ तर ठरलेलीच. काही काळ एका कंपनीत काम केले. बरोबरीने बाहेरून (दूरस्थ शिक्षणक्रमाद्वारे) पदवीचे शिक्षण पूर्ण करून ते कुटुंबातील पहिले पदवीधर बनले.
याच काळात एका मित्रामुळे पोलीस उपनिरीक्षकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणाशी ओळख झाली. व त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली कंपनी व मिळणारी नियमित वेतन सोडून पोलीस उप-निरीक्षक परीक्षेची तयारी सुरु करण्याचा विलक्षण धाडसी निर्णय त्यांनी घेतला. घरची आर्थीक परिस्थिती बिकट, शिक्षणातही फारशी चमक नाही. असे असूनही ध्येयाने प्रेरित झाल्यावर कोणताही त्याग करण्याची तयारी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर दाखवली.शहरी सुखवस्तू कुटूंबातील मुलांनाही जो निर्णय कठीण वाटावा, तो त्यांनी झटक्यात घेतला. ध्येय नक्की केल्यावर त्यादृष्टीने वाटचाल सुरु झाली. पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त वातावरण आहे, हे कळल्यावर नाशिकहून ते पुण्यात दाखल झाले. कोणाशीही ओळख नसल्याने राहायची, खायची, कसलीच सोय असणे शक्य नव्हते.
दोन वर्ष पूर्व परीक्षेत अपयश आल्यानंतर 2006 साली प्रथमच ते पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. दरम्यान LIC मध्ये विकास अधिकाऱ्याची परीक्षा देऊन तिथे निवड झाली. पण आपल्या ध्येयावरची नजर त्यांनी कधीही ढळू दिली नाही.
त्यांच्या या दहा वर्षाच्या प्रवासा विषयी जाणून घ्यायला हे पुस्तक वाचायलाच हवे. काल सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागणारे MPSC UPSC यशस्वी झाल्यावर कसे यशाने बेभान होतात इतरांना तुच्छ समजू लागतात याचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्याच वेळी त्यांनी निर्धार केला की आपले असे होऊ दयायचे नाही.या प्रवासात त्यांनी स्वतः शी निर्धार केला की आयुष्यात कधी माज करायचा नाही.
“अशक्य काहीच नाही, बस फक्त जिगर हवी, जिद्द हवी, स्वप्नांशी तडजोड नको, कष्टाची पर्वा नको, भविष्य आपल्या हातानं, स्वप्नांच्या झुल्यावर सजवता येतं, कृतार्थानं झुलता येतं”
-भोये रमिला शांताराम
Show Less