"हिंदुत्वाचे कोडे" डॉ.बी.आर.आंबेडकर. 1) शैली व संदर्भ _ आज 21 व्या शतकात
Read More
“हिंदुत्वाचे कोडे”
डॉ.बी.आर.आंबेडकर.
1) शैली व संदर्भ _ आज 21 व्या शतकात सद्यस्थितीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानवी जीवनास महत्त्वपूर्ण अशी ज्वलंत लेखन शैली आहे
2) प्रकाशन_ सुगत प्रकाशन नागपूर 440017 अभिनव पगारे
दि.9 ऑक्टोबर 2008
ऐतिहासिक व संस्कृतिक महत्व_ जागतिक पातळीवर प्राचीन असा विस्तृत हा हिंदू धर्म म्हणून ओळखला जातो आजही 21 शतकात अनेक धर्म अस्तित्वात असून त्यातील हिंदू हा बलाढ्य व विस्तृत असा धर्म म्हणून ओळखला जातो परंतु काळाच्या ओघात यात झालेले परिवर्तन व त्याचे आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक ऐतिहासिक अशा घटकांवर झालेले परिणाम आजही महत्त्वपूर्ण ठरतात. याचे मुख्य कारण कोणते… हिंदू धर्माचा चिकित्सक अभ्यास करुन डॉ आंबेडकर यांनी हिंदू धर्माची खरी मीमांसा या पुस्तकात केली आहे.
प्रारंभिक छाप_ मला अभिमान तर होताच पण गर्वही होता हिंदू असल्याचा पण जेव्हा जेव्हा मी अनोळखी युवक मित्र-मैत्रिणींना भेटतो तेव्हा मला धर्म नाही तर प्रथम जात विचारली जाते म्हणून धर्म व जात यांचा चिकित्सक विचार समजून घेण्यासाठी हिंदुत्वाचे कोडे हेच पुस्तक निवडले.
पुस्तकाचे महत्व_ धर्मातील अंधश्रद्धा व व जातीभेद बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची चिकित्सा यात केली आहे हे पुस्तक पूर्णपणे तत्त्वज्ञाने भाषेत आहे यातील तत्त्वज्ञान सत्य वैज्ञानिक दृष्टिकोनातील व अहिंसक आहे.
सारांश_ पुस्तक वाचत असताना यातील लेखन शैली, लेखन, त्यातील संदर्भ, तत्वज्ञानी भाषा, चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक दूरदृष्टीचा सकारात्मक दृष्टिकोन,तथ्यांतील सत्य पाहता हे वाचताना पुस्तक ज्वलंत असल्याचे अनुभवते त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या बरोबर अनेक थोर समाज सुधारकांचे समकालीन साहित्य वाचण्याची अभिरुची माझ्या मनात तयार झाली या पुस्तकाच्या वाचनामुळे माझ्या ज्ञानात भर पडून आणखी ज्ञान मिळवण्याचे ओढ निर्माण झाली आहे. हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांचा ही अभ्यास करण्याची रुची निर्माण झाली आहे.
विश्लेषण_ या पुस्तकात प्रामुख्याने धार्मिक कोडे, सामाजिक कोडे व राजकीय कोडे यांचा चिकित्सक अभ्यास करून भूतकाळातील घटक वर्तमान काळात कसे कार्य करतात व त्याचा परिणाम भविष्यकाळात कसा होतो याची मीमांसा प्रखर व स्पष्टपणे डॉ आंबेडकर यांनी या पुस्तकात केली आहे धर्माचा प्रभाव सामाजिक घटकांवर पडत असतो आणि समाजातूनच राजकीय घटक उदयास येतो परंतु या राजकीय घटकात नेतृत्व गाजवण्यासाठी आणी सत्ता संघर्षच होऊ नये म्हणुन धर्म अधर्म जातीव्यवस्था यासारख्या प्रमुख घटकांत स्वहितासाठी काही चतुर लोकांनी अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दिशा भूल करण्याचं काम कसे व का केले ? आणि कोणी केले याची माहिती या पुस्तकात तत्वज्ञानी भाषेत आहे.
धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय बाबासाहेबांनी जे हिंदू धर्माचे चिकित्सक विश्लेषण केले तो धर्म होता की अधर्म याचे उत्तर यात स्पष्ट आहे. पुस्तक वाचताना मी भावनिक तर झालोच पण वास्तविकतेची जाणीव झाल्यामुळे पुन्हा भानावरती देखील आलो. त्यातील मुख्य संदेश असा की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो अन्याच्या विरुद्ध पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
पुस्तकामुळे निर्माण झालेली ताकद_
धमक आहे माझ्यात, आज धमक आहे माझ्यात.
