दलित आत्मकथनाची लेखनबीजे औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या वार्षिकांमध्ये सापडतात
Read More
दलित आत्मकथनाची लेखनबीजे औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या वार्षिकांमध्ये सापडतात ‘आठवणीचे पक्षी’ हे त्यांच्या आत्मकथनपर लेखाचे पुस्तक २७ जानेवारी १९७९ रोजी प्रसिद्ध झाले. दया पवार यांचे ‘बलुतं’ २४ डिसेंबर १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. येथे ‘ग्रंथाली’ची भुमिका जाणून घेतली पाहिजे. वाचनप्रसार व वाचनामिरुची यांची समाजात वाढ व्हावी म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी ही चळवळ सुरु केली. समाजाचा संदर्भ असलेले साहित्य प्रसिद्ध करणे हे त्यांचे एक ध्येय त्यांनी समाजातील खालच्या वर्गातील शिक्षणप्रसार न झालेल्या दुर्लक्षित व उपेक्षित वर्गातील चाळिशीच्या वयातील लोकांना आपल्या आयुष्याविषयी आत्मकथनाच्या अंगाने लिहीण्यास प्रवृत्त करावे असे आरंभीच ठरवले व त्यातून प्रथम, ‘बलुतं’ हे आत्मकथनपर पुस्तक निर्माण झाले. गावकुसाबाहेरील जीवनाची आत्मकथने येत असतानाच भटक्या समाजालाही जाग आली. कैकाडी समाज हा त्यांपैकी एक. लक्ष्मण माने याचे ‘उपरा’ डिसेंबर १९८० मध्ये प्रसिद्ध झाले. ‘बलुतं’ व ‘उपरा’ या पुस्तकांचे स्वागत समाजाच्या सर्व थरांत ज्या तर्हेने झाले त्यामुळे ‘आत्मकथन’ या वाड्मयप्रकाराला तोंड फुटल्यासारखे झाले.
त्या काळातील महार जातीचे, त्यांच्या दुःखभोगाचे स्वरुप किती भयावह व भीषण होते याचे चित्रण १९८१ मध्ये प्रकाशित झालेल्या शंकरराव खरात याच्या ‘तराळ अंतराळ’ या आत्मकथनातून पहायला मिळते. महार समाजातील येस्करकी, गावकीची काठी अशा अनेक प्रथा व चालीरीती ह्या संबंधाने खरातांनी त्यात लिहीले आहे. नानासाहेब झोगडे यांचे ‘फांजर’ हे आत्मकथन १९८२ मध्ये प्रकाशित झाले. दादासाहेब मल्हारी मोरे यांचे ‘गबाळ’ हे आत्मकथन १९८३ मध्ये प्रकाशित झाले. रुस्तुम आचलखांब यांचे ‘गावकी’ हे १९८३ सालीच प्रसिद्ध झाले. पार्थ पोळके यांचे ‘आभरान’ हे आत्मकथन १९८४ मध्ये प्रकाशित झाले. शरणकुमार लिंबाळे यांचे “अकरमाशी १९८४ साली प्रसिद्ध झाले. ‘झळा’ हे ल. स. रोकडे याचे आत्मकथन १९८६ मध्ये प्रसिद्ध झाले. भीमराव गस्ती यांचे ‘बेरड’ हे आत्मकथन १९८७ मध्ये प्रकाशित झाले. लक्ष्मण गायकवाड याचे ‘उचल्या’ हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले. ना. म. शिंदे यांचे ‘जातीला जात वैरी’ हे आत्मकथन १९९०-९१ च्या दरम्यान प्रकाशित झाले. द. शि. सवाखंडे यांचे ‘मरणकळा’ हे आत्मकथन १९९३ मध्ये प्रकाशित झाले. ही काही महत्वाची व गाजलेली आत्मकथने. या वाटचालीत किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्ह्याट्याचं पोर’, आर.के.त्रिभुवन बांचे ‘दे दान सुटे गिर्हाण, वैजनाथ कळसे यांचे ‘ऐरणीच्या घणा, प्रल्हाद चेंदवणकरांचे ‘टाच’, गौतम कांबळे यांचे ‘बावळट’, भीमराव जाधव यांचे आत्मकथा-काटेरी तारेच्या कुंपणाची’, चंद्रकांत जाधव यांचे ‘ढगाआडचा चंद्र’, राव झुंजारे यांचे ‘झुंज’, रतनलाल सोनग्रा यांचे ‘सोनजातक’, कवितेच्या स्वरुपात सिद्ध झालेले राम दोतोंडे यांचे ‘जेव्हा रापी बोलू लागते’, प्रा. केशव मेश्राम यांचे ‘हकिगत आणि जटायू’ हे कादंबरीसदृश आठवणींचे पुस्तक आणि डॉ. नरेंद्र जाधव यांचे १९९३ मध्ये प्रकाशित झालेले ‘आमचा बाप आन् आम्ही’ आदींचा उल्लेख करता येईल.
