
द आंत्रप्रेनूर
By Sharad, शरद
तेरा भागात आयुष्याच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या चुका व अनुभव यांचा प्रवास यात दाखवला आहे आणि प्रत्येक जण या प्रवासातून जात असतो याचा अनुभव आपली पुस्तक वाचताना येईल व त्यांनी केलेल्या चुका त्यांनी सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे मांडले आहेत ज्यामुळे आपण कसे स्वतःला फसवतोय हे आपल्याला कळून येत रॅट रेस ज्यामध्ये आपण प्रत्येक जण एका शर्यतीत असल्यासारखे धावतो आहेत पण आपल्याला आयुष्यात काय हवंय काय नाही याचा थोडा पण विचार करत नाही व असे करत असताना आपण आपल्याबरोबर आपल्या घरच्यांना सुद्धा चुकीच्या अपेक्षा ठेवण्यास भाग पाडतो तर अशावेळी आपल्याला नेमकं काय करायचंय हे सुरुवातीलाच ठरवून आपण आपला
द आंत्रप्रेन्यूअर
द आंत्रप्रेन्यूअर या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे आहेत हे पुस्तक उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवयुवकांना प्रेरित करणारे व त्यांना मार्गदर्शन करणारे आहे हे पुस्तक लेखकाच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे या पुस्तकामुळे युवकांनी उद्योग क्षेत्रात आपला मानसिक व तांत्रिक समतोल कसा साधावा याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे
शरद तांदळे यांनी सुरुवातीला कशी अडचणींवर मात करत मर्यादित संसाधनांसह उद्योग क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याचबरोबर त्या समस्यांचा सुद्धा व्यवसथितरित्या सांगितला आहे त्यामुळे वाचणाऱ्यांना योग्य दिशा मिळते एक उद्योजक केवळ नफा कमविण्यावर भर देत नाही तर तो त्याचा समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतात असे लेखकांनी सांगितले आहे पण पुस्तकाचा सर्वात मोठा प्रभाव त्याच्या भाषेमुळे होतो त्यांची भाषा सर्वांना समजणारी व सोप्या भाषेत आहे
या पुस्तकामध्ये लेखक वाचकांना त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी अपयशाची भीती दूर करण्यासाठी व कठीण प्रसंगातही टिकून कसे राहावे याबाबत उपाययोजना सांगतात हे पुस्तक यशासाठी मानसिक तयारीवर भर देऊन वाचणाऱ्यांना व्यवसायात कसे टिकून राहण्यासाठी आवश्यक बाबींवर लक्ष दिले जरी हे पुस्तक प्रामुख्याने उद्योग जगातील युवकांनसाठी लिहिलेले असले तरी त्यातील मार्गदर्शक प्रसंग यामुळे हे पुस्तक सर्व वाचकांनसाठी उपयुक्त ठरते नवयुवकांना जो आत्मविश्वास व प्रेरणा पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्वाचा स्रोत आहे या पुस्तकामुळे उद्योजकांमध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी प्रेरित करते
मला हे पुस्तक खूप आवडले कोणतीही व्यक्ती आपल्या कष्टाने व जिद्दीने आपले यश प्राप्त करू शकते असे मला या पुस्तकामधून समजले आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांना आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो हे कळले प्रत्येक वेळेस जोशात निर्णय घेण्यापेक्षा काही वेळेस ध्येर्याने निर्णय घेतलेला चांगला असतो कशीही परिस्थिती असली तरी तिला न घाबरता व न डगमगता तिला सामोरे जाण्याची वृत्ती व स्फूर्ती या पुस्तकाच्या वाचनाने मला कळले म्हणून मला हे पुस्तक फार आवडले