Dr. Patave Tarnnum R. (Asst. Prof.) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur . मृत्युंजय" याचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंतः महाभारताच्या
Read More
Dr. Patave Tarnnum R. (Asst. Prof.) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur .
मृत्युंजय” याचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंतः महाभारताच्या युद्धात अनेक महारथी मरण पावले, परंतु मृत्युनंतरही जो मृत्युंजय ठरला तो होता कर्ण, “महादानशुर कर्ण!
कर्णाच्या च्या व्यक्तीरेखे वर ही कादंबरी आधारलेली आहे. यातील अनेक कथा बन्याच लोकांना माहित आहेत. खलनायक म्हणून भासणारा कर्ण हा मुळ स्वरूपात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे हे ही कादंबरी. पटवून देते. दानशूरपणा कशाला म्हणतात संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जोपासावी , शक्तीची घमेंड कशी मोडावी हे शिकवणारी ही कादंबरी आहे.
या कादंबरी ला वाचताना जणू आपणही महाभारतात आहोत, त्या युगात आहोत असा भास होऊ लागतो. ही कादंबरी वाचताना वाटते कर्णाचे जीवन नव्याने उलगडू लागत. कर्ण ज्याने स्वत: च्या शब्दासाठी आपलं अस्तित्व, दान केले. आपले प्रण पूर्ण केले स्वतःचे वचन पूर्ण केले.
खारोखर, कुंतीला मिळालेले असामान्य वरदान, त्यातूनच त्यातून कर्णाचा झालेला जन्म , जगाच्या भितीने. कुतीने घेतलेला कठोर निर्णय, गुरु द्रोण व पांडवां कडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधना सोबत जन्मास आलेले मित्रप्रेम, द्रोपदी वस्त्रहरण, कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्व गोष्टी प्रत्येकास माहित आहेतच. पण प्रत्येक गोष्टीत काही बारीक बारीक अश्या कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. ते काही गोष्टी या पुस्तकातुन उलगडल्या.
आजचा तरुण व सर्वांनी वाचावी अशी ही मराठी साहित्यातील सावंत यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय “कादंबरी आहे.
आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की पुस्तके प्रत्येक्ष हातात घेऊन वाचण्याची जी मजा आहे ती e-book बाचण्यात कधीही येणार नाही.
धन्यवाद !
Show Less