पुस्तक परीक्षण- Gade Swati Ganpat, LLB 1st Year Student, Pune District Education Association’s Law College, Hadapsar, Pune-28. मी वनवासी या पुस्तकामध्ये समाजातील
Read More
पुस्तक परीक्षण- Gade Swati Ganpat, LLB 1st Year Student, Pune District Education Association’s Law College, Hadapsar, Pune-28.
मी वनवासी या पुस्तकामध्ये समाजातील अबला स्त्रिया सबला कशा बनतात हे सांगितला आहे. या पुस्तकाच्या मलपृष्ठ आणि मुखपृष्ठावरून पुस्तकातील सार, मतीतार्थ समजतो मुखपृष्ठावर भयान अंधारून आलेल्या आभाळाखाली अगदी दयनीय अवस्थेत बसलेली अबला स्त्रिया आणि दोन विदारक झोपड्या याउलट मलपृष्ठावर कणखर तेजोमय अशा सिंधुताईंचे चित्र आहे. भाषा अगदी समर्पक सोपी आहे समाजाशी जोडलेली नाळ कायम आहे. हे पुस्तक का आवडले तर बोलू शकणाऱ्या आणि न बोलू शकणाऱ्या स्त्रियांचा जीवनपट मांडलेला आहे. सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 पिंपरी मेघे जिल्हा वर्धा येथे झाला .त्यांचे अगोदरचे नाव चिंदी अभिमान साठे होते होते .गोपुरी केंद्रावर मराठी चौथी उत्तीर्ण झाल्या आईचा शिक्षणाला विरोध होता कारण ती एक मुलगी होत्या नंतर त्यांचे नवरगाव फॉरेस्ट येथील श्रीहरी सपकाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरचे हे शिक्षणाला विरोध करणारे मुक्तीला विरोध असणारे असे होते. सिंधुताईंना वाचनाचे खूप वेड होते तेव्हां सामानाचे कागद बिळांमध्ये लपवून ठेवून वाचायच्या, एकदा तर त्यांना मुंगूस चावला होता. त्यांच्या गावामध्ये दमडाजी आसटकर नावाचा शेडची सेठजी गावातील जनावरांचे शेणखत फुकटामध्ये स्वतःच्या जमिनीमध्ये वापरायचा याची तक्रार त्यांनी कलेक्टरकडे केली. तक्रारीला न्याय म्हणून सावकाराला अटक झाली यावेळी सिंधुताई गरोदर होत्या. जाता जाता दमडाजीने श्रीहरी सपकाळ म्हणजे सिंधुताईंचे पती यांच्या मनात संशयाचे भूत सोडले, तो म्हणाला यांच्या पोटातील बाळ माझे आहे, संशयावरून त्यांच्या पतीने घराबाहेर हाकलले त्या गुरांच्या गोठा मध्ये राहू लागल्या. एका दिवशी बेशुद्ध अवस्थेत त्या बाळंत झाल्या, जवळील दगडाने बाळाची नाळ ठेचली. आश्रयासाठी आईकडे गेल्या, आईने हाक लावून दिले भूक लागली होती म्हणून त्यांनी खाण्यासाठी मागितले तेव्हा, त्यांनी विटलेल्या कन्या दिल्या त्या घेण्यासाठी ही काही नाही दिले तेव्हा माईंनी लहान बाळाचे बाळवते घेतले त्यामध्ये त्या कन्या घेतल्या. त्यांच्या नवऱ्यानेच एका ट्रक वाल्याला पैसे देऊन बाहेर सोडायला सांगितले. अशाच त्या वर्धा सोडून खानदेशाकडे वाटचाल केली प्रवासात रेल्वेच्या संडासाच्या डब्याजवळ बसल्या कारण दोन होते एक टीसी पासून बचाव करणे, कारण पैसे नव्हते. दुसरे लोकांच्या वाईट नजरेपासून बचाव करणे. स्वतःला जाळीत जनतेला न्याहाळीत आयुष्य सुरू होते. आदिवासी आणि गाईंना संरक्षण देण्यासाठी टायगर प्रोजेक्ट ला विरोध केला चिखलदरा येथे अमरण उपोषण केले. पुणे अनुभव यामध्ये सांगतात भारत रशिया मैत्री करारावेळी त्या गर्दीमध्ये घुसल्या तसंभेमध्ये तिथे त्यांना ओळख मिळाली बालगंधर्व यांच्याशी मुलाखत झाली. समाजाची सेवा करण्यासाठी स्वतःच्या मुलीला पुणे येथील दगडूशेठ ट्रस्ट कडे सोपविले. आकाशवाणी पुणे येथे गाणे गाऊ लागल्या गाणे कसे शिकला असे विचारले असता त्या म्हणायच्या, भूक लागल्यावर सुरात रडले .प्रसिद्ध आणि बदनामी तसेच मुक्तीची साडेसाती याच्यामध्ये सांगतात प्रभा डाके नावाच्या मुलीला घरच्या हिंसेतून सोडवताना माध्यमाने केलेली बदनामी आणि किडन्यापर म्हणून झालेले केस यावेळेस दीपक सपकाळ या मानलेल्या मुलाच्या वडिलांनी तक्रार केली. मुंबईच्या वकिलाच्या मदतीने निर्दोष निकाल मिळाला. शेवटी विजयातही पराजय झाला.
पुस्तकाच्या शेवटी आभार पत्र
थोरांचे अभिप्राय आहेत प्राध्यापक मानसी दिवेकर कोल्हापूर यांची छान कविता आहे
असे जगणे पाहता लक्ख डोळे उघडते, लेक अशी पोटी येता वसुंधरा आई होते.
1994 कुंभार वळण येथे ममता बाल सदन, सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह चिखलदरा, गोपिका गो संरक्षण केंद्र वर्धा, ममता बाल सदन सासवड, फंडिंग साठी मदर ग्लोबल फाउंडेशन स्थापन केले. म्हणून केंद्र शासनाचा 2021 पद्मश्री पुरस्कार मिळाला. अशाप्रकारे त्या खूप कष्ट सोसत होत्या आणि त्या एका ठिकाणी म्हणतात
घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधी गेला.
जीवनाची प्रेतयात्रा थांबलेली स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्याच माणसांनी.
अशाप्रकारे माईन माईंना कोणीही आश्रय नाही दिला स्वतःच्या पतीने आईने हाकलवून दिले. समाजातील वाईट नजरा यापासून सुटका करताना खूप त्रास झाला कोणावरही विश्वास ठेवू का नको? असे झाले. तरीही त्यांनी अनाथ मुलांची आई व्हायचं ठरवलं .त्या म्हणतात मला घरच्यांनी हाकलले, पण तरीही आज मला 282 जावई, 48 सुना आहेत. आणि खरंच सुरेश भटांनी लिहिलेली कविता माझ्यावरच आहे की काय, ती अशी,
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
धन्यवाद.
Show Less