संबंधित पुस्तकात टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध, त्यांचं व्यक्तिगत स्वरूपात
Read More
संबंधित पुस्तकात
टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध, त्यांचं व्यक्तिगत स्वरूपात असलेलं काम याची विशेष माहिती दिली आहे. मतभेद किती जरी असले तरी ते दूर ठेवून समाजाच्या दृष्टिकोनातून एकत्रित पद्धतीने एका दिराने काम करणं गरजेचं असतं, हा विचार या महापुरुषांनी आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनात रुजवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय तत्कालीन काळात घेतला असावा आणि त्यानंतर आपण तो चांगला विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो.गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांसारख्या थोर समाज सुधारकांच्या कार्यासंदर्भात संबंधित पुस्तकात विस्तृत माहिती वाचायला मिळते. टिळक आणि आगरकर यांची मैत्री इतकी घनिष्ठ होती.मात्र, त्यांच्यातील वैचारिक स्वरूपाचा संवाद प्रचंड वेगळा होता. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आपण ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ या नावानेच ओळखतो.मात्र, त्यांचं काम विविध क्षेत्रासाठी व्यापक स्वरूपाचं आहे.खगोलशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र या विषयात देखील त्यांनी फार मोठं योगदान दिलं आहे.लेखकाने पर्दापलीकडे समाजात माहीत नसलेल्या जांभेकरांना आपल्या लेखणीतून मुख्य पटलावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. बरं इथेच लेखक थांबत नाहीत तर संत गाडगेबाबा यांची विशिष्ट ओळख ते करून देतात.लेखकांची ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ मांडण्याची शैली डोळ्यात अक्षरशः पाणी आणते.कर्मवीर पाटलांचं काम शिक्षण क्षेत्रात आहे, हे आपण जाणतो. म्हणजे ‘रयत शिक्षण संस्थेसाठी’ त्या संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची सगळ्यांनाच कल्पना असेल.मात्र, अगदी ते काम सुरू करण्यासाठी त्यांच्यावर आलेली संकटं, त्यांना करावा लागलेला संघर्ष यावर लेखक अगदी मार्मिक शब्दात संबंधित पुस्तकात आपल्या भावनांना मोकळी वाट करून देत आहेत, असं दिसतं. वाचक देखील थेट ‘कर्मवीर भाऊराव पाटलांच्या’ काळात जाऊन पोहोचतो, ही लेखकाची शैली आहे.अलीकडे आंबेडकर, शाहू महाराज यांना विशिष्ट समाजापुरतं बांधून ठेवणारी प्रवृत्ती वाढत असताना आंबेडकरांच्या जडणघडणीत शाहू महाराजांची कशी भूमिका राहिली आहे किंवा आंबेडकरांनी समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याच्या दृष्टिकोनातून किती सकारात्मक ऊर्जा ठेवून दिशा देण्याचे काम केले आहे ते लेखक तळमळीने मांडतात.तिकडे फुले दांपत्याचा येथील विस्थापित वर्गातील स्त्री शिक्षणाच्या क्रांतीसाठीचा इतिहास देखील तितक्याच प्रभावीपणे मांडण्याचं धाडस लेखक हटके पद्धतीने दाखवतात.
• हे पुस्तक का वाचावं?
डॉ. सदानंद मोरे यांनी भाषणबाजी पेक्षा कृतिशीलता किती महत्त्वाची असते, हा समाजकारणाचा इतिहास अगदी कृतिशीलपणे आपल्या लेखन शैलीतून समाजापुढे आणला आहे.मतभेद देखील खुल्या दिलाने स्वीकारता आले पाहिजे. जिथे समाजाचं हित आहे तिथे मतभेद देखील बाजूला ठेवून सकारात्मकतेने काम करण्याची गरज असते, हा संदेश आपल्याला संबंधित पुस्तकात मिळतो. इतकच नाही तर लेखकाने अगदी वास्तविक असलेली गोष्ट कथानकाच्या स्वरूपात मांडली आहे, त्यामुळे ती प्रत्येकालाच आपलेशी वाटते.त्यामुळे हे पुस्तक नक्की वाचायला हवं,असं माझं मत आहे.
Show Less