
झेलझपाट
By मधुकर वाकोडे
ह. ना. आपटे पुरस्कार विजेती कादंबरी
झेलझपाट' ही जास्तीत जास्त सभ्य शब्दांत पण आदिवासींच्या जीवनाची परवड सांगणारी समर्थ कथा आहे. आजच्या व्यावहारिक जगात सरकारी उपक्रमातून चालवलेल्या सोसायट्यांमधून वाकड्या मार्गाने आपापल्या तुमड्या भरून घेणारे शेठ लोक व निरक्षर आदिवासींना आर्थिक व्यवहारात फसवून व्याज-बट्टा करणारे, त्यांच्या मालावर झडप घालणारे व्यापारीही इथे दिसतात. त्यामुळेच या सर्व विरोधी परिस्थितीत, अक्षरओळख झालेला व आपली लुबाडणूक होते आहे हे समजणारा एकटाच असा केरू या सर्वांचा शत्रू बनणे स्वाभाविकच होते. लाचार मोपाला दारू आणि लालपरीची चटक लावणारा, फुलयसारखी कोवळी काकडी गिळू पाहणारा कामांध कासम तर इथे असणारच.कोरकूंवर नसत्या लादलेल्या बाह्य मूल्यांची पुटं