
चैतन्याचे चांदणे
हे पुस्तक म्हणजे साहित्याचे भरले ताट आहे. अन्नपूर्णेच्या थाळीप्रमाणे ते सतत भरून राहणारे व पुरुन उरणारे आहे. जगण्याला ज्यामुळे अर्थ प्राप्त होतो, अशा सर्व गोष्टीचे संवर्धन संस्कृतीमुळे घडते. जेव्हा समाजजीवनाचा तोल ढळतो, तत्वांना ग्लानी येते, नीतीचा विपर्यास होतो आणि माणसाचा पशु होतो, तेव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रकट होतो. त्याच्या पावलांनी तयार होणारी वाट लोकजीवनात नव्या जाणिवांची पहाट पेऊन येते. अशा महात्म्यांची मालिका येथे आहे.’