या पुस्तकात इंडस्ट्री ४.० ते ५.० ज्या तंत्रज्ञानांवर आधारलेली आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानांची
Read More
या पुस्तकात इंडस्ट्री ४.० ते ५.० ज्या तंत्रज्ञानांवर आधारलेली आहे त्या सगळ्या तंत्रज्ञानांची सोप्या भाषेत पण सखोल ओळख करून दिली आहे. इंडस्ट्री ४.० – इतिहास AI म्हणजे काय? रोबॉटिक्स एक्स्पर्ट सिस्टिम्स मशीन लर्निंग-डीप लर्निंग AI चॅटबॉट्स चॅटजीपीटी (ChatGPT) बिग डेटा इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIOT) ऑग्मेंटेड रिॲलिटी (AR) व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) ३D-४D प्रिंटिंग ब्लॉकचेन आणि बिटकॉइन्स ५G इंडस्ट्री ४.०
खुप सोप्या पद्धतीने व दैनंदिन उदाहरणांसह बदलत्या Technology ची ओळख करुन दिली . तुम्ही दिलेल्या या माहिती मुळे भविष्याकडे बघण्याचा नजरीयाच बदलला. पुढील पिढीसाठी या माहितीचा सकारात्मक उपयोग .
चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे काय ? ती नेमकी कशी असणार आहे ? येत्या काळात काय बदल होणार आहेत ? या बदलांना सामोरं कसं जायचं ? नोकऱ्या जाणार की राहणार ? Artificial Intelligence म्हणजे काय ? Big Data आपल्या जीवनावर कसा प्रभाव टाकतोय ? Robots आपली सगळीच कामं करणार का ? 5G तंत्रज्ञानाची गरज काय ? Web 3, Blockchain, IOT, 3D Printing सोप्या भाषेत समजेल असं कुणी सांगेल का ? येत्या काही वर्षात “एवढं” सगळं बदलणार आहे ! जाणून घ्या !
मराठीला खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनविणारे प्रसिद्ध लेखक श्री.अच्युत गोडबोले यांनी Netbhet Talks मध्ये प्रेक्षकांना करवून आणला “भविष्याचा” प्रवास ! आगामी तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम यापेक्षा सोप्या भाषेत कुठेच शिकायला मिळणार नाहीत !
Show Less