कडू प्रथमेश बाळू , सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स लेखकाने १९७२-७३ मध्ये अकरावीत
Read More
कडू प्रथमेश बाळू , सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स
लेखकाने १९७२-७३ मध्ये अकरावीत शिकत असताना वयाच्या १७ व्या वर्षी लिहिलेली हि रोजनिशी आहे. ह्या वर्षी पुस्तक रूपाने ती प्रसिद्ध करण्यात आली. हलाखीच्या परिस्थितीत आईविना दिलेल्या झुंजीची हि कहाणी आहे. अश्या परिस्थितीतून शिक्षण घेत, लेखक दुग्ध तंत्रज्ञान पदविका (I.D.D. Dairy Technology) मुंबई येथे प्राप्त करून दुग्ध व्यवसाय विकास विभागात राजपत्रित अधिकारी आहेत. ३८ वर्षे हि रोजीनिशी जपून ठेऊन ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन. १९७२ ला महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता, त्याची आठवण होते व माझ्या सारख्या जेष्ट नागरिकाला ते दिवस आठवतात.
ह्या पुस्तकाकडे साहित्यिक दृष्ट्या बघून उपयोग नाही. तर शिक्षणाच्या वेडाने प्रेरित होऊन, कुवतीप्रमाणे परिस्थितीवर मात करता येते हि प्रेरणा मिळण्यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक प्रत्येकाला आवडेल असे नाही. पण ज्यांना वास्तववादी साहित्य किवा आत्मचरित्र वाचायला आवडते त्यांना हे पुस्तक नक्की आवडेल.
लेखकाचे त्यावेळचे मित्रहि आज सुस्थितीत आहेत. लेखक त्यासर्वांचा आवर्जून मनोगतात उल्लेख करतो. Necessity is the mother of invention. मला हे पुस्तक भावले कारण मी सुद्धा अशाच बालपणीच्या कठीण काळाचा मुकाबला करत मोठा झालो. लेखकाला अकरावीला 58% मार्क मिळाले. पण आजच्या मुलांनी सर्व सुखसोई असताना मिळवलेले ८०% मार्क ह्याची तुलनाच होऊ शकत नाही. आज अकरावीतील किती मुले रोजनिशी लिहू शकतील? अर्थात क्लास गेले तर कदाचित शक्य आहे. !!!
पुस्तकाचा Font जरा लहान आहे. वाचायला जरा त्रास होतो. पण ज्या लेखकाने शिक्षणासाठी एवढा त्रास सहन केला असेल तर आपण हि थोडा त्रास सहन करायला हरकत नसावी.
मित्रानो, वेळ काढून पुस्तक नक्की वाचा व आपल्या तरुण मुला -मुलीना वाचायचा सल्ला द्या.
Show Less