Nehere Siddhi,IV B.Arch.C,STES'S Sinhgad College of Architecture, Pune-41 मोहन वायचळ यांचे वास्तू पर्व हे पुस्तक वास्तुकलेच्या विविध पैलूंवर
Read More
Nehere Siddhi,IV B.Arch.C,STES’S Sinhgad College of Architecture, Pune-41
मोहन वायचळ यांचे वास्तू पर्व हे पुस्तक वास्तुकलेच्या विविध पैलूंवर भाष्य
करणारे महत्त्वपूर्ण साहित्य आहे . वायचळ यांचे लेखन वास्तु विशारदांसाठी नव्हे
तर स्थापत्यकलेत रुची असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
सारांश :-
भारतीय स्थापत्य परंपरा आणि आधुनिकतेचा एकत्रित अभ्यास मांडण्यात आला
आहे. त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील वास्तुकलेच्या विशेष पैलूंवर चर्चा
केली आहे, जसे की सामूहिक घर बांधणी रचना सामाजिक मान इत्यादी विविध
उदाहरणांच्या आधारे त्यांनी वास्तुकलेतील साधेपणा कार्यक्षमता आणि
सौंदर्यशास्त्र यांचा अभ्यास उत्तम रित्या उलगडला आहे.
विश्लेषण :-चार्ल्स कोरिया यांचे कोल्हापुरात वास्तुकलेवर प्रवचन होते त्यासाठी
ते कोल्हापूर दौऱ्यावरती आले होते त्यांच्या स्वागताची जबाबदारी लेखकांवर
होती त्यामुळे पाहुण्यांना कोल्हापूरच्या डाम डौलाने कसे चिं बवायचे ही परंपरा
कशी जपायची याचे आडाखे बांधत ते स्टेशनवर गेले होते ते कसे असतील कसे
बोलतील या साऱ्या विचारांची मिसळ लेखकांच्या मनात होती. कोरियांचे आगमन
झाल्यानंतर त्यांनी लगेच या मातीला आपले मान देण्याचा प्रयत्न केला मराठीत
विचारणा करून मराठी बद्दलची आस्था आणि सन्मान ही राखला. स्टेशन च्या
वास्तूच्या विस्तारी करण्याची नजाकतीही टिपली .कोरियांच्या नम्रपणाची
जाणीव झाली. लेखक आणि त्यांची भेट छत्रपती शाहू राजांशी योजिले होती
.त्यांच्या विद्वत्तेची व्याप्ती महाराजांनाही आली . कोल्हापूरच्या संस्कृतीची
ओळख लेखक त्यांना पदोपदी करून देत होते.शिक्षणापेक्षा वातावरणाचे परिणाम
बालमनावर फार होतात हा विचारही त्यांनी प्रकट केला .
पंचगंगा घाटाकडे सर्वांनी प्रस्थान केले. नदी घाटाचे ते विहंगम
दृश्य पाहून ते आनंदित झाले. शेतवाडी लाल माती आणि दगडी घाट ही
संस्कृतीची बैठकच त्या वस्तीला लाभली होती जणू ! कोरियांचे नाणे परत
करण्याच्या कृतीने लेखक भाराहूनच गेले. मरीन ड्राईव्हची तुलना या दृश्यांची
त्यांनी केली हे दृश्य नक्कीच उजवे ठरेल. कोल्हापुरातील मातीशी जोडण्यासाठी
दिवसभर कोरिया कोल्हापूर चप्पल घालून फिरले ही एक आठवणही लेखक
सांगायची विसरत नाहीत.लेखकांना इंग्रजी भाषा एवढी अवगत नव्हती ते
कोरियांशी त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत होते पण कोरिया दांपत्य ते
समजावून घेत होते. त्यांनी एसी बंद असल्याची तक्रार सुद्धा केली नाही.
कोल्हापूरच्या चपलांचे त्यांना भारी कौतुक होते.बेळक यांचेही त्यांनी फोटो घेतले
. अंबाबाई मंदिर पाहण्याचे पाहुण्यांना फारच कुतहूल होते. स्तंभाचे अगणित
प्रकार तसेच अर्धवट घडणी पाहून त्यांचा झालेला संभ्रम टिपला आहे.
सभामंडपातील छताकडे पाहून तो त्यांच्या एका वास्तू रचनेचा पाया असल्याचे
ते स्पष्टही करतात .
