
तराळ अंतराळ
बहुजन समाजातील एक मुलगा अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून वर येऊन आपल्या समाजाला सुशिक्षित करण्याचे स्वप्न बघतो आणि त्याच कार्यात कार्यमग्न राहतो, ही कहाणी विलक्षण अस्वस्थ करणारी आहे. समाजापुढे आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसमोर एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. जातीच्या कक्षा रुंदावणारे आणि मानवतावादाचा संदेश देणारे आत्मचरित्र म्हणून 'तराळ अंतराळ'चे महत्त्व वेगळेच आहे.