हे आज मी निवडलेले पुस्तक आहे, आणि मला खूप दिवसांपासून या पुस्तकाची निवड आणि आवड होती. आणि असे
Read More
हे आज मी निवडलेले पुस्तक आहे, आणि मला खूप दिवसांपासून या पुस्तकाची निवड आणि आवड होती. आणि असे म्हणतात ओढ असायला हवी. वेळ अपोआप मिळतो.पुस्तकांमधील जग पाहण्यासाठी आणि तसेच हे एक माझ्या आवडीचे पुस्तक घेऊन मी मन लावून वाचले. ते पुस्तक म्हणजे शिवचरित्र. शिव चरित्र म्हणजे शिवरायाचा सत्य सत्य इतिहास मांडणारा ग्रंथ. आणि या पुस्तकाचे लेखक आहे पुरुषोत्तम खेडकर हे आहेत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर असे लिहिले आहे कि शिवाजी या तीन अक्षरी नावाने जग व्यापलेले आहे. खरच महाराजाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच.आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन म्हणजे ,शिवगर्जना. महाराज गडपती ,गजअश्वपती ,भूपती,प्रजापती,सुवर्ण रत्न श्रीपती,अष्टप्रधान वेष्ठित ,न्याय ललकार मडीत ,शस्त्रास्त्र शास्त्रपारंगत ,राज्नितीधुरंधर ,प्रौढप्रताप पुरंदर ,क्षत्रिय कुलावन्तस, सिन्हासंनाधीश्वर , महाराजाधिराज ,योगीराज, राजा छत्रपती शिवाजी महाराज कि जय.शिव गर्जना मध्ये अतिशय उत्कृष्टपणाने महाराजांचे वर्णन आहे. आणि या पुस्तकाच्या तिसरया पानावर असे वाक्य आहे कि, त्याचा डायरेक्ट मनावर परिणाम होतो.
——शिवचरित्र ———
हा डोक्यावर मिरवण्याचा विषय नसून डोक्यात घालण्याचा विषय आहे.त्यासाठी मेंदू गुलाम नको.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्यामागे त्यांचे वडील शहाजी राजे व आई जिजाबाई माता यांचीच प्रेरणा होती.शिवाजी महाराजाचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता .सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे , यासाठी स्वराज्य पाहिजे होते,त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय,धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली .समता स्थापित केली.छत्रपती शिवाजी महाराज सार्या विश्वाचे सूत्र जगत्गुरू तुकोबारायांनी बाल शिवबास छत्रपती हि पदवी वयाच्या बाराव्याच वर्षी दिली. तोपर्यंत भारतासह जगात अनेकजण राजे ,महाराजे ,शहा ,बादशहा ,सम्राट झाले होते.छत्रपती होणारे पहिले माणूस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांचे शिव संदेश शिवरायांनी शेवटपर्यंत पाळला.आणि आताच्या काळात जर महाराज असते तर आजच्या मुलांना काल्पनिक ,हर्क़्युलस अथवा स्पायडर म्यान सुपर म्यान च्या कथा शिकावाव्याच नसत्या लागल्या.हि पाश्चात्य अमेरिकन युरोपियन राष्ट्राची भावना आहे. त्यामुळे जगभरात तुकाराम गाथेचा व शिव चरित्राचा अभ्यास जोरात सुरु आहे.ज्ञान विज्ञानात रोज नवनव्या शोधांची भर पडत आहे.तरीही ते शिवाज्ञानापुढे फिके ठरत आहे.म्हणून मन असावे ते समुद्रासारखे असावे.मग नद्या आपोआप तुम्हाला भेटायला येतील.तसेच कल्याणकारी राजाची हमी देणारी राजमुद्रा स्वराज्याची प्रेरणा ठरली .
प्रतीप्श्चंद्र रेखेवे वर्धिष्णू वैश्ववान्दिता
शहसुनो शिव शैशा मुद्रा भद्राय राजते
अर्थ :- प्रतिपदेच्या चंद्र कोरीच्या दररोज उमलत जाणार्या कमलेप्रमाणे सार्या विश्वाला वंदनीय असणारी शहाजी पुत्र शिवाजी यांची राजमुद्रा जन् कल्याणकारी राज्याचे प्रतिबिंब आहे.याचा असा अर्थ आहे.सर्व लोकांच्या साक्षीने राजमुद्रा व स्वराज्याचा भगवा झेंडा शिवरायांना दिला आणि भगव्या झेंड्याचे जिजाउणी शिवरायांनी महत्व सांगितले.शिवबा हा भगवा झेंडा शिव शंभूचा आहे.शंभू महादेवाचा आहे. बळीराजाचा आहे.गौतम बुद्धाचा आहे,सम्राट अशोकाचा आहे.आपल्या पूर्वजांचा आहे.जो जो या भगव्या झेंड्याचे निशाण सर्व श्रेष्ठ समजतो त्यास भगवान म्हणतात.भगवान म्हणजे देववादि व दैव वादी नव्हे.गौतम बुद्धाने या भगव्या रंगाचा वापर अंगावरील चीवरासाठी केला. व जगाला बुद्धाचे व समतेचे तत्वज्ञान दिले.भगवा रान म्हणजेच मानवता.समता. न्याय बंधुत्व. हे सारे ह्या भगव्याखाली भारतीय समाज ,धर्म जात .वंश ,भाशा , लिंग विसरून एक होऊ शकतो.ज्या ज्या पूर्वजांनी ह्या भगव्या रंगाचा मन राखला तेथे मानवतेचे पुजारी झाले.आज प्रत्येक घरात तो श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो असतो . महाराजांची एक शिकवण आहे,दुसर्यांचे ताटातले ओढून खाणे म्हणजे विकृति, स्वताच्या ताटातले स्वत खाने म्हणजे प्रकृती. आणि स्वत: उपाशी राहून दुसर्याला भरवणे म्हणजे संस्कृती ,हि महाराजाची शिकवण होती. एवढे बोलून मी माझ्या पुस्तकाचे वर्णन संपवतो.
Show Less