पुस्तक परीक्षण - कु. संस्कृती रोहिदास गोडे, तृतीय वर्ष वाणिज्य ,अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर "
Read More
पुस्तक परीक्षण – कु. संस्कृती रोहिदास गोडे, तृतीय वर्ष वाणिज्य ,अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
” राज्य सरकारने प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित केलेली पहिली कादंबरी. ”
समाज परिवर्तनाचा दृढ विचार मांडणारी म्हणून ‘फकिरा’ एक महत्वाची कादंबरी आहे.’फकिरा’ ही केवळ मनोरंजक कादंबरी नसून तिच्यात इतिहास आणि तत्त्वज्ञान आहे. वंचित समाजातील अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दारिद्र्यावर प्रहार करण्याचा विचार कादंबरी मांडते. मानवी जीवनातील संघर्ष, नाटय, दुःख, दारिद्र्य फकिरा या कादंबरीतून प्रकट होते. कादंबरीत मुख्य नायक हे राणोजी व फकिरा आहेत. कादंबरीचा काळ हा 1850 च्या नंतरचा, असं लक्ष्यात येते. तेंव्हा इंग्रजांनी भारतावर आपलं प्रभुत्व नुकतंच मिळवलं होत. त्या काळी अस्पृश्यता भारतीयांचा रक्तातात सळसळत होती अस वाटत. इंग्रजांनी अजूनच निर्दयी व पाशवी अत्याचार पहिल्यापासून भोगत असलेल्या समाजावर काळे कायदे लावून केला (त्यांचं फोडा आणि राज्यकारा हे धोरण त्यांनी आधी यांच्यावरच वापरलं.
फकिरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी एका सत्य घटनेवर लिहिली आहे. जत्रा’ हा मराठी चित्रपट तुम्ही पहिला असेल, तर जोगिनी बद्दल वाचताना नक्की त्याची आठवण येईल. असा एक मांगाचा पोर अख्या गावाची अभ्रू व भल्यासाठी आपल्या जीवाची बाजी करून गावाला “नवसंजीवनी” मिळवून देतो, गावही त्याचा पांग फेडण्यासाठी आयुष्यभर त्याचा ऋणी राहतो, ते पण “जाती पातीच्या पलीकडे” जाऊन. विष्णूपंत कुळकर्णी सारख्या देवमाणूस जेंव्हा महार मांगावर सामाजाणे घातलेल्या बेड्या तोडून जीव लावतो व त्यांचा साठी इंग्रजांसोबतही लढतो, तेंव्हा इतर तथाकथीत मंडळीला हे कसं पचेल बर ?
कादंबरीचा नायक फकिरा मांग आणि अण्णाभाऊ साठे हे दोघेही मातंग समाजातले होते त्या मुळे फकिरा बद्दल अण्णांना आपलेपणा होता.या कादंबरीत मांग किंवा मातंग जमातीला गुन्हेगारी जात म्हणून जाहीर करण्यात आले .त्यांना कुठेही जाण्यासाठी प्रशासनाची परवानगी सक्तीची केली .शिवाय सकाळ संध्याकाळी त्यांना हजेरी देणे सक्तीचे केले गेले. वाटेगावच्या फकिराने या सगळ्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याची ,त्याच्या सहकाऱ्यांची आणि त्याच्या मागे लागलेल्या पोलीस आणि प्रशासनाची ही एक थरारक कहाणी आहे .अण्णाभाऊंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आहे.
कोरोना पेक्षा भयानक महामारी येते व महामारी सोबत गळ्यातगळे घालून आलेला दुष्काळ जेंव्हा येतो, तेंव्हा सर्व जातीधर्माच्या भिंती समूळ उखडून पडतात. फक्त आणि फक्त मानसुकी उरते याच प्रासंगिक दर्शन कादंबरीत दिल आहे.1857 च्या बंडानंतर पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असंतुष्ट जनतेने व शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजी राज्य, सावकारी आणि जमीनदारी विरुद्ध प्रतिकार केला, यातील काही संघटित प्रतिकार होता तर काही असंघटित प्रतिकार होता. क्वचित काही ठिकाणी त्याला सशस्त्र लढ्याचे रूप आले होते.इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे सामान्य शेतकरी आणि भूमिहीन मजूर आणि बलुतेदार यांना खूप वाईट दिवस आले होते आणि त्यातील जे बलुतेदार खालच्या जातीतील मानले जात होते त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती.
अण्णाभाऊ ज्या वाळवा तालुक्यातून आले होते तिथे राजकीय सत्ता आणि अन्यायाविरुद्व लढण्याची एक परंपराच होती.वाळवा तालुका आणि वारणा नदीकाठची गावे हे कुणालाच जुमानत नसत आणि म्हणून अन्याविरुद्ध लढायला एकटा दुकटा माणूस पण तयार असायचा.उलट त्या वेळच्या इंग्रजी राजवटीने या असंतोषाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग म्हणून पाहिले .साहजिकच उपाशी मरण्यापेक्षा लढून मरणे या जातींनी पसंत केले .
एवढेच नव्हे तर आज शहरांत राहून दलित चळवळी आणि दलित राजकारण करणाऱ्या दलित कार्यकर्त्यांनी सुद्धा पुनः पुन्हा वाचली पाहिजे .याच कादंबरीत ” वारणेचा वाघ ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सत्तू भोसले उर्फ सत्या बेरड याचा पण उल्लेख आला आहे .दलित आणि गरीब फक्त इंग्रजी लोकांचे शत्रू होते असे नाही .तर गावगाड्यातील उच्चवर्णीय देखील त्यांच्यावर अन्याय करताना कोणती कसूर करत नसत.शिवाय इंग्रजी राजवट ही दलित लोकांची मुक्तिदाता होती हा एक गैरसमज सध्या वाढत चालला आहे तो किती खोटा आहे हे ही या कादंबरीत अण्णाभाऊ यांनी दाखवून दिले आहे .
सत्य घटनेवर आधारित अशी हि कादंबरी एक वेळ तरी सर्वांनी वाचलीस पाहिजे.
Show Less