जिवंत जाळेल मी तो जातीवादी, बस मोक्यात आला पाहिजे.
गर्व जाती धर्माचा नंतर करू मित्रा,
त्या आधी आपला देश डोक्यात आला पाहिजे.
अज्ञानी नाही तर शिक्षित आहोत आपण,
गुन्हेगार नाही पण अधिकारी होता आला पाहिजे,
बा भीमाची पुण्याई समजले मला ते कोडे,
आज झालो मी मोकळा, पण तुझं काय मित्रा.
शिक्षित आहे शांत राहु दे मला,
तू फक्त कारणचं हो होइल मी शिक्षित गुन्हेगार
तुझं हे चित्र विचित्र करण्या, कारण मी प्रथम आणि अंतिमही भारतीय आहे मी भारतीयच आहे.
वैयक्तिक विचार_ वैचारिक गुलाम नाही तर विचारांचा वारसदार व्हायचा आहे मला. समाजातील अनेक होतकरू गरीब समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून आजही वंचित आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे समाजातील काही परंपरेच्या विचारांच्या जाळ्यात गुरफुटून गेलेले लोक हे आहेत याचे आकलन या पुस्तकातून मला झाले मित्र-मैत्रिणींचे झालेले मानसिक शोषण सध्य स्थितीत वाढती गुन्हेगारी बलात्काराचे वाढते प्रमाण शेतकर्यांची हत्या देश सोडून धर्माच्या विचारात गुंतली आजची युवा पिढी सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती धार्मिक संघर्ष जातीय विसंवाद पाहता माझ्या या देशाचा भविष्याचा विचार करता वास्तविक भान अस्तित्वात येते लोकशाहीचा देश हुकुमशाही कडे वाटचाल करतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक वाक्य आहे दिल्लीचेही तक्त राखी तो महाराष्ट्र माझा. कोठे आहे तो महाराष्ट्र माझा ? तक्त राखणारेच शिक्षित आज मानसिक गुलाम झाले आहेत हीच खूप मोठी शोकांतिका आहे. ही लढाई रणभूमीची नसून ती बौद्धिक आहे. जर लढायचं असेल तर शिकावे लागेल कारण ज्ञाना शिवाय लढलो तर पराभव निश्चित आहे…म्हणूनच की काय धर्म संकटात आहे अस दाखवून आपल्या हातात दगड कोयते अशी शस्त्रे देतात…पण वहि पेन पुस्तक कधीही देत नाहीत…कारण आपल्या अज्ञानातच त्यांचा तोरा आहे.
सुसंगती_ ज्याने मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देऊन गुलामगिरीतून समाजाच्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले तो धर्मविरोधी झाला कसा ?. अन्याच्या विरुद्ध लढणे हा धर्म आहे.मग लेखकाने जन्मापासून मृत्यूपर्यंत अन्यायाच्या विरुद्ध लढाच दिला तो अधर्म कसा झाला ?
निष्कर्ष _ हे पुस्तक मी महाविद्यालयीन युवक युवती शिक्षित लोक किंवा खऱ्या अर्थाने सत्य पाचवू शकतात वैज्ञानिक दृष्टीकोणाचा पुरस्कार करतात अंधश्रद्धा बाजूला ठेवून खरा हिंदू धर्म ज्यांना समजून घ्यायचा आहे.ज्यांनी आत्तापर्यंत फक्त एकीव माहिती ऐकली आहे सध्याच्या काळात सोशल मीडियाचे जाळ्यात अडकलेले किंवा धर्माच्या उग्र विचारांना बळी पडून वैचारिक गुलाम झालेले अशा सर्वांनी हे पुस्तक वाचावे.
अंतिम विचार_ धर्मनिरपेक्ष संसदीय लोकशाहीच्या या राज्यात स्वतंत्रपणे राहणारा उच्चशिक्षित जेव्हा मृग गिळून बसल्यासारखा गप्प बसतो स्वहितासाठी या देशाचा विचार करत नाहीत खऱ्या अर्थाने ते देशद्रोही तर आहेतच पण ते धर्माचे एकनिष्ठ कसे आहेत हा मोठा प्रश्न मला उपस्थित होतो म्हणून शिक्षितांनी हे पुस्तक वाचूनही जर समजले नाही तर त्यांनी स्वतःला म्हणावे
हिंदुत्वाचे कोडे हो कोडे
मी शिक्षित असूनही समजले नाही
आता अज्ञानी लोकांनीच मारावे माझ्या तोंडात जोडे.
पूर्वी होतो गुलाम मी, मला माणसात आणलं कोणी. विसरून गेलो उपकार त्यांचे , मी गुलाम झालो पुन्हा.
मी गुलामच झालो पुन्हा…
Show Less