वेध अहिल्याबाईंचा
वेध अहिल्याबाईंचा" लेखक डॉक्टर देवीदास पोटे. अहिल्याबाईं होळकर विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आहे.ती एक धर्मशील आणि कर्तव्यनिष्ठ महाराणी होती. कर्मयोगिनी आणि राज्य योगिनी होती. आपले राज्य शिवार्पण केलेली शिवयोगीनी होती. प्रजा जनांची लोक माता होती. अहिल्याबाईंची कारकीर्द इतिहासाच्या पानांवरील एक तेजस्वी यशोगाथा आहे . अहिल्याबाई हे समर्पित कल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे. राजनीतीला समभाव, उदारमतवाद आणि सहिष्णुता यांची जोड देऊन त्यांनी भारतीय परंपरेत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. अहिल्याबाईंच्या विविध अनोख्या गुणांचा आणि त्यांच्या विश्वात्मक विचारधारेतील विविध पैलूंचा अविष्कार या ग्रंथात आणि समर्थपणे मांडला आहे .अहिल्याबाई च्या कारकिर्दीतील इतिहासाची सोनेरी पाने म्हणजे त्यांच्या अनेकांगी कर्तृत्वाचा लखलखता आलेख
Book Reviewed by : कल्याणी चंद्रशेखर क्षीरसागर
Gokhale Education Society’s J.D.C. Bytco Institute of Management Studies and Research Nashik -5
अहिल्याबाई होळकरांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करत असताना त्यांना मानवंदना देणे त्यांच्या स्मृतींना स्मरण करणे आपल कर्तव्य आहे.वेध आहिल्याबाईनचा हे dr देविदास पोटे यांचे परम मित्र प्रकाशनाचे २०२२ चे प्रकाशित झालेले चरित्र त्रिशताब्दी वर्षा निमित्त वाचले ते मला अतिशय आवडले त्या बद्दल मी लिहिले आहे .
अहिल्याबाई ह्या विश्वाच्या इतिहासातील एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व होऊन गेले .त्या एक धर्मशील कर्तव्यनिष्ठ महाराणी होती ,प्रजावास्ल माता शत्रूला भय आणि दरारा वाटणारी दीनदुबळ्या ना उपेक्षितांना आश्रय देणार,उपासनेची एकनिष्ठ देवता उत्तम्प्रशासक कर्मयोगिनी राज्योगीनी शिवयोगिनी होती.स्वतःच पर्वता येवड दुख बाजूला सारून अध्यात्मिक सात्विक वृतीने त्या दुखावर मात केली आणि आदर्श राज्य करण्याच स्वप्न ह्या राणी ने पाहिलं.धर्माचरण आणि राजकारण याची सुयोग्य सांगड त्यांनी घालुन इहलोक आणि परलोकातील साधर्म्य त्यांनी साधलं .
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी १७३३ साली अहिल्याबाई लग्न होऊन इंदूरच्या होळकरांच्या घरात आल्या होळकरांची सून म्हणुन खंडेराव यांची पत्नी म्हणुन त्याचं कर्तबगार तडफदार व्यक्तिमत्व अधिकच धारदार झाल .अहिल्याबाई अहमदनगर च्या चौवडी गावातील धर्मनिष्ठ शिंदे परिवारातील सुकन्या होत्या . कुम्बेरीच्या वेढ्यात खंडेराव यांना वीरमरण आले आणि अहिल्या बाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला .मात्र या प्रसनी त्यांना सती न जावू देण्याचा निर्णय मल्हारराव यांनी घेऊन त्यांना प्रशासकीय कार्यात सामील करून घेतलं . .कुम्भेरीच्या संग्रामात खंडेराव गेले तेव्हा मल्हारराव यांनी त्यांना सती न जावू देता सुन म्हणुन तिच्या कडे न बघता “अहिल्या मेली खंडू आहे हा भरवसा “ह्या शब्दात त्यांनी अहिल्या कडे एक कर्तबगार मुलगा म्हणुन पाहिले .म्हणुनच म्हणावस वाटत ,”त्या सासरे सुनेचा प्रवास विस्मयकारक होता .असे नाते गुरुशिष्याचे नाते एकमेवाद्वितीय असेच होते .मल्हारराव यांनी प्रजाहीताची कामे केलीच पण गुरूच कार्य पूर्णत्वास नेण्याचं काम अहिल्ये ने केले तरुणपणात आलेले वैधव्य त्यांना इतक्या उंच शिखरावर नेईल अस त्यांना सुद्धा वाटल नसेल ते वैधव्य त्यांच्या कर्तृत्वला पैलू पाडत गेले .सती न जाणारी अहिल्या सतीत्व जपणारी महासती ठरली .त्या स्वयंभू होत्याच पण त्यांच्या यशाचा आलेख अधिक उंचीवर गेला .
