
अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची दुर्दशा
By विंगकर आनंद
Price:
$250
आनंद विंगकर यांची ” अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ” ही कादंबरी अवकाळी पावसाच्या दरम्यान एका शेतकरी जोडप्याने केलेली आत्महत्या या विषयावर आधारलेली आहे .परंतु रुढ अर्थाने केवळ शेतकरी आत्महत्या या प्रचलित विषयाभोवती या कादंबरीचे कथानक फिरताना दिसत नाही .तर शेतकरी आत्महत्येची कारणमीमांसा करण्यापेक्षा आत्महत्येच्या परिणामांचा शोध घेणारी ही कादंबरी आहे .या कादंबरीला नैसर्गिक आपत्ती ,अवकाळी पाऊस, मानवी संघर्ष , कावळ्या- कुत्र्यांचा मृत्यू , त्यामुळे पसरलेला अशुभ संकेत , मुक्या प्राण्यांविषयीची सूडबुद्धी ,मानवी गैरसमज, पाप-पुण्य , शाप असे विविध कंगोरे या कथानकाला आहे .