
अमृतवेल
By खांडेकर वि .स .
पुस्तकातील सुरुवातीचे काही पानं जे आहेत त्यात पूर्णपणे भूतकाळ आणि तत्त्वज्ञान मांडलेल आहे. विविध पात्रांच्या तोंडून खांडेकरांनी जे तत्त्वज्ञान मांडलं आहे ते फक्त एक तत्त्वज्ञान नसून एका ज्येष्ठ लेखकाने सांगितलेलं जीवनाचं सार आहे. बारकाईने त्या ओळी जर वाचल्या आणि प्रत्येक शब्द सूक्ष्मपणे समजून घेतला तर त्यात दडलेला खोल अर्थ कळतो. या पुस्तकातील मनात घर करणाऱ्या ओळी - <span lang="MR" style="font-size: 9pt;line-height: 107%;font-family: Mangal, serif;background-image: initial;background-position: initial;background-size: initial;background-repeat:
अमृतवेल ही वि स खांडेकर यांची हृदयस्पर्शी कादंबरी आहे.मला आवडणाऱ्या निवडक पुस्तकां पैकी अशी ही एक प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही स्वप्न काही इच्छा बाळगुण असतात. काहींच्या त्या इच्छा पूर्ण होतात. तर काहींच्या पूर्ण होत नाहीत. पण ज्यांच्या इच्छा स्वप्न पूर्ण होत नाहीत किंवा होणार नाहीत म्हणून आत्महत्या करणे हा पर्याय नाही नंदाचं सुद्धा असंच होत ती सुध्दा आत्महत्या करायला जाते ज्या व्यक्तीवर ती मनापासून प्रेम करते ती लग्ना आधीच अपघातात मरण पावते. या दुःखात ती बुडून जाते व आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते परंतु घरी असलेल्या आई-वडीलांचे प्रेम तीला हे धाडस करू देत नाही. ती आयुष्य नव्याने सुरू करते. आपली पी एच डी पूर्ण करण्याचे ठरविते पण दास बाबू तीला बाहेरचे जग अनुभवायला सांगतात.तेव्हा नंदा नौकरी करायचे ठरविते तेव्हा तीला एक कंप्यनिअन ची नोकरी मिळते. ती पण तिच्या जुण्या मैत्रिणी बरोबर नंदा ची ती मैत्रीण ऋणजे वसुंधरा ती विलासपूर ची जहागिरदारीण तीला एक लहान मुलगी असते. ती जेव्हा विलासपूरला जाते. तेव्हा तीला कळते वसुंधरा आणि तिच्या नवऱ्याचे जमत नसते. ते वेगळे राहत असतात. तिथे नंदा देवदत्तला भेटते तेव्हा तीला समजते देवदत्त हा आतून खूप दुःखी आहे एव्हढा की त्याच्या डोक्यात आत्महत्या करण्याचा विचार आहे नंदा हि कंप्यनिअन म्हणून जरी आली असली तरी वसुंधरा हि तिची मैत्रीण आहे. तिचे आणी तिच्या नवर्याचे वाद मिटावे त्यांचा संसार सुखाचा व्हावा म्हणून तो प्रयत्न करते. ते करत असताना तिच्या चारित्र्यावर सुधा संशय घेतला जातो त्या प्रकरणाचे मुख्य कारण कळते तेव्हा ती सुन्न होऊन जाते. जन्म देणारी आई जीवघेणारी वैरीण कशी होऊ शकते? या पुस्तकात मैत्री प्रिती करुणा वासना याचा वेगळा असा अर्थ सापडतो. आत्महत्या हा कधीच पर्याय आसु शकत नाही. माणूस हा सदैव स्वतःच्या दुखात अडकलेला असतो. जेव्हा तो स्वतःचे छोटे दुःख जगाच्या मोठ्या दुःखान मिसळून टाकतो तेव्हा त्याला सुखाची चव येते नंदा सुद्धा तेच करते आपले दुःख देवदत्ताच्या दुःखात मिसळते. त्याच दुखः कमी करण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी ती काहीही करायाला तयार होते लेखकाने पुस्तकाच्या मागील बाजूस अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात या पुस्तकाचा परिचय दिला आहे. |