पुस्तक परीक्षण - गायकवाड अंजली मारुती, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे. माणूस
Read More
पुस्तक परीक्षण – गायकवाड अंजली मारुती, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे.
माणूस आणि निसर्गाच्या अतूट नात्याची आणि माणसाच्या पर्यावरणाची हि गोष्ट आहे. पुस्तकात खालील विषयांचा उहापोह केला आहे. हे सर्व विषय खरे तर आपल्या परिचयाचे आहेत पण लेखकाने हे काम हळुवार पणे केले आहे.
आहे त्या परिस्थितीला तोंड देणं, निसर्गाचा हा नियम आहे. पैसा, प्रतिष्ठा, अधिकार आणि सत्तेची चटक माणसाला गुलाम बनवते . मान-सन्मान , सत्ता आणि अधिकार विकत घेताना मनाचं अस्तर फाटून जातं /प्रत्येक गोष्ट माझ्यापासून सुरु होऊ शकते, मग ती चांगली असू दे, अथवा नसू दे. नियम मोडला कि निसर्ग शिक्षा करतो/कामा इतकच दाम मिळावा हि श्रम मूल्याची पहिली पायरी आहे. मनाविरुद्ध एखादी गोष्ट करत राहणं म्हणजे शरीर – मन बिघाडास आवतन देणं आहे. मोठ्यांनीही लहान होऊन राहण्यात वेगळाच आनंद आहे . आनंदासाठी जगण हीच सगळ्यात खरी गोष्ट. कोणत्याही गोष्टीच्या खूप आहारी जाण हे एखाद्या व्यसनासारखं आहे. जगणं हा एक खेळ आहे आणि या खेळातला निर्भळ आनंदच आम्ही हरवला आहे.
शरीर आणि मनाच्या संस्काराची हि गोष्ठ आहे. चांगले संस्कार शरीर -मनास निरोगी राहण्यास मदत करतात. प्रत्येक गोष्ट माझ्यापासून सुरु होऊ शकते, मग ती चांगली असू दे, अथवा नसू दे. एवढ जरी केल तर अनेक प्रश्न सोपे वाटू लागतील. अशी आहे हि आनंदाश्रमाची गोष्ठ.
Show Less