
बटाट्याची चाळ
By पु.ल.देशपांडे
चाळ संस्कृतीची नेटकी मांडणी चाळीत राहणाऱ्यांची सुखंदुःखं, आचार विचार, सणवार, सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती आणि पोटात असलेली उदंड माया ह्या सगळ्याचं समर्पक जिवंत चित्र ह्या पुस्तकात पुलंनी उभं केलं आहे. चाळसंस्कृती संपून ब्लॉक संस्कृती येण्याची चाळकऱ्यांना वाटणारी भीती सार्थ वाटते आणि अंतर्मुख करते.