ग्रंथ परीक्षक : भारमल रोशन शांताराम रसायनशास्त्र विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित,
Read More
ग्रंथ परीक्षक : भारमल रोशन शांताराम रसायनशास्त्र विभाग, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक.
मी प्रा. सौ. अर्चना चौधरी यांचे भारतीय लैंगिक शिक्षण हे पुस्तक वाचले. या पुस्तकामुळे माझ्या ज्ञानत खूप भर पडली.
सुरुवातीपासूनच भारतीय लोकांना लैंगिक शिक्षणाबद्दल जास्त काही ज्ञान दिलेले नाही, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात गैरसमज निर्माण देतात. म्हणूनच मानवाने फक्त पुनरुत्पादन आणि लैंगिक सुख यासाठी उपयोग करून घेतला. यामुळे समाजात अनेक प्रश्न निर्माण झालेत. यामुळेच लैंगिक शिक्षण हे आजच्या या गतिमान युगात खूप महत्वाचे आहे.
आजच्या या गतिमान व बदलत्या जीवनशैलीमुळे आईवडील व मुलांमधला संवाद हा कमी झाला आहे. आणि या मुळे मुले/मुली काही शारीरिक बदलनावर विषयक संवाद आपल्या आईवडिलांबरोबर करत नाही. त्यामुळेच गैरसमज निर्माण होतात. म्हणूनच वाढत्या वयानुसार मुला/मुलींमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती त्यांना योग्य वेळेवर मिळने खूप अत्यावश्यक आहे. यासाठी आईवडिलांनी त्यांच्यासोबत वेळोवेळी संवाद करणे खूप गरजेचे आहे. यातून अनेक प्रकारचे गैरसमज दूर होण्यास मदत होते. व शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षण या विषयावर कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता शिक्षण दिले पाहिजे, आणि शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे व वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. जेणेकरून विद्यार्थिमध्ये कुठल्याही प्रकारचा न्युनगंड निर्माण होता कामा नये.
एका उदाहरणद्वारे स्पष्टीकरण करू, ‘ऋतूस्त्राव (मासिकपाळी) ही एक महिलां/मुलींमध्ये होणारी एक नैसर्गिक बाब आहे. न मिळालेल्या ज्ञानामुळे या गोष्टीला आजही अपवित्र मानले जाते. व खेडेगावात तर “विटाळ” मानले जाते. जे कि पूर्णतः चुकीचं आहे. तर त्याउलट मातृत्वासाठी लागणारी सक्षमता ही त्या मासिकपाळीत असते. तर या अज्ञानामुळे स्त्री/मुलींना बाजूला बसवले जाते, जे कि चुकीचं आहे. याउलट तिची आपण त्या दिवसात योग्य ती काळजी घेतली पाहिजे. आपली व आपल्या परिवाराची जबाबदारी असली पाहिजे.
जर लैंगिक शिक्षण आपल्याला त्या वयात मिळाले असते तर निश्चितच आपण सुरुवातीपासुन या गोष्टीवर रोख आणून तिची काळजी घेतली असती. या दिवसात तिला कमीत कमी कामाची व जास्त तणाव न घेण्याची जबाबदारी ही आपण घेतली पाहिजे. जर आपन अजूनही या जुन्या पिढीचा गैरसमज हा समज मध्ये नाही परिवर्तीत नाही केला तर निश्चितच समाज हा मागे राहील व गैरसमज वर गैरसमज हे निर्माण होतील.
प्रथमतः लैंगिक शिक्षणाची जबाबदारी ही आईवडील किंवा पालकांची असते पण हल्लीच्या कमी संवादामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यानंतर शालेय काळामध्ये याची जबाबदारी ही शिक्षकांनाची असते. शिक्षकांनी कुठलीही शंका न बाळगता लैंगिक शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये सतत संवाद केला पाहिजे. जेणेकरून वाढत्या वयामध्ये त्यांच्याडून काही चुका होत असेल किंवा होणार असेल तर त्याविषयक त्यांना ज्ञान असेल तर ती चूक परत न होण्यासाठी खूप मदत होईल. त्यामुळ ते त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलाने भांबवून जाणार नाहीत. व ते आपल्या शरीराची काळजी आणखी चांगल्या प्रकारे घेऊ शकतील.
आजच्या या वैज्ञानिक व तांत्रिक यूगामध्ये परंपरावादी, जुन्या बुरसटलेल्या विचारांना थारा देणे योग्य नाही. आणि म्हणूनच आपण लैंगिक शिक्षणावर भर घातली पाहिजे. व पालकांनी तसेच शिक्षकांनीही यावर भर घातली पाहिजे. जेणेकरून समाज चांगल्या दिशेने वाटचालीस लागेल.
या २१व्या शतकात आपण समाजात लैंगिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजे. व लैंगिक शिक्षणात भर घातली पाहिजे. आपण गावोगावी, शहरोशहरी, आपण या गोष्टीवर अंमलाबजावणी केली पाहिजे. जर आपण कठोर निर्णय नाही घेतला तर पुढच्या येणाऱ्या पिढीवर खूप परिणाम होईल व परत आपण अधोगतीला लागू.
म्हणूनच लैंगिक शिक्षण खूप महत्वाचे आहे. व याची संपूर्ण जबाबदारी ही आपली असली पाहिजे. आपण आपल्या घरातून जर सुरुवात केली तर निश्चितच संपूर्ण गाव, शहर व आपला समाज हा सुशिक्षित होईल व या कठोर परिश्रमातुन आपला विजय होईल.
Show Less