ओम संतोष अहिरे (मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका नांदगाव जिल्हा नाशिक
Read More
ओम संतोष अहिरे (मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तालुका नांदगाव जिल्हा नाशिक )
ह्या पुस्तकात उन सावली नावाचा एक धडा आहे . त्या धड्यातील हे दर्शवणारे चित्रण कुशल आहे .त्या धड्यातील हे दर्शवणारे चित्रण कुशल आहे , सुंदर आहे. कि विजय हा एक प्राध्यापक म्हणून होता. आणि विजयचे वडील मरण पावल्यानंतर आईचे स्वप्न होते कि विजय स्वताच्या पायावर उभा राहावा . आणि विजय प्राध्यापक होतो तेव्हा त्याच्या आईला म्हणजेच यशोदा बाईला खूप आनंद होतो .आणि त्या आनंदाने ती खुश होते . आणि जेव्हा विजयचे लग्न होते आणि नंतर त्याला नंतर मुलगी होते .
त्यानंतर विजयची नोकरी जाते त्यावेळी त्याच्यासह त्याची पत्नी व आई हे तिघेही उन्हात पडतात .आणि थोडेसे खचून जातात. पण हार मानत नाही.तो उद्विग्न अवस्थेत घरी
परतला . त्याच्या निस्तेज मुद्रेकडे पाहून सुजाता च्या छातीत धडकी भरते. अनेक प्रश्नांनी विजय गोंधळून गेलेला होता.आणि ते जेव्हा आर्थिक विवंचनेत कसेबसे दिवस जात होते .पोटासाठी किती दिवस आटापीटा करावा , याला मर्यादा नव्हती. तरीही परिस्थितीशी झुंज सुरु होती. अनेक मित्रांच्या सहकार्याने कोचिंग क्लासेस काढावा असा निर्णय घेतला.आणि विजयश्री कोचिंग क्लासेस प्रारंभ करून विजय नव्या दमाने कामाला लागला. सुजाता हि त्याला मदत करत होती. याचा धावपळीत त्याने सेट ची परीक्षा दिली.गावात विजयश्री क्लासेस चा बोलबाला झाला. विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चमकू लागले. आर्थिक बाजूही भक्कम होऊ लागल्या. गावात त्याच्या खाजगी क्लासेसचा बोलबाला झाला.विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चमकू लागले.गावात अनेक क्लासेसचे पेव फुटले होते.प्रारब्ध लपाछपी खेळत होता .विजय व सुजाता नशिबाशी सामना करीत होत्या.
त्या दिवशी विजय अजून घरी आला नव्हता,सुजाता काळजीत होती. नको त्या विचाराने तीच मन कासावीस होत होत.दिपाली त्याची मुलगी बाहेर खेळायला गेली होती.विजयनी घरात प्रवेश केला. त्याच्या मुद्रेवर प्रसन्नता दिसत होती. विवंचनेत दिसणारा नवरा खुशीत पाहून तिला.कुतूहल वाटले. सुजाता मी सेट परीक्षा पास झालो. असे त्याने तिला सांगितले. काही दिवसातच महाविद्यालात रुजू होण्याचा आदेश त्याला प्राप्त झाला. विजयच्या संसारात नवचैतन्य प्राप्त झाले.सुजाताच्या सुजाताच्या शाळेला अनुदान मिळाल. तिचाही पगार नियमित होऊ लागला.त्याने शहराच्या नव्या वसाहतीत टुमदार बंगला बांधला.जीवनातील सर्व सुख विजय भोगू लागला. उमेदीची काही वर्ष धग धगत्या निखार्यातून सलाउन निघाली होती.विजयच्या आयुष्यात अनेक वादळे आली व गेली . पण तो स्थितप्रज्ञ
राहिला. सुजाताने केलेला त्याग हि संघर्षाची दुसरी बाजू होती.उन्सावालीच्या लपंडावात विजय जिंकला होता .नियती हरली होती.त्यामुळे म्हणतात कि देव तरी त्याला कोण मारी. कितीही संकटे आली तरी आपण हर मानायची नाही. संकटे येतात हि आणि जातात हि.आपण फक्त प्रयत्न करीत राहायचे.आपण संकटाला पळवून देवू शकतो. आणि उनसावली हे पुस्तक आणि त्याच्यातला मला आवडणारा हा धडा खूप छान सुंदर देखील आहे.प्रत्येक संकटाला मात्त देणे आणि शिक्षणाच्या महत्व वडील गेल्यानंतर जीवन आणि मनात असलेले चांगले विचार व इतर सर्व गोष्टी या धड्याद्वारे मला शिकण्यास मिळाल्या .
Show Less