पुस्तक परिक्षण - कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर वसंत
Read More
पुस्तक परिक्षण – कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर
वसंत कानेटकरांच्या ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ या नाटकाचा विषयच ‘प्रेम’ हा आहे. प्रेम हा सनातन विषय आहे. मध्यवर्गीय जीवनात प्रेमाचे विविध रंग कसे अनुभवाला येताच त्याचे हसरे खेळते दर्शन या नाटकात आहे. प्रेमातली भावुकता, सरलता, गडदपण आणि विश्लेषण असे अनेक गहिरे रंग या नाटकात आहेत.
. माणसानं स्वतःला जाणून घ्यावं आणि निकोप मनानं आयुष्याकडं पाहावं, म्हणजे त्याला सर्वत्र आनंदाची प्रतीती होईल, ही जीवनदृष्टी नाटककाराल द्यावयाची आहे. त्या बेतानेच त्याने पात्रयोजना केली आहे. प्रा. बल्लाळ हे रसिक – जीवनवादाचे प्रतीक आहेत. आणित्यांना साथ देतात त्यांच्या धर्मपत्नी प्रियंवदाबाई, बाजीराव व बब्बड ही नवतरुणांच्या जोशातच वावरतात तर बच्चाजी प्रेमभंगामुळे संपूर्ण स्त्रीजातीवर वैतागला आहे. पण शेवटी स्त्रीशिवाय जीवनाला तरुणोपाय नाही असे म्हणून तो परत प्रेमात पडतो. कु सुशील तुळजापूरकर स्थलंत व्यक्तिमत्वाच्या नावाखाली पत्नीपासून घटस्पोटघ्यायला निघालेली, वाट चुकलेले पण परत मार्गावर आलेली आजची तरुणी आहे. निळूभाऊ गोरे मुलांच्यासाठी खस्ता खाणाऱ्या आई-वडिलांचे प्रतिनिधी वाटतात, तर प्रियंवदाबाई ‘अजुनीयैवानात मी’ म्हणून जीवनाचा आनंद डोळसपणाने उपभोगतात, अशापद्धतीने नळाचा विषय आशय पाढला ‘प्रेमा तुझा रंग कसा? हे शीर्षक सार्थ वाटले.
या नाटकातील बब्बर – बाजीराव, बच्चु, सुशील, या पात्रांना प्रेमाचा अर्थ, त्याची व्याप्ती खोली, त्यासाठी पडणारे कष्ट – यातायात हालअपेष्टा प्रेम-विरह-प्रेम या सर्व गोष्टींचा अर्थ अतिशय हळुवारपणाने पण लेवढयाच सावधानतेने नाटककाराने उलगडून दाखवलेला आहे. माणसाच्या जीवनातील प्रेमाचे महत्व या नाटकामधुन प्रत्ययास येते.
सुशील – सर्जेराव, बच्चू-मंदा, बल्लाळ -प्रियंवदा, बब्बड – बाजीराव यांचे प्रेम, निळूभाऊना गवसलेला उदान्त अशा प्रेमाचा अर्थ प्रेमाचा रंग कसा तर तुझ्या व्यक्तिमत्वा सारखा परिश्रमाएवढा असे म्हणावे लागते. सुशील ही स्वतःच्या अहंकारामध्ये गुरफटलेली असते. यातून बाहर काढण्यासाठी प्रा. बल्लाळाणी दिव्य व उदास अशा प्रेमाचा तिला अर्थ सांगितल आहे? ते म्हणतात -“सांगितले कोणी तुला संसाराला दिव्ये प्रीतीचा पाया असतो म्हणून? खरं सांगू? संसाराला पाया असतो. फक्त मदनबाधेचा, क्वचित मैत्रीचा आणि फार-फार तर समान धर्माचा!’ बेटी उदांन्त प्रेम म्हणजे संसाराच्या पोटात खोलवर दडलेला एक गुप्त धनाचा संचंय आहे, समजलीस? पण हे धन केवळ वयात आल्याबरोबर वारसाहक्क सांगुन नाही कोणाला हस्तगत होतं बरे का? कुणासाठी तरी शरीर आणि मन अहोरात्र झिजवावं, तेव्हा हा गुप्ल संचय दिसायला लागलो.हातात हात घालून जन्मभर दुःख वैफल्याची वाटचाल करावी तेव्हा प्रेमिकांना हा ठेवा प्राप्त होतो.’
प्रा. बल्लाळाणी तरुण – तरूणींच्या आकर्षणातून निर्माण घेणारे प्रेम आणि सुख-दुःखाच्या वारसवलेची जाणीव ठेवून अबोल राहणारं प्रेम याची तुलना करून प्रेमाची व्याख्या केली आहे. प्रत्येक पिढी प्रेम करीत असलते आणि प्रत्येक पिढीतील आई- वडिल त्याला विरोध करीत असतात. हा इतिहास आहे. पण या इतिहासातून डोळसपणे मार्ग काढला आहे. म्हणूनच शेवटच्या भरतवाक्यात प्रा. बल्लाळ म्हणतात – “हे नाटक कधीच संपायचं नाही. जगाच्या प्रारंभी या नाटकाला सुरुवात झालीय आणि जगाच्या पाठीवर जोपर्यंत स्त्री-पुरुष आहे तोपर्यंत या नाटकाचे नवेनवे अंक असेच रंगल जाणार ! प्रेमाचे जीवनातील महत्व, त्यासाठी मोजावी लागणारी किमत सोगिकला, प्रेमातील तडजोडे, ते वाढीस लावणे यासाठीचा संघर्ष येथे दिसून येतो. म्हणून या नाटकातील पात्रांचे विचार त्यांचे वर्तन,त्यांनी दिलेला संदेश, त्यांच्या जीवनात निर्माण झालेले कडुगोड प्रसंग हे सर्व या शीर्षकाचा खरेपणा व्यक्त करणारे आहे, असे वाटले. म्हणून नाटकाचा गाभा पाहता हे शीर्षक योग्य वाटते. प्रेमाचे अल्ड मिरकील भावनीक उदांन्त धीरगंभीर असे विविध रंग त्यांनी या पत्राद्वारे दाखवुन दिलेली आहेत. म्हणुनच “प्रेमा तुझा रंग कसा?” या नव्याशिर्षाकाच्या शेवटी नाटककाराने देलेले प्रश्नचिन्ह योग्य वाटते.
Show Less