
कौटिलीय अर्थशास्त्राचा परिचय
By वसुंधरा, वसुंधरा पेंडसे नाईक
कौटिलीय अर्थशास्त्र हा ‘राज्य’ या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक विषयाचा अत्यंत सखोल व सर्वांगीण विचार करणारा राज्यशास्त्रावरील एक अमूल्य ग्रंथ. भूमी संपादन करून तिचे रक्षण कसे करावे, त्या भूमीवर वसणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी काय करावे, त्यांचे रक्षण कसे करावे, त्यांचे नियंत्रण करण्यासाठी राज्यकारभार कसा करावा, राज्ययंत्रणा कशी उभारावी, ती शक्यतो निर्दोष होण्यासाठी कोणते उपाय योजावेत, शत्रूला कसे जिंकावे…. राजनीतिशास्त्रातील अशा अनेक विषयांचे विवेचन करताना ‘मनुष्यस्वभाव’ हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक सतत नजरेपुढे ठेवल्यामुळेच सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी रचलेला हा ग्रंथ आजही लक्षणीय ठरला आहे. रसायनशास्त्रापासून रत्नपरीक्षेपर्यंतच्या विविधांगी ज्ञानाचा व्यासंगपूर्ण खजिना ज्या कौटिल्याने सर्वांना उपलब्ध करून दिला त्याच्या अनन्यसाधारण बुद्धिमत्तेमुळे आणि अलौकीक