पितृऋण कथा एका श्रीमंत म्हणायला हरकत नसलेल्या सामान्य व्यक्तीची आहे.श्रीमंत व्यक्ति सामान्य
Read More
पितृऋण
कथा एका श्रीमंत म्हणायला हरकत नसलेल्या सामान्य व्यक्तीची आहे.श्रीमंत व्यक्ति सामान्य कसा असेल? तर असू शकतो…थोड़ी वडिलांची माया (पैसा) आणि काही सासर्याच प्रेम (पुन्हा पैसाच) आणि यात भर म्हणजे तल्लख बुद्धि आणि पैसाच डोक्यात असणारी,10 चे 100 कसे होतील याचे नवनवीन मार्ग शोधणारी बायको यामुळे श्रीमंत असले तरी सामान्य म्हणजे आपल्या नोकरीशी ईमान बाळगणारे,सहसा अवाजवी खर्च न करणारे, आपल्या संपत्तिचा उहापोह न करणारे आणि आपल्या मुलांवर प्रेम आणि जमेल तितक बायकोच्या निर्णयाला विरोध न करणारे गृहस्थ श्रीमंत असूनही ‘सामान्यच’ म्हणावे लागतील.
हट्टी आणि सतत पैसा डोक्यात घोळत असणारी बायको,प्रेमळ,प्रांजल,वडिलांच्या साध्या राहणीला पसंद करणारी मुलगी,उच्च शिक्षित लग्नास योग्य आणि आईच्या हो ला हो बोलणारा मुलगा आणि स्वतः व्यकेटेश अस लहान,काहिस सिनेमाच्या पत्रांशी साम्य असलेल कुटुंब. “ठेविलें अनंते तैसेची रहावे” या तत्वावर या कुटुंबात कहिहि बदल होत नाही. तस व्यंकटेशची पत्नी तसा प्रयत्न करत असते पण ना व्यंकटेश आणि त्याची मुलगी प्रगतीशील आणि व्यवहारिक होतात ना ती आणि तिचा मुलगा साधेपणाने राहु शकतात.पण यात क्वचित बदल होतो तो म्हणजे व्यंकटेश ची बदली.
येथून खरी कथा सुरु होते.काही दिवस नविन ठिकाणी राहून कोणी सोनार व्यंकटेश यांना शंकर म्हणून बोलावतो पण काही गफलत झाली असावी अस समझून व्यंकटेश याकडे दुर्लक्ष करतो.पण पुन्हा एकदा असच होत आणि व्यंकटेश यांना विश्वास होतो की त्यांच्या सारखा दिसणारा शंकर नावाचा कोणी माणूस जवळपास कुठे राहत असावा.
याच धागाचा मागोवा घेत व्यंकटेश आपल्या सारख्याच दिसणाऱ्या शंकर यांना भेटतो.अठरा विश्वे दारिद्र्य,लग्नाच्या मूली,आणि एक विधवा आई अस बिचार्या शंकरचा संसार. कुठे सर्व सुख सोयींनी आयुष्य जगलेले व्यंकटेश आणि कुठे शंकर! फ़क्त चेहरा सोडला तरी कहिहि साम्य नाही.
पण हळुहळू एक एक कथा मुख्य कथेला जुळत जाते आणि चेहर्याच्या या साम्यातील रहस्य बाहेर येते. आणि येतो एक नैतिक प्रश्न.तो प्रश्न कसा सोडवावा आणि खरच हा कसा सुटतो याची कहानी आहे “पितृऋण”
एकंदर हलकी फुलकी कथा वाचायची असल्यास “पितृऋण” छान पुस्तक आहे.
Show Less