लहानमोठी पन्नासेक आत्मकथने १९७८ ते १९९८ या वीस वर्षाच्या कालावधीत ग्रंथरुपाने प्रसिद्ध झाली. काहींची खूप चर्चा झाली. ती गाजली त्यांच्या गुणवत्तेमुळे. त्यांनी मराठी साहित्याला श्रीमंत केले. दलित आत्मकथनाच्याच नव्हे तर एकूण मराठी साहित्याच्या क्षेत्रात ती मैलाचा दगड ठरली “दलित आत्मकधनामुळे दलितांच्या समस्यांची आणि अनुभवांची चर्चा झाली. दलितांच्या भयावह जगण्याची वाचकाला जाणीव झाली. आपण कसल्या सडक्या समाजव्यवस्थेत जगत आहोत याचे वाचकाला भान आले. कलावादाची भाषा मागे पडली. मानवी जीवनाला महत्त्व आले. दलित साहित्यामुळे दलितांकडे पाहण्याची दृष्टी बदलली. साहित्यामध्ये पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, ईश्वर-धर्म आणि निसर्गाचे जे स्तोम माजले होते ते कमी झाले आणि माणसाची महत्ता वाढीस लागली. दलित आत्मकथा मानवी जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या.
या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र जाधव यांनी ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे आत्मनिवेदनपर पुस्तक स्वरुपात साहित्यविश्वात आणले. बदलत्या समाजाचा ‘मूड’ अचूक ओळखला गेल्याने त्याचे प्रचंड स्वागत झाले. मराठी साहित्य व प्रकाशन विश्वात तो एक चमत्कार जला। डॉ. नरेंद्र जाधव यांचे पुस्तक दलित आत्मकथनाच्या ओळीतले आहे, एवढेच त्याबाबत म्हणता येईल. एरवी या पुस्तकाने सर्वस्वी नवा बाज घेतला. ते प्रसिद्ध झाले त्या दिवसापासून त्याचे हे वेगळेपण कळू लागले. ते जसे स्वतः डॉ. जाधव ह्यांना कळले होते, तसे ‘ग्रंथाली’ला देखील कळले असावे. कारण पहिली आवृत्ती प्रकाशित झाली त्या दिवशी सव्वाशे रुपये किमतीचे हे पुस्तक ‘ग्रंथाली’ने केवळ पंचवीस रुपयाला प्रत याप्रमाणे विकले. पुस्तकाची गुणवत्ता अशी पहिल्या दिवसापासून सिद्ध होत गेली. पुढे, दहा वर्षे हे पुस्तक लोकांना भिडत आणि त्याबरोबर स्वतः घडत गेले. त्या ओघात, पुस्तकातील गुणविशेष प्रकट होत गेले. ती जशी एका कुटुंबाची कहाणी आहे असे जाणवले तसे त्यातून शंभर वर्षांचा सामाजिक इतिहास सूचकपणे प्रकट होतो असेही ध्यानात आले. पुस्तकाची महत्ता सतत अशी वाढत गेली. चांगल्या वाड्मयकृतीचा हा विशेष असतो, की त्याचे पैलू दिवसेंदिवस, व्यक्ती-व्यक्तीगणिक प्रकट होत राहतात.
