कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर १९५४ साली आचार्य अत्रेंनी
Read More
कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला अण्णासाहेब आवटे कॉलेज ,मंचर
१९५४ साली आचार्य अत्रेंनी लिहलेली ही एकमेव स्वतंत्र कादंबरी आहे. चांगुणा ही कादंबरी लिहताना लेखकाने चित्रपटांचे तंत्र वापरले आहे. त्यामुळे या कादंबरीला विलक्षण वेग आला आहे. या कादंबरीतील कथा ही केवळ चांगुणेची कथा न राहता ती अनेक दरिद्री स्त्रीयांची कहाणी बणून जाते. चांगुणा ही अनेक दरिद्री, समाजाच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीयांची प्रतिनीधी वाटते. या कादंबरीतून लेखकाने शासनाचे धोरण कसे माणुसकीला पारखे झालेय हे दाखवून दिले आहे. तसेच मानवी मनाची कठोरता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व कारणांमूळेच चांगुणा वैफल्यग्रस्य बनते आणि आत्महत्या करण्यास तयार होते.
या कादंबरीत प्रखर सामाजिक जाणीव दिसते. कादंबरीत लालित्यपूर्ण लेखन आढळले, तर व्यक्तिचित्रणावर अजिबात भर दिसून नाही. घटना कृती आणि परिणामात सारी कादंबरी प्रवास करताना दिसते. कोणती तरी एक घटना घेतली जाते आणि लगेच तिचे परिणाम येत राहतात. त्यामूळे रचनेच्या दृष्टीने गतीमानता दिसून या कादंबरीचे सौंदर्यच मूळी गतीमानतेत आहे. कादंबरीत नव्या पात्रांना कृतीचा हव्यास आहे, कथानकाला डौलदारपणा आहे तर आशयाला समतोलपणा आहे वास्तवाला तोलणारी भाषा आहे. कादंबरीच्या भाषेवर चित्रपट, नाटकातील संवादात्मक भाषेचा प्रभाव दिसतो.
‘चांगुणा’ ही या अभागिनीच्या हतभागी जीवनाची शोकविव्हल कथा आहे. त्या दुदैवी पोरीच्या भग्न जिवनाचा हृदयाला पीळ पडणारा तो करुण इतिहास आहे. सासवड जवळील चांबळी हे शे-दोनशे उबऱ्याचे गाव. तिचा बाप राघू कामटे हा जातीने मराठा, शेती व्यवसाय करणारा, चांगुणा ही त्यांची धाकटी लेक. सर्वांची लाडकी, वय साडेतेरा, चांबळी नदीच्या अलिकडच्या काठावर चांगुणेचे घर. पलिकडच्या काठावर बाणेश्वराचे देऊळ. या देवळात सांजसकाळ पूजा करणारा गुरवाचा शंकर आणि सुताराची चंद्री हेच काय ते चांगुणेचे सोबती. चांगुणा लघनपणापासून व्रात्य व खेळकर. फुलांचे तिला भारी वेड. शंकरला आणि तिला ऐकमेकांची ओढ. दोघेही वयाने अजाण नि मनाने निष्कपट, त्यामुळे या ओढीत निर्मळ जिव्हाळया खेरीज अधिक काहीच नव्हते.
मधमाशाचे मोघेळ पाहून चांगुणा मधाचा हट्ट धरते. शंकर मोहळाला दगड भारतो. माशांचा थवा त्यांच्या मागे लागतो. घाबरून दोघेही देवळात शिरतात. व अंधाच्या ओवरीत लपतात. जरा वेळाने ती बाहेर निघतात. त्याचवेळी गावातला शिद्धू न्धवी त्यांना पाहतो व घाणेरडा अर्थ यवतो. ही भानगड तो चांगुणेच्या बापाला सांगतो, तो संतापतो व तिचे लग्न ठरवतो. खाशाबा जगतापाच्या अंकुशा या मुलाशी चांगुणाचे लग्न होते. व ती सासवडला आपल्या सासरी निघून जाते. इथ पासून चांगुणेच्या दुदैवास आरंभ होतो. तिचा नवरा बदफैली, दारुड्या नि व्यसनी निघतो. त्याला घाणेरडा रोग घेतो. त्यात तो सडत पडतो. चांगुणा माहेरी जाते. ती पुन्हा सासरी फिरकत नाही.
चांगुणे ला दिवस जातात आणि ढाका मुलाची आई बनते, मात्र त्या मुलाला देवळात सोडून चांगुणा पुन्हा भटकू लागते. सुताराच्या चंद्रीने पुण्यात वेश्या व्यवसाय सुरु केलेला असतो. अचानक दोघींची गाठ पडते, आणि काही काळ चांगुणा चंद्रीकडे राहू लागते. पण तिथेही पुन्हा तोच प्रसंग येतो. खून, मारामारी, तुरुंग या जंबाळात चांगुणा अडकते. तेथून सुटल्यावर ती विडीच्या दुकानात विडया तयार करायला राहते, दुकानाचा मालक तिच्यावर खुष होतो. सात वर्षे चांगुणा त्याच्या कडे राहते. त्याच्यापासून चांगुणाला दोन मुले घेतात. दुदैवाने याही माणसाचा खून घेतो. चांगुणा पुन्हा अनाथ बनते. समाजातल्या भोंदू अन नीच माणसांकडून पुन्हा ती फसवली, नागवली आणि लुबाडली जाते.
चांगुणा मुलांना घेऊन मुंबईस येते, काही दिवस जिवन कलहाला ती तोंड देते, परंतु तिचे मन अन् शरिर लवकरच दुबळे आणि क्षीण बनते. जीवनाशी अधिक झगडण्याचे प्राण तिच्यात उरत नाही जन्मभर दारिद्र्य, आपत्ति, नि दुःख यांच्याशी झगडून तिची सारी शक्ती झिजून जाते. मुलांची तरी नीट सोय लागावी म्हणून चांगुणा अनाथालयात येते.
Show Less