
रावण -राजा राक्षसांचा
By शरद तांदळे
आसमंत भेदणारी महत्त्वाकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, धैर्य, सामर्थ्य, न्याय- नीतिमत्ता आदी गुणांनी संपन्न समुच्चयाचे संचित बरोबर घेऊन स्व-अस्तित्व सिद्ध करून बुद्धीच्या जोरावर एल्गार करत स्वतःचं साम्राज्य उभं करणारा राक्षसांचा राजा आहे मी. हजारो वर्षांपासून जाळत आलात तरी संपलो नाही. आजवर कथा, साहित्य, पुस्तके यातून मी बोललो नाही, त्यामुळेच तुम्हाला कधी समजलो नाही. दुर्गुणी, अवगुणी म्हणून मला हिणवले गेले. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्तोत्र, यातून ज्ञानाच्या नवीन कक्षा रुंदावल्या. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून मी राक्षस संस्कृतीचा पाया रचला. दर्शन, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद, इत्यादीं सारख्या अनेक विषयांत पांडित्य मिळवूनही मला खलनायक ठरवून माझी