By पाटील सुरेंद्र

शहरात राहणाऱ्या ग्रामीण नोकरदार कुटुंबाची गावातील घराला सावरण्याच्या प्रयत्नात होणारी आर्थिक ओढाताण त्यातून निर्माण झालेली जीवनातील अस्वस्थता लेखक सुरेंद्र पाटील यांनी 'चिखलवाटा' या कादंबरीतून प्रकट केली आहे.

Share
डॉ.भाग्यश्री पाटील, खडकी एज्युकेशन सोसायटीचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी, पुणे

‘चिखलवाटा’ ही सुरेंद्र पाटील यांची कादंबरी २००७ साली प्रकाशित झाली. कादंबरीची पृष्ठसंख्या १५९ आहे. कादंबरीत आबा व त्याची दोन मुलं अर्जुना व व्यंकट या स्वाभिमानी शेतकरी कुटुंबाचे चित्रण कादंबरीत आले आहे. गाव व शहरात वाढत जाणारा दुरावा, बदलती ग्रामसंस्कृती, नातेसंबंधातील ताण-तणाव, शेतकऱ्यांच्या चळवळी, त्यातून कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष, शेतकरी कुटुंबाची होणारी प्रचंड ओढाताण, शेतकऱ्याचा शहरी भागात स्थिरावू पाहणारा नोकरदार मुलगा याचे चित्रण ‘चिखलवाटा’ या कादंबरीतून आले आहे. आबाचा शहरात राहणारा व्यंकट हा नोकरदार मुलगा नोकरी सांभाळून गावाकडे पैसे पाठवतो. शेतीतून चांगले उत्पन्न मिळून फायदा होईल, असे त्याला वाटते. अर्धवेळ उपाशी राहून घरच्यांनी साथ दिली म्हणून शहरात नोकरी करू शकलो याची जाणीव ठेवून व्यंकट नेहमी गावातील घराकडे जातीने लक्ष घालून मदत करतो. त्याची पत्नी साधनाला हे पटत नाही. शहरात ओळखीने कमी भावात प्लॉट मिळत असल्याने गावी पैसे न पाठवता प्लॉट घ्यावा असे साधनाला वाटते. व्यंकट हा गावाशी जोडलेली नाळ कायम ठेवू पाहतो तर साधना त्याविरुद्ध वागतांना दिसून येते. व्यंकटचा मोठा भाऊ अर्जुना याचे संसारापेक्षा शेतकरी संघटनेत जास्त लक्ष असते. त्याचे कुटुंबाकडे सतत होणाऱ्या दुर्लक्षाला त्याची पत्नी रुक्मिन वैतागते. पण उघडपणे ती बोलू शकत नाही. ग्रामीण स्त्री ही संस्कारशील असते. त्यामुळे नवऱ्याला ती उघडपणे विरोध करत नाही असे कादंबरीतून दिसून आले आहे. शेतीत कष्ट करूनही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने मुलाने शेती न करता चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी, असे रुक्मिनला वाटते. शेतीत राबूनही फारसे उत्पन्न मिळत नसल्याने मुलांनी शेती न करता शिकून नोकरी करावी अशी विचारसरणी ग्रामीण कुटुंबात दिसून येऊ लागली. ‘चिखलवाटा’ या कादंबरीतून याचे चित्रण होताना दिसून येते. अर्जुनाचे शेतकरी संघटनेत जास्त लक्ष असल्याने आबा अस्वस्थ होतो. अर्जुना हा शेतकरी संघटनेचा लढाऊ कार्यकर्ता असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो संघटनेत सामील होतो. या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा लेखाजोखा कादंबरीतून मांडला गेला आहे. शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसले तरी आबा शेतीचा विचार सोडू शकत नाही. शेतीत राबूनही फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे जीवनात आलेली अस्वस्थता कादंबरीतून पदोपदी जाणवते. कादंबरीतील कथानकाच्या अनुषंगाने धोंडूबाई, हौसाबाई या स्त्री व्यक्तिरेखा कादंबरीत आल्या आहेत. शहरी संस्कृतीचा परिणाम व्यंकट आणि साधना या व्यक्तिरेखांवर झालेला दिसून येतो. गावातील घराला सावरण्याच्या प्रयत्नात व्यंकटची आर्थिक ओढाताण होते. त्यामुळे कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे ताण-तणाव कादंबरीतून चित्रित झाले आहे. कादंबरीतून येणारी प्रत्येक पात्रे ही त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह कादंबरीत अवतरली आहेत. कौटुंबिक जीवनातील अस्वस्थतेचे चित्रण करण्यात ‘चिखलवाटा’ कादंबरी यशस्वी ठरली आहे.

Availability

available

Original Title

चिखलवाटा

Categories

Publish Date

2007-01-01

Published Year

2007

Publisher Name

Total Pages

159

Format

Hardcover

Country

India

Language

Marathi

Average Ratings

Submit Your Review You are not allowed to submit a review. Please Log In