
ऍटोमिक हॅबिट्स
पुस्तकाचे नाव : ऍटोमिक हॅबिट्स
लेखक : जेम्स क्लियर
Book Reviewed by: माधुरी ज्ञानेश्वर नाठे
Class : एस.वाय.बी.एस्सी
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
“ॲटॉमिक हॅबिट्स” हे जेम्स क्लियर यांचे एक अत्यंत प्रभावी पुस्तक (कादंबरी) आहे. जे आपल्याला जीवनातील छोटे बदल कसे मोठ्या यशामध्ये रूपांतरीत होऊ शकतात हे शिकविते. ॲटॉमिक हॅबिट्स यामध्ये लेखकाने साध्या, पण अत्यंत प्रभावी तंत्राचा वापर करून हॅबिट्सच्या शक्तीला प्रकट केले आहे .या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांचे पालन करून, आपले व्यक्तिमत्व आणि जीवन प्रवाह सहजपणे सुधारता येऊ शकतो. “ऑटोमिक हॅबिट्स” हे पुस्तक ‘छोट्या सवयी’ आणि त्याच्या परिणामावर आधारित आहे. जेम्स क्लिअर यांच्यामते, कोणत्याही मोठ्या यशाची सुरुवात लहान आणि सामान्य सवयींमधून होते. त्याच्या या पुस्तकात त्यांनी चार महत्त्वाच्या सिद्धांताची मांडणी केली आहे जे जीवनातील सवयींना बदलण्यास आणि आपल्या इच्छित उद्दिष्ट गाठण्यास मदत करतात.
१. सुलभता (Make it obvious), २. आकर्षकता (make it attractive),
३. सोपी करणे (Make it easy), ४. प्रेरणा (Make it satisfying) .
या सिद्धांताचा वापर करून आपण आपल्या सवयीमध्ये बदल घडवू शकतो आणि शारीरिक तसेच मानसिक दृष्टिकोनातून अधिक चांगले जीवन जगू शकतो. क्लियर यांच्या मते, प्रत्येक मोठ यश एक छोटी सुरुवात असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जी वजन कमी करायचे आहे, ती 100 किलो वजनातून 50 किलो पर्यंत जाऊ इच्छित आहे, ती एकाच वेळी मोठे लक्ष धरण्याऐवजी, रोज थोड्या थोड्या प्रमाणात शारीरिक व्यायाम करणे, जे एक छोटी सवय बनवणे हे अधिक प्रभावी आहे. या लहान सवयींचा प्रभाव दीर्घकालीन बदलांमध्ये रूपांतरित होतो, कारण आपले शरीर आणि मन त्या सवयींच्या प्रभावाखाली येतात आणि आपल्याला सहजपणे एक मोठा बदल दिसतो.
जेम्स क्लियर आपल्याला सांगतात की सवयी फक्त छोटे पाऊले असतात, परंतु ती जेव्हा टिकून राहतात आणि नियमितपणे केले जातात, तेव्हा त्या मोठ्या बदलात रूपांतरित होतात दिसून येतात. पुस्तकात यासाठी विविध उदाहरणे दिली आहेत जिथे छोटे बदल कसे आपल्याला जीवनात मोठ्या आणि सकारात्मक बदलांना जन्म देतात. “ऑटोमिक हॅबिट्स’” मध्ये लेखकाने काही अत्यंत प्रभावी तंत्रांचा समावेश केला आहे, ज्यामुळे आपल्या सवयी बदलण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते. यामध्ये ‘स्मॉल विंग्स’ किंवा लहान विजयांची महत्त्वाची भूमिका आहे. छोटे, साधे, आणि साधारण असलेले लक्ष ठेवून आपण आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांची प्राप्ती करू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज एका पुस्तकाच्या 100 पानांचे वाचन सुरू केले, तर महिन्याच्या अखेरीस तुम्ही 300 पानांचे वाचन करू शकाल. ही एक छोटी आणि सुलभ सवय आहे जी तुमच्या वाचनाची क्षमता वाढवेल आणि तुम्हाला एक मोठ्या प्रमाणात मिळवता येईल. सवयी कायम ठेवण्यासाठी प्रेरणा आणि सुसंगता यांचे महत्त्व अत्यंत महत्वाचे आहे. क्लियर आपल्या पुस्तकात सांगतात की, सवयी फक्त आपल्याला प्रेरणा देऊन किंवा स्वतःला सक्ती करून घेऊ शकत नाहीत. सवयीला टिकून ठेवण्यासाठी त्याची साधी, सोपी आणि आकर्षक बनविण्याची आवश्यकता आहे. क्लिअर म्हणतात, आपली सवय तुमच्या आयुष्यात एक साधा भाग बनवावी लागते, म्हणजेच तुम्ही त्याला तितक्याच सहजपणे आणि स्वाभाविकपणे स्वीकारले पाहिजे. जसे की, श्वास घेत आहात किंवा झोपेत जात आहात.
त्याचप्रमाणे चुकता – चुकता शिकण्याची प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या सवयींचे मूल्यांकन कधीही न करता, त्या सवयींना जोपासा आणि स्वीकार करण हे जीवनामध्ये मोठे बदल घडवू शकतात. हे पुस्तक केवळ त्या व्यक्तींना मदत करते, ज्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी बदल घडवायचा आहे, पण ते प्रत्येकाला सांगते की छोट्या गोष्टींचा किती मोठा प्रभाव होऊ शकतो. क्लियर यांच्या सांगण्याप्रमाणे, आपल्या सवयी ज्या क्षणापासून बदलू लागतात, त्या क्षणापासूनच आपल्याला भविष्यातील मोठे बदल दिसायला लागतात. या पुस्तकातील विचार आपल्या आयुष्यातील सवयी बदलण्याच्या दृष्टिकोनातून एक अमूल्य मार्गदर्शन प्रदान करतात.