देवळाबाहेरी ओसरीतील दुकानगिरी पाहतच ते कुतूहल मिश्रित झाले. हेमाडपंती
रचना त्यांना चमत्कारिकच वाटली.ऊन सावलीतल्या भवानी मंडपाचा आवाज
काही त्यांनी अनुभवला .पुढे टाऊन हॉलची हॉलची गॉथिक इमारतीची योजना
होती पण ती अवेळी कोलमडली या बद्दल लेखकांना वाटलेले खंतही त्यांनी
अधोरेखित केली आहे .पुढे ते भोजन वामकुक्षी झाल्यानंतर ते वास्तुकलेवर
प्रवचन देण्यासाठी मार्गस्थ झाले. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील प्राचीन
तत्वावर अभ्यास केला विविध प्रकल्पांची माहिती देताना त्या स्थानिक
पार्श्वभूमीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील
स्थापत्य शैली या स्थानिक साहित्याचा उपयोग करते ती पर्यावरण स्नेही व
किफायतशीर असते. लेखकाने कोल्हापूर सारख्या शहरातील परंपरागत
शिल्पशैली आणि स्थानिक लोकांच्या राहणीमानाचा ताळमेळ कसा साजला तो
हे विशद केले आहे. या पुस्तकाचा मुख्य संदेश म्हणजे स्थापत्यकलेने
पर्यावरणाशी सुसंगत राहिले पाहिजे आणि ती समाजाच्या गरजांशी जोडली गेली
पाहिजे.
ताकद आणि कमकुवत बाजू:-
ताकद यामधील ताकद म्हणजे लेखकाने वास्तुकलेच्या परंपरागतेची आणि
आधुनिकतेची सांगड अप्रतिम पणे घातली आहे. त्यांनी स्थानिक साहित्य
पर्यावरण स्नेही डिझाईन्स आणि शाश्वत स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांचा सखोल
अभ्यास केला आहे. लेखकाने वास्तु शिल्पाशी निगडित सामाजिक सांस्कृतिक
आणि नैतिक अंगावरील भर दिला आहे. हे या पुस्तकाला स्थापत्य कलेवरील
पुस्तकांपेक्षा वेगळे करते.
कमकुवत बाजू :-पुस्तकातील आधुनिक वास्तुकलेचे वर्णन तुलनेने थोडे कमी
वाटते त्यांनी आधुनिक काळातील ठळक प्रकल्प किंवा तांत्रिक बाजू
सविस्तरपणे स्पष्ट केल्या असत्या तर हे पुस्तक अधिक समृद्ध झाले असते.
वैयक्तिक विचार:-
वास्तू पर्व मधून वाचकाला पारंपारिक स्थापत्य शास्त्राची महत्त्व पूर्ण तत्वे
समजतात जसे माणुसकेंद्रीय दृष्टिकोन आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य
उपयोग. वास्तुकलेला एक सामाजिक जबाबदारी म्हणून मांडले आहे.
पुस्तकाचा सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणजे सापत्य कला ही केवळ
सौंदर्यशास्त्रापुरती मर्यादित नाही तर ती समाज पर्यावरण आणि लोकांच्या
गरजांसाठी उपयुक्त असली पाहिजे. पुस्तक वाचून स्थानिक स्थापत्यशास्त्राचा
अभिमान वाटतो. यातून आपल्याला भारतीय परंपरेतील वास्तुकलेचे महत्त्व
समजते. तसेच त्याची आधुनिक काळातील उपयोगिता विचारात घेऊन आपले
नवीन प्रकल्प तयार करण्याची प्रेरणा मिळते. लेखकाचा विचार वाचकांना
स्वतःच्या वैयक्तिक प्रकल्पांमध्ये शाश्वत आणि पर्यावरण पूरक दृष्टिकोन
स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करतो .
निष्कर्ष :-
या परीक्षेत कोरिया यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लेखकाला उलगडत गेलेले पैलू अगदी
अचूक शब्दात वर्णिले आहेत .कोरियांची वास्तुकलेच्या पाऊल खुणा शोधण्याची
पद्धतही यातून दर्शविली गेली आहे. या वाचनातून लेखकाच्या बहुआयामी
व्यक्तिमत्त्वाची जाणीव होते. या विस्तारलेल्या वास्तु विश्वास त्यांनी आपल्या
माय मराठीला आणि संस्कृतीला वैभव प्राप्त करून दिले आहे . अत्यंत
अभ्यासपूर्वक आणि बारकाईने पाहण्याच्या दृष्टिकोन तसेच शुद्ध मराठी यामुळे
या परिच्छेदाला एक वेगळीच मजाकच प्राप्त होते.आज-काल वास्तू कलेवर
लेखन हे इंग्रजीतून होत आहे मराठीतील हे लेखन सर्वांनी दखल घेण्याजोगे आहे.
‘वास्तु पर्व” या ज्ञानाच्या महाद्वाराची याची आणि अद्भुत प्रवासाची अनुभूती
प्रत्येकाने घ्यायला हवी. नवी पावलां जी या वास्तु विश्वास येत आहेत त्यासाठी
वास्तु पर्व एक दिशादर्शक असेल यात काही शंकाच नाही. लेखकाचा एखाद्या
वास्तूकडे आणि वास्तुकले कडे पाहण्याचा दृष्टिकोन ही स्पष्ट होतो. या
वास्तुविशेच्या वर्तमान भूतकाळ आणि भविष्यकाळातील बंधांचा मागोवा लेखक
घेतात, त्यामुळे हे लेख वाचनीय आहेत. मराठी साहित्यात वास्तू पर्व ते
वेगळेपण नक्कीच उठावदार असेल.
Show Less