ग्रंथ परीक्षण : जाधव प्रीतेश, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला
Read More
ग्रंथ परीक्षण : जाधव प्रीतेश, महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पंचवटी नाशिक.
नमस्कार मित्रांनो आज आपण मृत्युंजय या कादंबरी बद्दल जाणून घेणार अहित ठी कादंबरी शिवाजी सावंत यांनी महाभारतानीन महारशी कर्ण यांवर लिहीली असून मेहता पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली. अहि. कादंबरीची पृष्ठ संख्या ६१८ असून किंमत ४५०/- आहे. या कांदबरीचे लेखक शिवाजी सावंत यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४० साली कोल्हापूर जिल्हया- तील आजरा गावात आला.
कादंबरीच्या पृष्ठावर दिग्विजयी, दानवीर, अशरण सूर्यपुत्त कर्णाचे चित्त असून स्वर्गीय दीनानाथ दलाल यांनी उत्तम रित्या साकारलेले अहि. शिवाजी सावंत यांच्या प्रदीर्घ संशोधन चिंतन व मनन यांतून रससंपन्न अशा मृत्युजय था वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला. व शिवाजी सावंत यांचे महाराष्ट्रभर नाव झाले. १९ey साली भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फ मूर्तिदेवी पुरस्कार जाहिर झाला.
जगातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणून महाभारताकडे बघितले जाते. यांत असंख्य व्यक्ति- रेखा रेखाटल्या आहेत. या महाभारतात प्रेम,
त्याग, लोभ, सत्ता, हिंसा व्यभिचार, राजकारण, दुःख करुणा अशा भावनांनी भरलेले हे महाकाव्य आहे, या सर्व व्यक्तिरेखा मध्ये उदुन दिसते.. ली व्यक्ती म्हणजे कुंतीपुत्त्र, राधेय, सूर्यपुत्त, सारथीपुत्त, अंगराज अशा विविध उपमांनी परिचित महारशी कर्ण.
महाभारतातील सामान्यतः खलनायक म्हणून प्रसिद्ध असनाच्या महारथी कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. नायक असूनही महारथी कर्ण बहुतांश सर्वत्त ती खलनायक दिसुन येतो. परंतू शिवाजी सावंत यांच्या शब्दातून लिखित ही कादंबरी उलगडल्यावर महारशी कर्णाचे
जीवन नव्याने आपल्या मनात उलगडायला लागते. था कादंबरीचे कर्ण या नावाला नवीन ओळख दिली आहे. था कादंबरीतील प्रत्येक पानावर महाकाव्यातील व्यक्तिरेखाच्या मुखांतून वदलेले शब्द कर्णाचे जीवनपर दर्शवत अहित. ज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तिरेखांच्या लोभसवाणा अनुभव येलो.
लहानपणापासूनच क्षुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे गुण अत्यंत प्रभावीपणे मांडले अहित. सतत दुर्लक्षित असल्यामुळे स्वतः ला सिध्द करण्याची क्षमता आपणांस नवीन ऊर्जा देते. लाकद, बुध्दिमत्ता व सत्ता असुनही चुकीच्या निर्णयांचा काय परिणाम असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कर्णाचे जीवन. कुंतीला मिळालेले असामान्य वरदान त्यातूनच कणीचा झालेला असामान्य जन्म जगाच्या भितीने कुंतीने घेतलेला निर्णय, गुरू होणाचार्यानी व पांडवांनी केलेला अपमान त्यातूनच दुर्योधना सोबत जन्माला आलेले
असामान्य मित्तत्प्रेम. द्ववपदी वस्त्रहरण व कुरुक्षेत्रातील झालेले युध्द यांसर्वच गोष्टी सर्वाना माहीती अहित. यांतील कितीतरी लहान लहान गोष्टी आजही आपणांस माहीती नाहीत. ती अनुत्तरीत आहेत.
अशा काही लहान गोष्टी सांगायचे म्हणाल तर कुंतीला ही पुत्तताप्ती कशी झाली, सारथ्याच्या घरी कर्णाचे बालपण कसे होते. शीण म्हणून असलेला राधेचा पुत्र कर्णासोबत कसा वागला. व कर्णाची पत्नी वृषाली नक्की कशी होती. त्याच्यातील प्रेमाचे संबंध कसे होते. कवचकुंडले देवेंद्वाला दान केल्यानंतर कर्णाचे शौर्य कमी झाले का. सूर्याचा पुत्त्र असूनही धर्माच्या विरोधात कर्णाने अधर्मी दुर्योधनास नेहमी साथ का दिली. केवळ मैतीसाठी. हवपदीचे रक्षण कर्णाने का केले नाही, अभिमन्युला मारतांना त्यात का सामील होता, खरेच कर्ण अधर्मी होता का ?
तर मग श्रीकृष्ण विरोधी पक्षांत असतानाही त्यांनी कर्णाच्या अंतिम संस्कारात रस का दाखवला ? जसे जसे आपण पान उलगडत जाक तसे- तसे कर्णाचा जीवनप्तवास आपल्याला समजायला लागतो. व जागीच खिळवून ठेवतो.
शिवाजी सावंत यांनी लिहिलेली ही कादंबरी वाचकांची चाहती ठरली आहे. मराठी साहित्यात मैलाचा दगड उरलेली ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशी आहे. डोळयांपुढे दिसणारी गोष्ट ही खरी नसते. त्यामागे अनेक घटना, अनेक योजना या कळत नकळत चालू असतात. मूळ गोष्ट सर्वाना माहीत असूनही हे पुस्तक आपल्याला रोमांच तयार करते. पुढे काय होईल याची हुरहुर आपल्याला पुस्तक खाली ठेवू देत नाही. दानवीर महारशी कर्णाची ही कहाणी आपल्याही आयुष्यातील अनेक रिकाम्या जागा भरून काढते यांत शंकाच नाही
Show Less