काठमांडूतील कर्दनकाळ01/
By सत्यजित रे
काठमांडूतील कर्दनकाळ हे पुस्तक मी आमच्या कॉलेजच्या लायब्ररी मधून घेतले होते. अत्यंत उत्कंठावर्धक व जागेवर खेळवून ठेवणारे हे पुस्तक मला प्रचंड आवडले. हे पुस्तक सत्यजित रे लिखित फॅन्टॅस्टिक फेलुदा पुस्तक मालिकेतील असून अत्यंत वाचनीय आहे. याचा मराठीतून अनुवाद अशोक जैन यांनी अत्यंत सुंदर केलेला आहे.
लेखक: सत्यजित रे

या पुस्तकामध्ये कोलकात्याच्या एका हॉटेलमधील अनोळखी इसमाच्या खुनाचा माग काढत फेलूदा व त्यांचे मित्र काठमांडूत येतात त्यांचा जुना शत्रू मदनलाल मेल याचा माघ काढत थेट गुहेत येऊन पोहोचतात. स्वयंभू नाथ येथे घडलेली घटना प्रार्थना चक्राचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर आकस्मिक छापा कॅसिनोतील एक थरारक रात्र आणि एल एस डी मुळे झालेल्या जटायूंची घनचक्कर अवस्था सर्व गोष्टींमुळे हे साहस भलताच रंजक रोचक व रोमहर्षक होऊन जातं. अखेर संसनाटी उत्कर्ष बिंदू वेळी चलाख फेलुदा नकली औषधांचा घोटाळा उघडकीस आणून पुन्हा एकवार यशस्वी होतो.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन तरुणांच्या सर्वच वाचक वर्गाला घेऊन ठेवणाऱ्या या कथेला उत्तम दाद ही उत्कंठावर्धक कथा आयुष्यभर माझ्या लक्षात राहील हे नक्की!!!