ज्ञानदेवांचे निवडक अभंग ह्या पुस्तकात डॉ. प्रमोद पडवळ हे ज्ञानदेवांच्या साहित्याची चर्चा आणि
Read More
ज्ञानदेवांचे निवडक अभंग ह्या पुस्तकात डॉ. प्रमोद पडवळ हे ज्ञानदेवांच्या साहित्याची चर्चा आणि ज्ञानदेवांच्या अभंगांची चिकित्सा अतिशय सुयोग्य आणि समर्पक करताना दिसून येतात.
” ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस ||
भागवत धर्म / वारकरी संप्रदायाचा पाया त्या माऊली ज्ञानेश्वरांनी रचला त्यांच्या विषयी अतिशय सखोल विवेचन ह्या पुस्तकात आढळून येते.
११९७ मध्ये विठ्ठलपंत आणि रुख्मिणी या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेले ज्ञान देव विश्व कल्याणाची प्रार्थना करतात. जगाला शांती आणि समृद्धी साठी पसायदान सारखी रचना इतक्या कमी वयात मांडतात.
” नामा म्हणे पूर्ण ब्रम्ह ज्ञानेश्वर | घेतले अवतार अलंकापुरी ||”
आळंदी मध्ये चार भावंडांचा जन्म झाला.
“महाविष्णूचा अवतार | श्री गुरु माझा ज्ञानेश्वर ”
विसोबा खेचर ज्ञानदेवांना विष्णूचा अवतार म्हणतात.
सचिदानंद बाबा, संत तुकाराम इ. संत त्याच्या अभंगातून ज्ञानदेवांच्या जन्माचा महिमा वर्णन करतात.
संत ज्ञानदेवांनी साहित्य विश्वात अनमोल असे योगदान दिलेले आहे त्यातील काही डॉ.प्रमोद पडवळ यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केल आहे.
१)अमृतानुभव –
ज्ञानेश्वर माऊलींचे निवृत्तीनाथ दादाच्या सांगण्यावरून अमृतानुभव सारखा ग्रंथ लिहिला.
या ग्रंथाबद्दल चोखामेळा खालील उदगार काढतात
“तैसाची अमृतानुभव | सिद्धपीठ केले भाव ||
संत एकनाथ – ” अमृत अनुभवी गुरुमय ज्ञान | दाऊनी जग उद्धरिले ||
ह्यावरून अमृतानुभव ची महती दिसून येते.
२) चांगदेव पासष्टी –
१४०० वर्ष जगणारा योगी चांगदेवाला जेव्हा तप साधनेचा गर्व होतो तेव्हा संत ज्ञानेश्वर आत्मा ज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी आणि जग मिथ्या आहे , मायावाद आहे हे दर्शविण्यासाठी चांगदेव पासष्टी ची रचना केली.
३) अभंग गाथा
ज्ञानदेवांनी विठ्ठल भक्तीसाठी अतिशय चांगली रचना केलेली दिसते. ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर याबद्दल काही अभ्यासकांची मत मतांतरे दिसून येतात.
४) हरिपाठ
मोक्ष प्राप्तीसाठी हरीपाथासारखा अतिशय सोप्या माध्यमातून भाविकांना समजेल अशी रचना संत ज्ञानेश्वराची दिसते.
“ठाई च बैसोनी करा एक चित्त | आवडी अनंत आळवावा ||
कलियुगामध्ये विठ्ठल भक्तीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी कुठेही जायची आवशक्यता नाही हे स्पष्ट करता.
“राम कृष्ण हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जॆ वाचा तया मॊक्ष ।।”
“राम कृष्ण हरि विठ्ठल केशव । मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।”
अशा अनेक अभंगातून कैवल्या प्राप्ती साठी नामस्मरण हेच सोपं साधन आहे हे दर्शवितात.
५) ज्ञानेश्वरी
श्रीमद्भगवद्गीते वरील टीका अतिशय सोप्या भाषेत ज्ञानेश्वरांनी सांगितली’
पसायदानाच्या माध्यमातून जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्ट विती पर उपकारे ||
ह्या ओळीला समर्पक असे जीवन जगून ” वसुधैव कुटुंबकम ” चा मंत्र जगाला देवून ” जगाची माउली , चक्रवर्ती , विश्ववंद्य , योगियाचा धनी , कैवल्य सम्राट वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी समाधीस्त झाला.
Show Less