गांधी नावाचे महात्मा
By किणीकर रघुनाथ रामचंद्र
या पुस्तका मध्ये अत्यंत साधी व सोपी मराठी भाषेत आहे. हे पुस्तक वाचायला आणि समजायला सोपे समजते या पुस्तकामध्ये गांधीजींच्या कार्या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
मी वाचलेले व मला सर्वाधिक प्रिय असणाऱ्या पुस्तकाचे नाव गांधी नावाचे महात्मा आहे. हे पुस्तक भारतातील स्वातंत्र्यलढ्यातील वीरा बद्दल आहे.
हे पुस्तक गांधीजींच्या जन्मापासून व मृत्यूपर्यंत त्यांनी काय कार्य केले व कोणती चळवळी राबवल्या त्याबद्दल लिहिलेले आहे. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. त्यांच्या आईचे नाव पुतळी बाई व पत्नीचे नाव कस्तुरबा असे आहे. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी झाला. ते एकाच वयाचे होते. त्यांच्या विवाह नंतर तब्बल चार वर्षानी त्यांचे वडिल निधन पावले व त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून सावरून त्यांनी दोन वर्षानी ते मॅट्रिक ची परिक्षा उत्तीर्ण झाले. मॅट्रिक ची परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची इच्छा होती बॅरिस्टर होण्याची ते बॅरिस्टर पदवी मिळवण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. त्यांनी चार वर्षानी बॅरिस्टर पदवी प्राप्त करून घेतली. आणि ते आपल्या भारतभूमी वर परतले. त्यांच वर्षी त्यांच्या मातोश्री निधन पावल्या त्यांच्या घरावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. त्या दुःखातून सावरून त्यांनी वकिल होण्याचे ठरवले वकिलांचे शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला गेले. व त्यांनी आपले वकिलांचे शिक्षण सुरु केले.
या पुस्तकामध्ये गांधीच्या बद्दल बंरच काही लिहिले आहे. त्यांनी केलेली कार्य केले. त्याबद्दल लिहिले आहे. गांधीजींना १० मार्च १९२२ रोजी अहमदाबाद येथे अटक झाली. व त्यांना सहा वर्षींची कैद झाली त्यांची सुटका ५ फेब्रुवारीला रोजी सुटका झाली. १२ मार्च १९३० रोजी दांडी येथे ७२ सत्याग्रही समवेत मिठाचा सत्याग्रह केला. २९ जुलै १९४६ रोजी मुस्लिम लीगचे पाकिस्तान मागणीचे आंदोलन सुरू केले. ३ जून १९४७ जवाहरलाल वगैरे फाळणी मान्य केली १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र मिळाले आपला देशा ब्रिटिशांच्य त्यांब्यातून सुटला त्यांचबरोबर आपल्या शेजारील देश पाकिस्तान यांची निर्मिती झाली फाळणीविरोधात देशभर हिंदू -मुस्लिम समाज यांच्यात दंगली घडवून आल्या, १३ जानेवारी १९४८ रोजी गांधींचे बेमुदत उपोषण सुरू झाले पाकिस्तान सरकारला ५५ कोटी रु द्यावेत ही मागणी केली. व त्यानंतर ती मागणी मान्य झाली १६ जानेवारी १९४८ रोजी त्यांनी उपोषण सोडले ३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळच्या प्रार्थनासभेत ६ वाजण्याच्या सुमारास नथुराम गोडसेने गांधींवर गेळ्या झाडल्या व गांधीचा मृत्यू झाला.
गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी अनेक भारतातील महापुरुषांनी आपले बलिदान दिले. या महान मानवाने आपल्या जन्मापासून व मृत्यूपर्यंत आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांनी ब्रिटिशांन विरुद्ध त्यांनी छोडो भारत आणि चले जाव असे आंदोलनाच्या वेळी घोषणा दिल्या या पुस्तकामध्ये बरेच काही लिहिलेले आहे हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवे या पुस्तकातील मला आवडलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे जे या धरतीची मनापासून सेवा करतात तेच यशाचे खरे मानकरी आहेत.
ही युगयुगांची आहे अक्षरयात्रा
एकदाच भरते स्मशानातली जत्रा ।
खाद्यांवर घेऊनि शव फिरतो हा जन्म
राखेत अश्रूला फुटला हिरवा कोंब ॥