सिमोन द बोव्हुआर लिखित द सेकंड सेक्स पुस्तकाचा अनुवाद नुकताच वाचण्यात आला. यात सिमोन म्हणते
Read More
सिमोन द बोव्हुआर लिखित द सेकंड सेक्स पुस्तकाचा अनुवाद नुकताच वाचण्यात आला. यात सिमोन म्हणते *स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते.** सिमोननी या पुस्तकांमध्ये स्त्री विषयी अतिशय सखोल अशी अशी चर्चा केलेली आहे .स्त्री व पुरुषांतील जीवशास्त्रीय भेद , मानसिक पातळीवरील स्री ची जडणघडण ( स्री चा देह मिळाला म्हणून स्री नसते, तर स्वतःला स्री समजते म्हणून तिची जडणघडण एका विशिष्ट प्रकारे होत असते. ).
भटके विमुक्त जीवनाच्या काळात मनुष्य जमातीचे दिवस फार कष्टप्रद होते, स्त्री तिच्या प्रजनन क्षमता आणि त्यायोग्य येणाऱ्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या यामुळे आपल्या टोळीची साधन संपत्ती वाढवण्याच्या कामात फारसे योगदान देऊ शकायचे नाही त्याकाळी लहान मुलं लहान मुले अमूल्य ठेवा न वाटता ओझेच वाटे आणि म्हणूनच स्त्रीच्या जननक्षमतेचे कौतुक होण्याऐवजी त्याची हेटाळणी जास्त होई.नवीन बाळाचा जन्म हा आनंद ऐवजी उद्वेगाचा प्रसंग असे .स्त्री सततच्या बाळांतपणामुळे घरात डांबली जायची आणि तिच्या नशिबी घर कामाचे एकसुरी सपक आयुष्य जगावे लागत असे . तिच्या कामात साहस उरलेले नसायचे .(काही अंशी अजूनही हेच चित्र पाहायला मिळते.) समाजव्यवस्था पितृसत्ताक असो की मातृसत्ताक स्त्रीच्या दर्जात त्यामुळे काही फरक पडत नसे .
नवतरुणी, पौवगंडावस्था , विवाहित स्त्री, स्त्रीचे समलिंगी आकर्षण याबाबत सिमोन भाष्य करते. मातृत्वा विषयी दोन मोठे गैरसमज समाजात घट्ट रुजलेले आहेत एक म्हणजे आई होणं ही स्त्री जीवनाची परिपूर्ती आहे असे प्रत्येक स्त्रीस वाटते हा समज वास्तवास धरून नाही फक्त आई होणे हे संतुलित समाधानी जीवन जगण्यास पुरेसे नसते. स्त्रीला स्वतःचे आवडीचे कार्यक्षेत्र नसेल तर मुलांचे नीट संगोपन करताना सुद्धा तिच्या मनात निराशा असतेच .दुसरा मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक मूल हे आईजवळ सुखातच असते. आज घराबाहेर पडणारी स्त्री बाल संगोपन की करिअर या कात्रीत सापडलेली दिसते याच याचे कारण पाळणाघराच्या चांगल्या पुरेशा सुविधा तिला उपलब्ध करून दिला जात नाहीत यामुळे अर्थातजनासाठी तिला खूप तास घराबाहेर राहावे लागते. यातच तिची सर्व शक्ती संपून जाते आणि तिची घर व नोकरी अशी ओढाताण सुरू होते .
आई वडील, शिक्षक ,समाज यांनी स्त्रीला तिच्या कार्यक्षमते बाबत साशंक मते बिंबवल्यामुळे स्वतंत्र स्त्री देखील बराच वेळा पराभूत मनोधारणेने कोणत्याही कामात उतरते.
रोजच्या व्यवहारात स्त्री-पुरुषांचा दर्जा समान झाला तर चैन, विषयाशक्ती ,लैंगिक उत्कटता ,अतूच्च्य आनंदाची भावना इत्यादी अनुभूती घेणं अशक्य होईल ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. स्त्रीला मुक्त करणे याचा अर्थ तिला पुरुषाबरोबर एकाच नाट्यात जखडून न ठेवता तिला बहुरंगी नाती प्रस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देणे. स्त्रीला तिचे स्वतंत्र अस्तित्व मिळवून द्या तसे झाल्यास ती स्वतःसाठी तर जगेलच पण पुरुषासाठीही जगेल स्त्री व पुरुष दोघेही एकमेकांचे क्रियाशील अस्तित्व मान्य करतील तेव्हा ते एकमेकांसाठीच उरतील . अशा त्यांच्या नात्यातील देवानघेवाणीमुळे त्यांच्यामधील आकर्षण ,स्वामित्व भावना, प्रेम ,स्वप्न, साहस या भावनांचे चमत्कार नाहीसे होणार नाहीत .तसेच देवाणघेवाण विजय , कुरघोडी, मिलन या शब्दांचे अर्थही नष्ट होणार नाहीत.
निम्म्या मानव जातीची गुलामगिरी व दांभिक समाजव्यवस्था नष्ट झाली की मानवी समाजाच्या स्त्री पुरुष विभागणीला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होईल व स्त्री पुरुष जोडीला स्वतःचे खरे स्वरूप सापडेल. मार्क्सचे म्हणणे होते की माणसांमधील थेट नैसर्गिक व अत्यावश्यक नाते हे स्त्री पुरुषांमध्येच असू शकते .त्यांच्या नात्याच्या स्वरूपावरून माणूस मानवतेच्या कोणत्या टप्प्यावर उभा आहे हे समजते. स्त्री पुरुष समानता प्राप्त करण्यासाठी स्त्री व पुरुष दोघांनीही आपल्यातील नैसर्गिक भेद स्वीकारून त्याही पलीकडचा असा नातेसंबंध एकमेकाचा जोपासणे आवश्यक आहे असे सिमोनचे मत आहे. इति सिमोन द बोव्हुआर
Show Less