Book Review: Disha Vinod Jadhav, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana व्यक्तिमत्व विकास - वाचनाची सवय ही आपल्यात मोठा बदल घडवून आणते.
Read More
Book Review: Disha Vinod Jadhav, First Year B Pharmacy, Divine College of Pharmacy Satana
व्यक्तिमत्व विकास – वाचनाची सवय ही आपल्यात मोठा बदल घडवून आणते. पुस्तक आपले करिअर आणि व्यक्तिमत्व सुधारण्यास खूप मदत करते. व्यक्तिमत्व विकास या पुस्तकात स्वामी विवेकानंदानी व्यक्तिने आपला विकास कसा करावा याबद्द्ल सांगितले आहे व्यक्तिमहत्व म्हणजे व्यक्तिचा संपूर्ण स्वभाव व त्याचे चारित्र्य होय. मनुष्य कसा वागतो त्याच्या भावना व विचार कसे आहेत आणि प्राप्त परिस्थितीत त्याचे आचरण कसे आहे हे व्यापकपणे त्याच्या मनाच्या स्थितीवरून ठरविले जाते केवळ बाहेरील देखावा किंवा व्यक्तिची भाषा किंवा शिष्ठाचार तिच्या व्यक्तिमत्वाची फक्त एक झलक असते. त्यांत व्यक्तिचे खरे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत नाही. वास्तविक दृष्ट्या व्यक्तिमत्व विकास हा मनुष्याच्या आंतरिक गुणविकासाला व्यक्तिच्या अधिक सखोल स्तराच्या शुद्धिकरणाला सुचित करतो.
या पुस्तकात लेखकाने सांगितले कि आपली संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्या दुसऱ्यांवर अवलंबून राहु नको आपण कशाचे अधिकारी आहोत आणी कोणती वस्तु ग्रहण करून आत्मसात करू शकू.याचा निर्णय आपले कर्मच करेल आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वताच जबाबदार आहोत आणि पुढे जे काहि होण्याची आपली इच्छा आहे ती होण्याची शक्ती देखी आपल्यात विद्यमान आहे. आणि ज्या गोष्टीला आपंण पात्र असतो तीच आपल्याला मिळत असते.
सदर पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारातुन सांगितले की जीवन म्हणजे काय? तर जीवन म्हणजे विकास म्हणजेच विस्तार म्हणजेच प्रेम म्हणून प्रेम म्हणजेच जीवन आणि तेच जीवनाच्या गतीचे नियमन करते स्वार्थपरायणता म्हणजे मृत्यू. आणि हे घ्या लोकात परलोकात सर्वत सर्वकाळी सत्य आहे दुसन्यांचे कल्याण न करणे हाच मृत्यू. अवतीभोवती वावरणा-या मानवपशुपैकी नव्वद टक्के लोक मेल्यागतच असतात. तेच जीवनाच्या गतीचे नियमन करते. स्वार्थपारायणता म्हणजे मृत्यू. आणि हे ह्या लोकात परलोकात सर्वत सर्वकाळी सत्य आहे दुसन्यांचे कल्याण करणे म्हणजेच जीवन आणि दुसन्यांचे कल्याण न करणे हाच मृत्यू. अवतीभोवती वावरनाऱ्या मानवपशुपैकी नव्वद टक्के लोक मेल्यागतच असतात.
स्वामी विवेकानंदानी तारुण्याचे तीन ‘त’ कार सांगितले आहेत. तेजस्विता, तपस्विता, आणि तत्परता. तेजस्विता म्हणजे तरुणाने तेजस्वि असले पाहिजे त्याने न झुकतं आपले जीवन हे यशस्वी बनवले पाहिजे. तरच तो तरुण समजाला जातो. परंतु आजचा तरुण तास दिसत नाही तो लाचार, बापुडा, दिनदुबळा बनला आहे. तपस्विता म्हणजे तरुणाने जीवनान तपाला महत्व दिले पाहिजे. तप म्हणजे एखादी गोष्ट ठरवली असेल तर ती कायम स्वरुपी करत राहावी. त्यालाच तप म्हणतात म्हणून तरुणाने आपल्या अंगी तपस्विता हा गुण अंगी कारला तर तो यशस्वी ठरु शकतो. तत्परता हा गुण तरुणाच्या अंगी असल्यास त्याचा विकास झपाट्याने होत असतो. एखादी गोष्ट ठरविली तर ती लगेच केली पाहिजे आजच्या तरुणान वरील कोणताच गुण दिसत नसल्यामुळे तो भोगवादी लाचार, दिनदुबळा बनला आहे. असे स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारातून व्यक्त केले आहे.
या पुस्तकात युवकांना स्वामीविवेकानंदानी त्यांच्या ब्रीदवाक्यातून आव्हाहन केले की, युवकांनो, “उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.” सामान्य दैनंदिन जीवनातही हे विधान महत्वाचे आहे आपण कुठेही असू, आपण प्रगती करणे आपण कार्य करणे थांबवू नये. आपण आपला संघर्ष चालु ठेवला पाहिजे. जेव्हा अपयश आपल्याला त्रास देतात तेव्हा आपण कधीही निराश किंवा उदास होऊ नये आपण पुढे जायला हवे, आणि ध्येय गाठे पर्यंत थांबू नये.
स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे की आजचा युवक कसा असायला हवा त्याच्या चेहऱ्यावर तेज असायला हवे ते अगदी निटनेटकेपणाने स्वच्छ राहायला हवे नीट कपडे, व केस स्वच्छ ठेवायला हवे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्याचे विचार चांगले असले पाहिजे. दुसन्याबद्दल त्याच्या मनात आदर असला पाहिजे मदतशील असला त्याच्या मनात देशाबद्दल प्रेम असले पाहिजे. तर तो खरा आदर्श युवक मानला जातो असे सांगितले
व्यक्तिमत्व विकास’ या पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी व्यक्तिच्या विकासाबाबत अप्रतिम विचार सांगितले आहे. यातून आपल्या आयुष्याला दिशा मिळवण्यासाठी अमूल्य अशी देणगी मिळते प्रामाणिकपणा, माणुसकी, विविध संस्कार मुल्यांनी परिपूर्ण असे हे पुस्तक सर्वांनी नक्की वाचायला हवे.
Show Less