‘आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रथम २ डिसेंबर १९९३ रोजी झाले. त्यानंतर दुसरी आवृत्ती ३० ऑक्टोबर १९९४ रोजी प्रकाशित झाली. डिसेंबर १९९६ पासून १४ एप्रिल २००७ पर्यंत या पुस्तकाची २५ पुनर्मुद्रणे झाली आहेत आणि १९ नोव्हेंबर २००७ रोजी अहमदनगर येथे सिनेनाट्य अभिनेते निळुभाऊ फुले व उद्योगपती भवरलाल जैन यांच्या हस्ते जनावृत्तीचे प्रकाशन झाले. विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबर २००५ रोजी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्ली येथे या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे। या स्वकथनाचे रुपांतर जगातील विसाहून अधिक भाषांमध्ये होऊन जागतिक किर्तीचा उच्चांक गाठला गेला आहे. कोरियन भाषेत या पुस्तकाच्या चार महिन्यांत लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या. या पुस्तकाच्या संदर्भात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, डॉ. यशवंत मनोहर, रावसाहेब कसबे, प्रेमानंद गज्वी आणि अनेक मान्यवरांनी अभिप्राय दिला आहे. ‘भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आपल्या भाषणात या पुस्तकासंदर्भात म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायण यांच्याप्रमाणेच, डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे. यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे, सुखासमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे. डॉ. जाधव यांनी लिहीलेल्या आत्यकचरामपूर आपल्याला सामाजिक आणि राजकीय दृष्टी प्राप्त होईल; आपले शिक्षणविषयक धोरण साकार करतानाही या पुस्तकाचा उपयोग होईल. (आमचा बाप आन् आम्ही /मलपृष्ट भाष्य/जनावृत्ती १९ नोव्हेंबर २००७)
निळूभाऊ फुले यांनी ‘मराठी साहित्याला’ साने गुरुजींची ‘आई’ तर डॉ. नरेंद्र जाधवांनी ‘बाप’ दिला आहे” असे गौरवोद्गार काढले आहेत येथे ‘आई’ आणि ‘बाप’ या प्रतिमांचा खुलासा करायला हवा. हे खरेच, की साने गुरुजींच्या ‘आई’ने गेली साटा दशके मराठी मनावर मोहिनी घातली. ती संस्कारशील, प्रेमळ माता ‘रोल मॉडेल’ बनून गेली. तिने मुलावर ममता करावी, पण त्याला शिस्तीत ठेवावे-चांगुलपणा शिकवावा, आपले सर्वस्व त्या मुलात ओतावे आणि तरी स्वतःचे एक वेगळे विश्व असल्याचा भास निर्माण करावा अशी काहीवरी, ‘प्रेमस्वरुप, वात्सल्यसिंधु’ आई ती आहे. त्या काळाला अनुरुप अशीच आईची ही प्रतिमा आहे, आणि म्हणून तिने निर्माण केलेला मूत्यभाव तीस-चाळीस वर्षे टिकला व नंतर, ती आईचे ‘मिथ’ बनून राहिली.
नरेंद्र जाधवांचा अडाणी बाप असाच काळाच्या योग्य टप्प्यावर आर्जवी-आग्रही-हट्टाग्रहीदेखील बनला. त्याने शिक्षणाच्या मंत्र अचूक उचलता. त्याने स्वतःला शक्य तेवढे व्यवहारामधून शिक्षण मिळवलेच, पण मुलांना ते मिळेल आणि त्यातून ती सद्वर्तनी व शहाणी होतीत असे पाहिले. ‘मुलाला शाळेत प्रवेश मिळाला आणि आमच्या प्रगतीची सुरुवात झाली’ हे बापाचे बोल सद्यकाळाची अचूक माहिती सांगणारे व भविष्यकाळाचा वेध घेणारे आहेत. बापाने या काळाचा मंत्र ओळखता आणि तो काळापेक्षा मोठी प्रतिमा होऊन आपल्यासमोर उभा ठाकला. श्यामच्या आईसारखाच जेडी, नरेंद्र, दिनेश व सुधाकर यांचा बाप मिथ होऊन मराठी साहित्यात अजरामर बनणार आहे. खरे म्हणजे हा केवळ डॉ. नरेंद्र जाधव यांचा व त्यांच्या बापाचा गौरव नसून तमाम दलित-बहुजन समाजाचा ‘बाप’ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव आहे, कारण जाधवांच्या बापाला प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती आणि त्यापुढेही जाऊन असे म्हणावेसे वाटते, की १९९३ पासून ते २००७ पर्यंत ‘आमचा बाप आन् आम्ही’ या पुस्तकाने आंबेडकरी चळवळींचा विजयोत्सव साजरा केला आहे.
आमचा बाप आन् आम्ही हे बाप म्हणजे दादा आणि लेखक म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव या दोन व्यक्तीभोवती पुस्तकाचा मोठा ऐवज उभा असला तरी इतर अनेक सहलेखक व्यक्ति आपापल्या परीने त्या ऐवजातला अधिक ठळक करत जातात आणि एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र आकृतिबध्द कोलाज वाचकासमोर उभा राहतो.
डॉ.नंदा केशव मेश्राम दामोदर रुंजाजी जाधव वा ‘टापच्या वाप’ विषयी म्हणतात, “आपल्याला सोयीस्कर आणि चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचाच अधिकांशाने उल्लेख केला जाण्याचा धोका आत्मचरित्र आणि आत्मकधनांमध्ये अधिक संभवतो ‘आमचा बाप आन् आम्ही या आमकधनामध्ये दामू रुंजा जाधव यांनी मात्र आपले आत्मचरित्र निखालस, निरपेक्षपणे मांडलेले आहे हे त्याचे महत्त्वाचे मूल्य आहे. त्यांनी आपल्या जीवनात घडलेल्या घटना काटेकोरपणे सन-दिवस याचा उल्लेख करुन कालक्रमानुसार रेखाटल्या आहेत. दामोदर रुंजाबा जाधव यांच्या अनुभवनिष्ठ कथनातून अर्थपूर्ण वास्तव्य व्यक्त झाले आहे. त्यामुळे आत्मचरित्र आणि आत्मकथन यांतील संभाव्य धोके या पुस्तकांत आढळत नाहीत.” हे आज सुज्ञ वाचक मान्य करेल.
