Share

छावा”  शिवाजी सावंत

सुयोग पवार

प. डॉ. वि. वि. पाटील फॉउंडेशनचे,

औषधनिर्माण शास्र महाविद्यालय

अहिल्यानगर

“छावा”  ही शिवाजी सावंत  लिखित ऐतिहासिक  कादंबरी मराठी साहित्यातील एक अत्यंत  महत्वाची कादंबरी आहे .ही कादंबरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे आणि त्यांच्या  शौर्य, संघर्ष, त्याग  आणि बलिदानाचे चित्रण केले आहे .

या   कादंबरीने मराठी वाचनसंस्कृतीत एक वेगळा ठसा कायम  ठेवला आहे .छत्रपती संभाजीमहाराज हे आपल्या शौर्य आणि पराक्रमाने एक अविस्मरणिय  नायक  बनले आहेत,ज्यांची जीवनगाथा आजही लोकांच्या मनात आहे .शिवाजी  सावंत  यांनी त्यांची  जीवनगाथ अत्यंत भावनिक आणि गहिरीदृष्ट्या  सादर केली आहे .

कादंबरीची पृष्ठभूमी

कादंबरीतील मुख्य पात्र छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते .मराठा साम्राज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांनी  दिलेले योगदान अनमोल  आहे . त्यानंतर संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या  कार्याचा वारसा घेतला आणि मराठा साम्राज्याचे रक्षण केले  त्यांचा जन्म   किल्ल्यामध्ये युद्धाच्या तयारीत आणि  रणांगणावर होणार होता .एक आदर्श राजकुमार म्हणून त्यांचा विकास झाला होता परंतु त्यांची  जीवनगाथा फक्त  शौर्याने भरलेली नव्हती त्यात संघर्ष , वेदना, आणि  अपार बलिदान  यांचीही गुंफण  होती कादंबरीत संभाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध पैलूंना उजागर केले आहे . त्यांच्या  बालपणापासून  शहीद  होण्यापर्यंत चा  प्रवास अत्यंत  वेदनादायक आणि गहिरे आहे .ते केवळ एक लढाऊ  राजकुमार नव्हते, तर एक संवेदनशील , दयाळू आणि  योग्य नेतृत्व करणारे व्यक्तीमत्व होते .त्यांची  जीवनगाथा त्याच  वेळेस भरलेल्या  राजकीय उलथा पालथीच्या  काळात घडली , जेव्हा मुघल साम्राज्याच्या कचाट्यात  मराठा साम्राज्य संघर्ष करत होते .

कादंबरीतील घटनांची मांडणी

  कादंबरीमध्ये शिवाजी सावंत  यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रत्येक  टप्प्याचा अत्यंत  सजीव आणि  बारकाईने तपशीलवार तपास केला आहे. कादंबरीमध्ये संभाजीमहाराजांच्या जीवनातील  संघर्ष ,  त्यांचा राज्याभिषेक, युद्धातील यश अपयश ,आणि त्यांची मुघल  साम्राज्याशी लढाई हा प्रमुख विषय आहे . विशेषतः त्यांच्या  लहानपणापासून  ते छत्रपती होई पर्यंतच्या  घटनांचे कथेतील महत्वपूर्ण  स्थान  आहे. त्यांच्या जीवनातील  एक महत्वाचा  भाग म्हणजे त्यांच्या  पित्याच्या निधनानंतर त्यांच्या सम्राट म्हणून होणाऱ्या  संघर्षामुळे संभाजी  महाराजांना अनावश्यक दडपण  आणि अपमान सहन करावा लागला त्यांना त्यांच्या  राज्यावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक लढाया  कराव्या लागल्या . कादंबरीत त्यांच्या अशा सर्व  लढायांचा तपशीलवार वर्णन केले आहे ज्यात त्यांचे शौर्य ,राजकीय धोरणे  आणि आपल्या  साम्राज्याचे रक्षण  करण्याची मानसिकता  दशविली  आहे.

