Raut Prashuram Bharat,Sinhgad College of Science,Pune प्रस्तावना- पहिल्या पिढीचे उद्योजक असे रॉनी यांना संबोधले जाते त्यांचे
Read More
Raut Prashuram Bharat,Sinhgad College of Science,Pune
प्रस्तावना-
पहिल्या पिढीचे उद्योजक असे रॉनी यांना संबोधले जाते त्यांचे उद्योजक क्षेत्रात जे मोलाचे कार्य आहे ते सर्वांनाच प्रेरणा देते. टीव्ही केबल टूथ ब्रश निर्मिती ते मोशन पिक्चर्स गेम्स या सर्वांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे तसेच अलीकडेच फुटबॉल कबड्डी या खेळांना सुद्धा त्यांनी मोलाचे प्रोत्साहन देऊन त्यावर प्रकाश टाकला आहे त्यांचा जीवन प्रवास या पुस्तकात मांडला आहे जेणेकरून त्यांच्या अनुभवांचे भरीत ग्रामीण भागातील मुलांना सुद्धा चाखता येईल.
सारांश-
रॉनी यांची उद्योजक क्षेत्रात जी पाऊलवाट सुरू झाली ती क्रूज कँडी पर्यंत कशी संपली हे त्यांनी रोचकपणे वर्णिले आहे आयुष्य जगताना परिघातून आत ते कसे डोकावले व स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली ते सांगितले आहे ते म्हणतात संधी आली पुढे चला म्हणजे वेळ वाया न घालवता संधीचे सोने करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे आयुष्य हे वेगवेगळे प्रसंग असे दाखवते की त्यांचा आपण विचारही केलेला नसतो अशा परिस्थितीमध्ये खंबीर राहून पुढे चालत राहा चला चल हे त्यांनी विशिष्टपणे सांगितले आहे आयुष्यात करियर हे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण ते कसे घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे जेव्हा ते दुसऱ्या टप्प्यात सांगतात की भारताला एका विशिष्ट स्थानी पोहोचवायला हवे व वेगळी ओळख बनवायला हवी तेव्हा त्यांच्या शब्दातून एक वीज लखलखल्यासारखी वाटते तसेच ते कबड्डी फुटबॉल खेळांना प्रोत्साहन देतात स्वदेश मार्फत ते गरिबांना मदत करतात
विश्लेषण –
या पुस्तकातून एक प्रेरणादायी संदेश सर्वापर्यंत पोहोचतोच आहे परंतु उद्योजक बनून काहीतरी वेगळे करण्याची धमक आपल्याला मिळते कारण उद्योजक आणि तोही सर्वात उत्तम होणे जिकिरीचे असते उद्योजकांमध्ये इंटरॅक्शन इन द हेड कॉम्प्रेशन इन द हार्ट अँड फॅशन इन माईंड विथ बॉडी गरजेचे असते तेच रॉनी यांनी केले आहे आणि त्यांच्या या पुस्तका मधून एक प्रेरणा मिळते की अनुभव हे गोष्टी शिकल्याशिवाय येत नाहीत आणि चांगले अनुभव हे नेहमी वाईट अनुभवांमधूनच येत असतात म्हणून न हार मानता जिद्द ठेवून लढा दिला पाहिजे परिस्थिती बदलणारा माणूसच असतो तोच परिस्थिती घडवतो आणि तोच परिस्थिती बिघडवतो सुद्धा कारण काय घडते आणि काय बिघडते हे या पुस्तकातून सांगितले आहे त्यावर मला एक ओळ आठवते हा हाथो की लकीरे पे मत जाये गालिब किस्मत तो उनकी भी होती है जिनको हाथ ही नही होती
निष्कर्ष
ज्यांना यशस्वी उद्योजक व्हायचे आहे आणि या जगात नावारूपाला यायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे ज्यांनी स्वतःची स्वप्न जगायचे आहेत मात्र स्वतः घाबरत आहेत त्यांना हे पुस्तक वाचायला दिले पाहिजे ज्यांना स्वतःच्या मालकीची नवी कंपनी उभारायची आहे जसे रॉनी यांनी सुरू केली ज्यांना स्वतःची एक विश्वासात पात्र अशी टीम बनवायचे आहे त्यांना हे पुस्तक पाठिंबा देईल. ज्यांनी एक धैर्यवादी उत्साही निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक सोने ठरेल कारण एक यशस्वी उद्योजक आणि मनुष्य एकच गोष्ट सांगतो
“To Dream the impossible dream
To fight the unbeatable for I need to do”
Show Less