(प्रा.सहदेव रोडे, इतिहास विभाग प्रमुख, शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर) “भारतातील बौद्धधम्म" हे
Read More
(प्रा.सहदेव रोडे, इतिहास विभाग प्रमुख, शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर)
“भारतातील बौद्धधम्म” हे गेल ऑम्वेट या अमेरिकन स्त्रीवादी व आंबेडकरवादी लेखिकेने पुस्तक लिहिलेले आहे.तसेच त्यांनी दलित साहित्य, बौद्धधम्म, आंबेडकरवादी साहित्याचे लेखन केलेले आहे त्यापैकीच लिहिलेले एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे,हे पुस्तक sage publication New Delhi येथे २००३ मध्ये प्रकाशित झालेले आहे. या पुस्तकामध्ये बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा, इतिहासाचा आणि भारतातील त्याच्या सामाजिक प्रभावाचा सखोल अभ्यास सादर केलेला आहे. या पुस्तकात हे गेल ऑम्वेट यांनी बौद्ध धर्माचा वैज्ञानिक, तात्त्विक आणि सामाजिक दृष्टिकोन मांडून त्याला दलित समाजाच्या मुक्तीचे साधन म्हणून दाखवले आहे.
पुस्तकाचा सारांश:
बौद्ध धम्माची पार्श्वभूमी :
पुस्तकाचा प्रारंभ बौद्ध धर्माच्या उगमाशी होतो.त्यात बौद्ध धम्म व ब्राम्हणी परंपरा याचा परस्पर तुलना केली आहे. त्याच बरोबर गौतम बुद्धाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, त्यांची शिकवण, आणि त्यांच्या धम्माच्या प्रचाराचे वर्णन या भागात केले आहे.
धम्म: बुद्धाच्या शिकवणीची मुलभूत तत्वे :
पुस्तकात बौद्ध धर्माची तीन रत्नं (बुद्ध, धम्म, संघ) आणि चार आर्यसत्य यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच सोबत समन ( श्रमण) परंपरा सत्यासाठी संघर्ष सांगितला आहे. तसेच ब्राम्हणी धर्म तत्त्वज्ञान चा आढावा घेतलेला आहे.
गेल ऑम्वेट यांनी बुद्धांचे विचार तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक स्वरूपाचे असल्याचे ठोस पुराव्यांद्वारे पटवून दिले आहे. त्यांनी कर्म, पुनर्जन्म, आणि मोक्ष यांसारख्या संकल्पनांना बुद्धांच्या दृष्टिकोनातून नव्याने परिभाषित केले आहे.
अनित्यता आणि बदल :
गेल ऑम्वेट यांनी बौद्ध धर्माच्या संघाची जीवन पद्धती, बौद्ध धम्म आणि भाषा, बौद्ध धम्म ची तीन मार्ग यामध्ये बौद्ध धम्म म्हणजे काय यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे. समतावादी आणि मानवतावादी दृष्टिकोनावर भर दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की बौद्ध धर्म हा जातिभेद, शोषण, आणि असमानता यांसारख्या सामाजिक समस्यांवर उपाय आहे.
ते हिंदू धर्मातील वर्णव्यवस्थेचे कठोरपणे परीक्षण करतात आणि बौद्ध धर्माचा स्वीकार हा दलित समाजासाठी सामाजिक क्रांतीचा मार्ग आहे, असे ठामपणे प्रतिपादन करतात.
बौद्ध संस्कृती :
गेल ऑम्वेट यांनी भारतीयामध्ये इतिहास भान नाही असे त्यांनी मांडले आहे.त्याच बरोबर प्राचीन भारत हा बौद्ध भारत होता कि, हिंदू भारत होता यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. त्याच बरोबर यात प्राचीन भारतातील बौद्ध राजवंशाची माहिती देऊन बौद्ध धम्म कसा वैज्ञानिक प्रगती केली होती त्यामुळे त्यांची आर्थिक प्रगती झालेली होती हे दाखऊन दिले आहे.
५.बौद्धधम्माचा भारतातील पराभव : प्राचीन भारतातील बौद्ध तत्त्वज्ञान,संस्कृती महान असताना काळाच्या ओघात ओसरली व दुसर्या शतकापर्यंत बौद्ध धम्माची जीवनशैली नाश पावली. याचे वर्णन केले आहे. जगातील इतर तत्त्वज्ञान टिकून राहिले. याची खंत लेखकाला वाटते.
६ बौद्ध पर्वानंतर : भक्ती चळवळ:- बौद्ध पर्वानंतर भक्ती चळवळ हा भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासातील महत्त्वाचा कालखंड आहे. बौद्ध धर्माच्या प्रभावानंतर भारतीय समाजात अनेक बदल झाले. त्यानंतर साधारणतः 7व्या ते 17व्या शतकादरम्यान उदयास आलेली भक्ती चळवळ ही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती म्हणून ओळखली जाते.यात संत कबीर, संत मीराबाई, संत तुकाराम, संत चोखामेळा आणि संत रविदास यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
७ वसाहतकालीन आव्हाने, भारतीय प्रतिक्रिया आणि बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन: जगामध्ये ब्रिटीश सत्तेच्या अधीन राहून भारतामध्ये हि वस्तूच्या उत्पादनाच्या क्षेत्रात प्रचंड बदल झाले.त्याच बरोबर आर्थिक विषमता आणि त्यावर मार्क्स आणि एंजल्सचा communist manifesto मधील विचार त्यामुळे आर्थिक व नैतिक व बौद्धिक आव्हाने उभी राहिली. याच काळात हिंदुत्वाची बांधणी झाली. त्याला उत्तर म्हणजे महात्मा फुले यांनी सत्याधारित विश्वधर्माची मांडणी. पुढे बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन याची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे.
८ नवयानबौद्ध धम्म व आधुनिक युग: नवयान बौद्ध धम्म आणि आधुनिक युग हा विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २०व्या शतकात नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाची चळवळ सुरु केली. त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्माला आधुनिक सामाजिक वास्तवाशी जोडून नव्या स्वरूपात मांडले, ज्याला “नवयान” असे म्हटले जाते. हा नव्यान बौद्ध धम्म केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनासाठी एक क्रांतिकारक विचारसरणी आहे.
पुस्तकाचे वैशिष्ट्य:
तत्त्वज्ञान व सामाजिक दृष्टिकोनाचा संगम:
पुस्तकात बौद्ध धर्माचा आध्यात्मिक अंगाशी अधिक जोर न देता त्याचा सामाजिक बदल घडवण्याच्या शक्तीवर भर देण्यात आला आहे.
तर्कशुद्ध मांडणी:
गेल ऑम्वेट यांनी बौद्ध धर्माच्या विचारांचे विश्लेषण तर्कशुद्ध पद्धतीने केले आहे, ज्यामुळे वाचकांना बुद्धांचे विचार समजण्यास सोपे जाते.
दलित चळवळीशी जोडलेले महत्त्व:
गेल ऑम्वेट यांनी बौद्ध धर्माला केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक क्रांतीचे साधन म्हणून मांडले आहे, जे दलित चळवळीचा आत्मा आहे.
प्रभाव:
भारतीय समाजावर प्रभाव: हे पुस्तक भारतातील बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी आणि दलित समाजाला आत्मसन्मान व अधिकार मिळवून देण्यासाठी प्रेरणादायक ठरले आहे.
वैचारिक क्रांती: गेल ऑम्वेट यांनी बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजाला समता, स्वातंत्र्य, आणि बंधुतेचा मार्ग दाखवला, ज्यामुळे अनेकांनी त्यांचा धम्म स्वीकृत केला.
Show Less