संभाजी महाराजांची शौर्यगाथा

कादंबरीमध्ये संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे युद्धकौशल्य आणि रणनीतीचा बारकाईने विचार केला आहे त्यांच्या लढाईतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे शौर्याची भावना आणि  त्यांचे वचन बद्धतेचे पालन . त्यांचा प्रतिद्वंद्वी मुघल सम्राट औरंगजेब याच्याशी त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या राजकीय धोरणांचा विचार  कादंबरीत विस्ताराने केला आहे . ते एक निष्कलंक शासक होते ,जे केवळ मुघल साम्राज्याला  विरोध करत नव्हते तर मराठा साम्राज्याची परंपरा आणि स्वराज्याची रक्षण करत होते .

सांप्रदायिक आणि आंतरिक संघर्ष 

“छावा” मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवननीती एक महत्वपूर्ण  पैलू  म्हणजे त्यांचा संघर्ष केवळ बाह्य शत्रूंसोबत   नव्हता, तर  त्यांच्या दरबारातील विश्वासघात  आणि अपयशासोबत देखील होता. अनेक वेळा  त्यांना स्वकीय आणि  राजकारण्यांच्या विश्वासघाताचा सामना करावा, ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक जटिल  आणि तणावपूर्ण झाले .त्यांनी आपल्या राजकीय धोरणाच्या संदर्भात अनेक गोंधळाचा सामना करावा लागला, परंतु त्यातही ते कायम आपल्या मार्गावर ठाम राहिले .

बलिदान आणि  मृत्यू

कादंबरीचे एक अत्यंत  वेदनादायक आणि भावनिक टोक म्हणजे संभाजी  महाराजांचा मृत्यू ,ते जिवंत असताना देखील त्यांना एक नायक म्हणू कधी न्याय मिळाला नाही. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची उपेक्षा झाली होती .कादंबरीत  त्यांची मृत्यूकाळातील वेदना आणि संघर्ष  अत्यंत संवेदनशीलपणे मांडलेले आहे . औरंगजेबाच्या कैदेत त्यांना काय भोगावे लागले  त्यानंतर त्यांची  दुदैवी मृत्यूची  कथा कादंबरीमध्ये दिली आहे. त्यांचा बलिदान  मराठा साम्राज्याच्या भवितव्यासाठी  अत्यंत महत्वाचा ठरला .

कादंबरीतील लेखकाची शैली

शिवाजी सावंत यांच्या लेखनशैलीत  एक अद्वितीय लावण्य आहे .त्यांनी अत्यंत सजीव आणि प्रभावीपणे कादंबरीचे प्रत्येक घटक दर्शविले आहेत .त्यांच्या लेखनात ऐतिहासिक सत्यता ,भावनिक गहिराई आणि अत्यंत निष्टेची भावना आहे . कादंबरीचे प्रत्येक पात्र आपल्या गतीने वाचकांशी जोडते आणि त्यांचा संघर्ष , शौर्य  आणि बलिदान वाचकांच्या मनात ठळकपणे ठरतो. “छावा” ही एक अत्यंत  प्रभावी  अशी प्रेरणादायी  कादंबरी आहे. शिवाजी सावंत  यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील संघर्ष, शौर्य बलिदान आणि त्याग यांचे सखोल विश्लेषण केले आहे  . या कादंबरीने मराठा इतिहासाच्या एक अत्यंत  महत्वाच्या पिडीला जगासमोर आणले  आणि छत्रपती संभाजी महाराजांना  त्यांचे योग्य स्थान दिले . कादंबरी वाचल्यावर वाचकांना त्या काळाचा त्या संघर्षाचा आणि त्या  नायकाच्या महानतेचा अनुभव होतो.

सुयोग पवार

T.Y.B.Pharm

Original Title

Chava

Total Pages

886

Format

Paper

Language

Marathi

Submit Your Review You are not allowed to submit review. please Log In