पुस्तकाचा मुख्यगाभा :- डॉ. जोसेफ मर्फी यांनी या पुंस्तकात आपल्या मनातील शक्ती विशेषतः अवचेतन
Read More
पुस्तकाचा मुख्यगाभा :-
डॉ. जोसेफ मर्फी यांनी या पुंस्तकात आपल्या मनातील शक्ती विशेषतः अवचेतन मनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून आयुष्यात यशस्वी आणि समाधानि होण्याचे मार्ग सांगितले आहेत.
1. अवचेतन मनाची शक्ती :-
अवचेतन मन हे आपल्या विचारांवर आधारित कम करते. आपण जे विचार वारंवार करतो, त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडतो. या पुस्तकामधून असे शिकायला भेटते की सकारात्मक विचारांमुळे यश मिळते, तर नकारात्मक विचारांमुळे अडथळे निर्माण होतात.
2. सकारात्मक विचारांचे महत्व :-
जर आपण आपले विचार आणि भावना सकारात्मक ठेवले तर अवचेतन मन ते आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणते.
“ पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड “ हे पुस्तक वाचकांनला सांगते आपल्या
अंतर्मनाच्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा करावा हे सांगते. आपले अंतर्मन सकारात्मक विचारांनी भरले पाहिजे आणि आपण स्वतःला नेहमीच यशस्वी आणि आनंदी म्हणून पाहिलं पाहिजे आपण आपल्या अंतर्मनाला जे काही सांगतो ते आपले जीवन घडवते.
आपण आपल्या अंतर्मनाला आपल्या लक्ष्यांची स्पष्ट चित्र दाखवू शकतो आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपल्याला मिळेल असे सांगू शकतो.
पुस्तकाचे फायदे :-
• आत्मविश्वास वाढतो.
• जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होतो.
• अडचणींवर मत करण्यासाठी प्रेरणा मिळते.
• शांती आणि आनंद यांचा अनुभव घेण्यासाठी मनाची ताकद ओळखता येते.
पुस्तकप्रेमी वाचकांसाठी :-
जर तुम्हाला आपल्या विचारांचा प्रभाव जीवनावर कसा पडतो हे जाणून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा, अवचेतन मनाचे रहस्य आणि त्यांचा सकारात्मक उपयोग याबाबतचे दृष्टीकोन नक्कीच बदलतील.
“ तुमचे मन जसे विचार करेल ,
तसेच तुमचे आयुष्य घडेल. “
Show Less