
चिमण्या चिवचिवल्या
कृषिजीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी 'नाळ' जोडून असलेल्या श्री. लामखडे यांनी लोकरीती, लोकाचार, लोकभावना आणि लोकसंकेतांना हाताशी धरून रानपाखरांशी मनस्वी संवाद केला आहे. लोकगीतांचा आधार घेत आपल्या नात्यागोत्यांचा आणि रानशिवाराचा उत्कट, काव्यात्मक आणि प्रवाही भाषेतून स्व-रूपधर्म साकारलेला आहे.