डॉ. शरणकुमार लिंबाळे म्हणतात, “बाप लौकिक अर्थाने अडाणी असूनही प्रगल्भ बुद्धीचा होता. आपल्या मुलांनी यशाचे शिखर गाठले पाहिजे, अशी बापाची तळमळ आहे. ‘असा चोर हो की दुनियाने सलाम केला पाहिजे, असा जुगारी हो की लोकानी नाव काढलं पाहिजे. काय वाट्टेल ते कर पण टॉपला जाण्याचा प्रयत्न कर (पृष्ठ ११)” ‘बाप’ आपल्या मुलाला टॉपला जायला सांगतो त्यासाठी वाट्टेल ते कर म्हणतो. ह्याचा अर्थ वैध-अवैध मार्गाचा अवलंब कर असा होत नाही. तू चोर हो किंवा जुगारी हो, पण दुनियाने सलाम केला पाहिजे ही अपेक्षाही शब्दशः घेता येत नाही. ही विधाने ‘बापा’च्या एकंदर स्वभावाच्या मुशीतून आलेली आहेत. आपल्या मुलांनी जीवनातले सर्वोच्च स्थान काबीज केले पाहिजे ही बापाची अपेक्षा आहे. जो बाप अंधरुण आणि पांघरुण म्हणून वर्तमान पत्रे घेऊन झोपतो, त्याची ही स्वप्ने आहेत. त्यामुळे ही स्वप्ने दुर्मीळ आणि दुर्दम्य वाटतात” यात काही शंकाच नाही. तसेच, “आपल्या मुलाने संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवून ब्राम्हणांची चांगली जिरवली ह्याचे ‘बापा ‘ला समाधान वाटते.” कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यतेमुळे संस्कृत शिकता आले नव्हते याची सल बापाला अस्वस्थ करताना दिसते. खरे म्हणजे, ही रात संपूर्ण बहुजन समाजाला होती. कारण म्हणजे संस्कृत ही देवांची भाषा आणि ती शिकण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना होता. त्यातून ब्राह्मणांचे अर्थशास्त्र आपल्या लक्षात येते. बहुजन समाजाचा सुदैवाने म्हणा वा काळाचा महिमा म्हणा, ही ‘संस्कृत’ व्यवहारातूनच गेली आहे !
ज्या भाषेने बहुजनांना विकासाची दारे खुली केली त्या भाषेत तरी बहुजनांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या पाहिजेत आणि हाच मार्ग ‘आमचा बाप आन् आम्ही’ या आत्मकथनाने दाखवला आहे. “वडील वडील म्हंता, ते भेंडीच्या भाजीवानी बुळबुळत लागतयं (पृष्ठ ८)” ‘बाप’ ‘झनझनीत जगण्याचा’ वाटेकरी आहे. त्याला बुळबुळीतपणा आवडत नाही. ‘बाप’ आपल्या मुलाच्या इंग्रजी वाचनाने चकित होतो आणि त्याला लस्सी पाजतो. अशी आहे बापाच्या अभ्यासाची मेथड बापाची शिक्षणाविषयीची समज दांडगी आहे बाप म्हणतो, ही डिग्री म्हंजी ड्रायवर गाडी चालवायचं बंद करतो का? (पृष्ठ ३२) किती साध्या सोप्या भाषेत बापाने शिक्षणाची व्याख्या केली आहे. आणि म्हणून डॉ. लिंबाळे म्हणतात त्याप्रमाणे “बुटापासून भाषेपर्यंत लस्सीपासून नानकटाईपर्यंत, गधठ्यापासूर डॅमलाडी बिस्कीटपर्यंत, युनियमपासून केबिनमपर्यंत, बिगारीपासून बापापर्यंत, रोखेन (भिसीबाबा) पासून सोनूपर्यंत, दामोदर जाधवांपासून शडेफळापर्यंत, ओझरपासून अपूर्वापर्यंत अशा अनेक नजरांनी ‘आमच्या बापा’ला न्याहाळावं लागेल, तरच त्यांचे समग्र सौंदर्य कळेल.” यात शंका नाही.
Show Less