इंदूरचे होळकर शिवपंथी असल्यामुळे शिवपुजक होते म्हणुनच त्यांनी सोमनाथ ओंकारेश्वर परळी वैजनाथ नागनाथ विश्वनाथ त्रंबकेश्वर घृष्णेश्वर या ठिकाणी जीर्णोद्धार आणि इतार्ही काम केली .आपले राज्य मी शंकर अर्पण करते असे म्हणत त्यांनी शिवशंकराच्या साक्षीने राज्यकारभार चालवला .निष्काम निरपेक्ष आणि न्यायपूर्ण पावित्र्य तसेच वैराग्याचे प्रतिक म्हणून त्यांच्या हातात कायम शिवपिंड आपल्याला दिसते राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो हे राजा छत्रपती आणि राणी शिवयोगिनी अहिल्ये ने दाखवुन दिले .महाभारता चा इतिहास वाचताना सुई च्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जागा आपल्या भावंडाना न देणारा दुर्योधन आणि आपले सारे राज्य लोककल्याणासाठी अर्पण करणारी ही साध्वी एकमेवाद्वितीय. .पाणी म्हणजे जीवन आपल्याला जगवणारे पाणी . पंचमहाभूतान पैकी जल हे पृथ्वी वरचे तत्व आहे जलदान श्रेष्ट्दान म्हंटले आहे ,पाणी ही मुलभूत गरज आहे ,अहिल्याबाई नी पाण्याचे महत्व ओळखुन पाण्या बाबत आपले धोरण आखले त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी विहिरी ,तळे,कुंडे,बारवा बांधली नद्यांवर बंधारे बांधले मंदिरांचा जीर्णोद्धार केला.पेठा वसवल्या महेश्वरी चा वस्त्रोउद्योगा करून त्यांनी विणकरांना रोजगार मिळवून दिला माहेश्वरीं साड्या आणि धोतर जगभर प्रसिद्ध झाले . इंदूरचे वैभव असलेला राजवाडा ,चांदवडचा रंगमहाल ,महेश्वरचा राजवाडा नर्मदेचा अहिल्याघाट नर्मदेची मय्या महेश्वरचा राजवाडा आणि नर्मदेचा अहिल्याघाट नर्मदा मय्या त्यांना विशेष प्रिय गोष्ट होती .स्थापत्य आणि शिल्पकलेला उत्तेजन मिळावे म्हणुन त्यांनी देवळे विहिरी धर्मशाळा घाट असे लोकउपयोगी बांधकाम करून पाषाणाची निर्मिती त झालीच पण एक भारतभर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या .
राज्यकारभार चालवताना त्यांनी करभार कमी केला,शेतकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असलेला देश म्हणुन त्यांनी शेती मध्ये सुद्धा त्या काळात खूप सुधारणा केल्या कुळकायदा शेतासरे यातील लुटालूट थांबवली .आमराई वसवली पक्ष्यांना अन्न मिळावे मुक्त संचार करता यावा म्हणुन उभी पिक विकत घेणारी आणि जलचरांनचे पोट भरावे म्हणुन नदीत कणकेचे गोळे टाकणारी राजमाता वृक्षचर ,भूचर जलचर सगळ्यांची आई झाली .आज आपण एकविसाव्या शतकाचे प्रतीनिधीतव करत आहोत पण २५० वर्षापूर्वी स्त्रीत्वाचा सन्मान करणारी अहिल्यादेवी वंदनीय म्हणावी लागेल विधवा स्त्रियांना दत्तक घेता यावे पतीच्या संपत्त्तीचाआपल्या इच्छे नुसार विनियोग करता यावा सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले स्त्री ला सन्मान त्या काळात दुरापास्त होता तेव्हा त्या झटल्या आणि त्यांच्या हक्काचे त्यांना मिळवून दिले .स्त्री शिक्षण ,केशवपन, सतीची चाल ,विधवांन होणारा जाच ह्याचे प्राबल्य खूप जास्त होते त्या काळात स्त्री ने फक्त चूल आणि मुल सांभाळावे पतीची सासू सासर्यांची सेवा करावी हीच विचारधारा रूढ होती ,धर्म कर्मकांड यात समाज गुरफटला असताना त्यांनी त्यातून स्त्री ला तिचे हक्क आणि अधिकार प्राप्त करून देण्याच मोठ जोखमीचे आणि धाडसाचे काम केले .
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहिल्याबाई एक वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामिनी होत्या ,त्या शुरवीर आणि लढवय्या न्यायी वृत्तीच्या होत्या .कर्तव्यनिष्ठता ,धर्मनिरपेक्षता आणि सात्विकता या मुळे त्या पुण्यश्लोक झाल्या .अत्यंत साधे निर्मळ जीवन आणि पराकोटीचे दातृत्व या गुणांन मुळे त्यांना जगावेगळ ठरवलं .अश्या न्यायशील धर्मशील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना त्यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्ष निमित्त शतशः प्रणाम !