
आमचा बाप आन आम्ही
सर्व कष्ट सोसत, दारिद्र्य वागवत, रात्र रात्र जागवत अभ्यास करणारी, त्यांची ध्येयवेडी मुलं त्या आईबापांची कूस उजळवून टाकणारी निघाली, हे त्यांच्या अखंड परिश्रमाला आलेलं फळ. ‘आमचा बाप आन् आम्ही’ हे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र, एक व्यवहाराचा व्याप नसला तर एका बैठकीत संपवावे असे प्रवाही आहे, किंबहुना एकदा हातात घेतले की, शेवटपर्यंत सोडवत नाही.