
श्यामची आई
By साने गुरुजी
१९३५ साली 'श्यामची आई' या पुस्तकाची पहिली आवृत्ती जेव्हा प्रकाशित झाली तेव्हां त्या पुस्तकाचे वाचकांनी भरभरून स्वागत केले. या पुस्तकात साने गुरुजी यांनी लहानपणाच्या आठवणी गोष्टीरूपाने सांगितल्या आहेत. या पुस्तकाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांनी उत्कृष्ट रसग्रहण लिहिले आहे. त्यातील काही संपादित सारांश :"काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात.; पण साने गुरुजींनी 'श्यामची आई' हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले आहे.
"मराठी भाषेत साने गुरुजींनी 'श्यामची आई' मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही."अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले